CM Revanth Reddy on Allu Arjun : "अल्लू अर्जून गाडीवर उभं राहून...", अल्लू अर्जूनच्या अटकेवर काय म्हणाले मुख्यमंत्री?
अनेकांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देत थेट त्याचा संबंध राजकारणाशी जोडला. यावरच ज्या तेलंगणा पोलिसांनी अल्लू अर्जुनला अटक केली, त्या राज्याचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांनीही आपलं मत व्यक्त केलं. 'आज तक'च्या अजेंडा या खास कार्यक्रमासाठी आलेले मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांना याबद्दल अनेक प्रश्न विचारण्यात आले, ज्याची उत्तरं त्यांनी अगदी स्पष्टपणे दिली.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
अल्लू अर्जूनच्या अटकेबद्दल काय म्हणाले मुख्यमंत्री?
"चित्रपट पाहून अल्लू अर्जुन निघून गेला असता तर..."
"त्या महिलेच्या कुटुंबाला कोण उत्तर देणार?"
Revanth Reddy on Allu Arjun Arrest : साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुनला 13 डिसेंबरला सकाळी अटक करण्यात आली होती. दिवसभर चाललेल्या या हायव्होल्टेज प्रकरणात अखेर संध्याकाळी अल्लू अर्जुनला जामीन मिळाला. या कारवाईमुळे त्याचे चाहते चांगलेच संतापलेले दिसले. अनेक दिग्गजांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देत थेट त्याचा संबंध राजकारणाशी जोडला. यावरच ज्या तेलंगणा पोलिसांनी अल्लू अर्जुनला अटक केली, त्या राज्याचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांनीही आपलं मत व्यक्त केलं. 'आज तक'च्या अजेंडा या खास कार्यक्रमासाठी आलेले मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांना याबद्दल अनेक प्रश्न विचारण्यात आले, ज्याची उत्तरं त्यांनी अगदी स्पष्टपणे दिली.
ADVERTISEMENT
अल्लू अर्जुनच्या अटकेबद्दल सवाल केला असता ते म्हणाले, 'या देशात सामान्य माणसापासून पंतप्रधानांपर्यंत सर्वांसाठी संविधान समान आहे. एकच कायदा आहे. आम्ही पुष्पा 2 चित्रपटाच्या रिलीजच्या पहिल्या दिवशी 'प्री-रिलीज शो'ला परवानगी दिली होती. तिकिटाचे दर 300 ते 1300 रुपये ठेवण्यासाठीही आम्ही परवानगी दिली होती. त्या शोसाठी प्रचंड गर्दी झाली. तिथली सर्व व्यवस्था योग्य प्रकारे करण्यात आली नव्हती आणि अभिनेता अल्लू अर्जुन कोणतीही पूर्व माहिती न देता त्या शोमध्ये पोहोचला. त्यामुळे तिथे चेंगराचेंगरी झाली. या घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला असून, तिचा मुलगा 13 दिवस रुग्णालयात जीवन-मरणाशी लढा देत आहे असं रेवंथ रेड्डी म्हणाले.
हे वाचलं का?
हे ही वाचा >>Allu Arjun Released : रात्रभर तुरूंगात राहिल्यानंतर आज पहाटे अल्लू अर्जून तुरूंगाबाहेर, वकील म्हणाले...
रेवंथ रेड्डी पुढे म्हणाले, "हैदराबाद पोलिसांनी यामुळेच तातडीने गुन्हा दाखल केला आणि ज्यामध्ये त्यांनी थिएटर आणि व्यवस्थापनातील लोकांना अटक केली. 10 दिवसांनंतर अल्लू अर्जुनलाही याप्रकरणात पोलिसांनी अटक केली. त्यानंतर पोलिसांनी त्याला कोर्टात हजर केलं आणि त्यानंतर त्याला जामीनही मिळाला. आता अशा ठिकाणी एखाद्याला आपला जीव गमवावा लागला, असं असतानाही आम्ही कुणावर गुन्हा दाखल केला नसता, तर तुम्ही म्हणाला असतात की, सिने कलाकारांसाठी नवीन कायदा आणि सुव्यवस्था निर्माण झाली आहे. एखाद्या सामान्य माणसाने असं केलं असतं तर तुम्ही त्याला एका दिवसात तुरुंगात टाकले असतं."
ADVERTISEMENT
'अल्लू अर्जुन न सांगता संध्या थिएटरमध्ये गेला'
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेतील 'त्या' महिलांवर दाखल होणार गुन्हा! नेमकं कारण काय?
रेवंथ रेड्डी म्हणाले, अल्लू अर्जुनने चित्रपट पाहिला, ठीक आहे. पण त्यानंतर तो गाडीत बसून तो तिथून निघाला नाही, तर गाडीच्या वर चढला आणि तिथल्या सर्व लोकांना लोकांशी बालायला लागला.त्यानंतरच ही घटना घडली होती. अल्लू अर्जुनने चित्रपट पाहिल्यानंतर ते ठिकाण सोडलं असतं तर, हे घडलं नसतं. गाडीतून उतरून सर्वांना शेक हँड करण्याच्या दरम्यानच ही परिस्थिती हाताबाहेर गेली. एका महिलेला आपला जीव गमवावा लागला, मला सांगा याला जबाबदार कोण? त्या कुटुंबाला कोण उत्तर देणार? असा सवाल रेवंथ रेड्डींनी केला.
अल्लु अर्जून घरच्या घरीही त्याचा चित्रपट पाहू शकत होता. जर ते सार्वजनिक ठिकाणी चित्रपट पाहायला येणार असतील, तर आधी पोलिसांना कळवावं, जेणेकरुन सर्व व्यवसा करता येतील असं म्हणत रेवंथ रेड्डींनी आपली भूमिका मांडली.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT