बहिणीनेच दिली होती पूनमच्या मृत्यूची बातमी, आता सगळ्या कुटुंबाचे फोन बंद, नेमकं सत्य काय?
बॉलिवूड अभिनेत्री पूनम पांडेच्या निधनाची बातमी येताच अनेकांना धक्का बसला आहे. पूनमच्या निधनाची बातमी तिच्या बहिणीने दिली होती, मात्र आता पूनमच्या घरातील सगळ्यांचेच फोन बंद असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता पूनमच्या मृत्यूच्या वृत्ताची सत्तता काय असा सवालही उपस्थित केला जात हे.
ADVERTISEMENT
Poonam Pandey: बॉलिवूड इंडस्ट्रीमधून आज एक धक्कादायक बातमी समोर आली आणि अनेकांना धक्का बसला आहे. अभिनेत्री पूनम पांडेच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर करण्यात आली. त्यामध्ये पूनमचा मृत्यू ‘सर्व्हायकल कॅन्सर’ ने (Cervical cancer) म्हणजेच गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगामुळे झाल्याचे सांगण्यात आले होते. काही दिवसांपूर्वीच पूनम पांडेला तिला झालेला कर्करोग (Cancer) हा शेवटच्या स्टेपमध्ये असल्याचे समजले होते. मात्र तिच्या निधनानंतर मात्र तिच्या कुटुंबीयांकडून कोणत्याही वक्तव्य केले नाही. मात्र त्यानंतर इंडिया टुडेने पूनम पांडेच्या जवळच्या व्यक्तींशी बोलण्याचा प्रयत्न करत या घटनेची माहिती घेतली.
ADVERTISEMENT
गोपनीयता राखण्याचे आवाहन
पूनम पांडेच्या मृत्यूविषयी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पूनमच्या बहिणीने फोनवरून सांगितले की, पूनम आता या जगात नाही. गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगामुळे पूनमने या निरोप घेतला आहे. यानंतर पूनम पांडेच्या इन्स्टाग्रामवरही एक पोस्ट शेअर करण्यात आली होती, त्यामध्ये तिच्या मृत्यूचा दावा करण्यात आला होता. तसेच चाहते आणि आप्तेष्टांना गोपनीयता राखण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानंतर पूनम पांडेच्या बहिणीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र पुन्हा तिच्याबरोबर संपर्क झाला नसल्याचे सांगण्यात आले.
हे ही वाचा >> ‘पॉर्न पाहण्याची लागलेली सवय..’ अल्पवयीन मुलाला कसं संपवलं?, आरोपी बापानेच सांगितला घटनाक्रम!
बहिणीनेच सांगितलं
अभिनेत्री पूनम पांडेच्या मृत्यूची माहिती देताना त्यांनी सांगितले की, ‘आम्ही सकाळी पूनम पांडेच्या बहिणीशी बोललो होतो, त्यावेळी त्यांनीचा आम्हाला पूनमच्या मृत्यूची माहिती दिली होती. मात्र त्यानंतर तिच्या बहिणीशी कोणत्याही प्रकारचा संपर्क होऊ शकला नाही.
हे वाचलं का?
कुटुंबीयांचे फोन बंद
तिचा फोन बंद असल्याचेच सांगण्यात येत आहे. तर तिच्या बहिणीबरोबरच तिच्या घरातीलही कोणत्याही व्यक्तीशी संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे पूनमच्या टीममधील दोघा तिघांबरोबर बोलण्याचाही प्रयत्न झाला मात्र त्या सगळ्यांचे फोन बंद असल्याचे सांगण्यात आले.
चार दिवसापूर्वीच सहभाग
काही दिवसांपूर्वी पूनम पांडे वेगवेगळ्या इव्हेंट्स आणि पार्ट्यांमध्ये सहभागी होताना दिसत होती. तर चारच दिवसांपूर्वी एक पोस्ट शेअर केली होती. त्यामध्ये ती तिच्या बॉडीरक्षकाच्या देखरेखीखाली एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जात होती. त्याचबरोबर तिने एका कार्यक्रमामध्ये असंही सांगितलं होतं की, तिची तब्बेत एकदम मस्त आहे.
ADVERTISEMENT
अनेकांना धक्का
पूनमला अचानक गर्भाशयाच्या कॅन्सरचे वृत्त आले आणि तिने जगाचा निरोप घेतल्याचे सगळ्यांना समजल्यानंतर मात्र अनेकांना धक्का बसला. पूनम शेवटची कंगना राणौतच्या ‘लॉक अप’ या रिॲलिटी शोमध्ये दिसली होती. अभिनेता करणवीर बोहरासोबतही तिची चांगली मैत्री होती.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> Cervical Cancer ने पूनम पांडेचा मृत्यू, नेमकं काय आहे हा आजार?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT