Suraj Chavan: कोण आहे सूरज चव्हाण? कसा ठरला 'Bigg Boss Marathi Season 5' चा विनर? वाचा INSIDE STORY

मुंबई तक

ADVERTISEMENT

Marathi Bigg Boss Marathi Season 5 latest News
Who Is Suraj Chavan
social share
google news

बातम्या हायलाइट

point

सूरज चव्हाणचा गावकडचा 'तो' संघर्ष माहितीय का?

point

कुटुंबावर दुख:चा डोंगर कोसळल्यानंतर सूरजने स्वत:ला कसं सावरलं?

point

सूरज चव्हाण महाराष्ट्रात इतका लोकप्रिय कसा झाला ?

Bigg Boss Marathi Season 5 Winner Suraj Chavan : इन्स्टाग्रामवर कॉमेडी रिल्स करून लाखो चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनललेल्या सूरज चव्हाणने बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीजनची ट्रॉफी जिंकली. बिग  बॉसच्या घरातील सर्व सदस्यांना 'गुलीगत' धोका देऊन सूरजने बिग बॉसच्या ट्रॉफीवर नाव कोरलं. अभिजीत सावंतचा पराभव करून सूरजने लाखो चाहत्यांची मनं जिंकली.

ADVERTISEMENT

सूरजने बिग बॉसच्या घरात विजयाची मोहोर उमटवली. त्यामुळे सूरजवर लाखो रुपयांच्या बक्षिसांचा वर्षाव करण्यात आला आहे. सूरज बिग बॉसचा हिरो तर ठरलाच आहे, पण बिग बॉसच्या घरात येण्यापूर्वी सूरजला कोणकोणत्या संघर्षाला आणि समस्यांना समोरं जावं लागलं, याबाबत जाणून घेऊयात सविस्तर माहिती. (Who is Suraj Chavan, know everything about bigg boss marathi season 5 winner suraj chavan)

कोण आहे सूरज चव्हाण ?

Suraj Chavan सोशल मीडियावरचा लोकप्रिय इन्फ्ल्यूएन्सर आहे. सूरज इन्स्टाग्रामवर कॉमेडी कंटेन्ट शेअर करून चाहत्यांचं मनोरंजन करत असतो. तसच सूरज कॉमेडी करतानाच भन्नाट अभिनय करून व्हिडीओही शेअर करत असतो. बारामतीच्या मोधावे गावात सूरजचा जन्म झाला आहे. सूरजने वैयक्तीक जीवनात अनेक संघर्ष पाहिला आहे. सूरजच्या वडिलांचं कर्करोगामुळे निधन झालं होतं. पण सर्वात धक्कादायक म्हणजे त्याच दिवशी त्याच्या आईचं आणि आजीचं निधन झालं. त्यामुळे तरुणपणीच सूरज अनाथ झाला होता. त्यानंतर सूरज आणि त्याच्या पाच बहिणींनी खूप मेहनत घेतली. 

हे वाचलं का?

हे ही वाचा >> Suraj Chavan: मंदिरातले नैवेद्य खाऊन काढले दिवस अन् बिग बॉस जिंकताच नशीब उजाडलं, केदार शिंदेंची मोठी घोषणा! 

सूरज सर्वात पहिले सोशल मीडियावर प्रकाशझोतात आला. कारण सूरजने त्याच्या भन्नाट स्टाईल आणि कॉमेडी व्हिडीओजमुळे लाखो लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. 'गुलिगत' आणि 'बुक्कीत टेंगूळ', असे त्याचे फेमस डायलॉग आहेत. सोशल मीडियाच्या दुनियेत लोकप्रिय झाल्यानंतर सूरजने मराठी चित्रपटातही काम केलं.  राजा राणी आणि मुसंडी यामध्ये सूरजना महत्त्वाची भूमिका बजावली आहे. सूरजचे इन्स्टाग्रामवर 2 मिलियनहून अधिक फॉलोअर्स आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बिग बॉस मराठी पाचच्या सीजनमध्ये सूरजला प्रत्येक आठवड्याला 25 हजार रुपयांचं मानधन मिळालं. 

अभिनेता रितेश देशमुख बिग बॉस मराठी सीजन पाचचा होस्ट होता. बिग बॉस सीजन पाचचा विजेता ठरल्यानंतर सूरजला 14.60 लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. बिग बॉस मराठीचा विजेता ठरलेल्या सूरजवर बक्षीसांचा वर्षाव झाला आहे. ट्रॉफी जिंकल्यानंतर सूरज चव्हाणला बक्षीस स्वरूपात 14 लाख रूपयांचा चेक देण्यात आला आहे. त्यानंतर या कार्यक्रमाचे स्पॉन्सरर पु.ना. गाडगीळ यांच्याकडून सूरज चव्हाणला 10 लाख रूपये जाहीर करण्यात आले आहे. तसेच त्याला एक इलेक्ट्रीक बाईकही बक्षीस म्हणून देण्यात आले आहे. 

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Maharashtra Weather: 'या' जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस! 48 तासांत मोठा बदल, पाहा हवामानाचा अंदाज


 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT