Lalbaugcha Raja: लालबागच्या राजासमोरून धक्के मारून बाहेर काढलेली 'ती' अभिनेत्री कोण?

मुंबई तक

ADVERTISEMENT

ालबागच्या राजासमोरून धक्के मारून बाहेर काढलेली 'ती' अभिनेत्री कोण?
ालबागच्या राजासमोरून धक्के मारून बाहेर काढलेली 'ती' अभिनेत्री कोण?
social share
google news

बातम्या हायलाइट

point

'पंड्या स्टोअर' आणि 'कुमकुम भाग्य' अभिनेत्री सिमरन बुधरूपसोबत गैरवर्तन

point

सिमरनने तिचा भयानक अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे.

point

लालबागचा राजा मंडपात अभिनेत्री आणि तिच्या आईला कार्यकर्ते, बाउन्सरकडून धक्काबुक्की

Simran Budharup Viral Video: मुंबई: सध्या देशभरात गणेशोत्सव साजरा होत आहे. मुंबईत तर गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. याच दरम्यान, मुंबईतील प्रसिद्ध लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मोठमोठे सेलिब्रिटी येतात. दरम्यान, प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री सिमरन बुधरूपही नुकतीच लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गेली होती, मात्र यादरम्यान तिच्यासोबत गैरवर्तन झाल्याची घटना समोर आली आहे. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. (who is actress simran budhrup who was kicked out in front of the lalbaugcha raja pandal)

ADVERTISEMENT

सिमरन बुधरुप हिच्याशी गैरवर्तन

'कुमकुम भाग्य' आणि 'पांड्या स्टोअर' सारख्या शोमध्ये दिसलेली अभिनेत्री सिमरन बुधरूपने अलीकडेच लालबागच्या राजाला भेट दिली होती जिथे मंडपातील कार्यकर्ते आणि बाउन्सरने तिच्याशी गैरवर्तन केले होते. अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर तिच्यासोबत झालेल्या या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडिओमध्ये सिमरन लाल रंगाच्या कुर्ता-पायजमामध्ये दिसत आहे, तसेच तिची आईही तिच्यासोबत दिसत आहे.

हे ही वाचा>> Lalbaugcha Raja 2024 LIVE Darshan: लालबागच्या राजाची आरती सुरू, घ्या बाप्पाचं LIVE दर्शन

अभिनेत्रीने सांगितलं नेमकं काय घडलं

व्हिडीओमध्ये सिमरन ही मंडपातील पायऱ्या चढत असताना एक महिला बाऊन्सर तिला धक्काबुक्की करताना आणि ओरडताना दिसत आहे. यावेळी अभिनेत्री सिमरन देखील जोरात ओरडत आहे. सिमनर हिने याबाबत पोस्टमध्ये लिहिलं, 'मंडपात गणपती बाप्पाचे दर्शन घेणे हा एक वाईट अनुभव होता. मी माझ्या आईसोबत लालबागचा राजा येथे बाप्पाचे आशीर्वाद घेण्यासाठी गेले होते, परंतु तेथील  वागणूक वाईट होती. त्यापैकी एका कार्यकर्त्याने माझी आई फोटो काढत असताना तिचा फोन हिसकावून घेतला. मी दर्शन घेत असल्याने आई तिथेच थांबली होती आणि त्यामुळे ती फोटो काढत होती.'

हे वाचलं का?

 

 

ADVERTISEMENT

'जेव्हा माझ्या आईने फोन परत घेण्याचा प्रयत्न केला त्याने त्याने तिने त्याला ढकलून दिले. मी मध्यस्थी करण्यासाठी आले तेव्हा बाऊन्सर्सनी माझ्याशीही गैरवर्तन केले. जेव्हा मी माझ्या मोबाइलवर त्यांचे वर्तन रेकॉर्ड करण्यास सुरुवात केली तेव्हा त्यांनी माझा फोन हिसकावण्याचा प्रयत्न केला. मी तुम्हाला व्हिडिओमध्ये ओरडताना दिसत आहे, हे करू नका, तुम्ही काय करत आहात? जेव्हा मी त्यांना सांगितले की मी अभिनेत्री आहे, तेव्हा त्यांनी माघार घेतली.'

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> Numerology: गणपती बाप्पाचा आवडता अंक! तुमचंही 'या' नंबरशी असू शकतं खास कनेक्शन

या संपूर्ण घटनेबद्दल सिमरनने प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे, सिमरन म्हणाली की, 'भक्त सकारात्मकतेने आणि आशीर्वाद घेण्याच्या इच्छेने आणि गैरवर्तनाची अपेक्षा न करता अशा पवित्र स्थळांना भेट देतात. त्यामुळे इव्हेंट संस्था आणि कार्यकर्त्यांनी भक्तांशी दयाळूपणे आणि सन्मानाने वागावे.' अशी विनंती केली आहे.

अभिनेत्रीबद्दल समजल्यानंतर कार्यकर्त्यांनी घेतली माघार

दरम्यान, सुरुवातील सिमरन ही एखादी सामान्य तरुणी आहे असं वाटल्याने मंडपातील बाउन्सर हे तिच्याशी अत्यंत उर्मटपणे वागत होते. आपण आपण अभिनेत्री आहोत असं जेव्हा सिमरनने सांगितलं तेव्हा तेथील कार्यकर्ते आणि बाउन्सर हे अचानक शांत झाले आणि त्यांनी माघार घेतली. 

कोण आहे सिमरन बुधरुप? 

सिमरन बुधरुप ही छोट्या पडद्यावरील अभिनेत्री आहे. कुमकुम भाग्य आणि पांड्या स्टोर या टीव्ही मालिकांमुळे सिमरन हिला अभिनेत्री म्हणून ओळख मिळाली. मागील अनेक वर्ष ती मनोरंजन विश्वात आहे. 

सिमरन बुधरुप ही सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह असते. तिचे फॉलोवर्स देखील मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यामुळेच जेव्हा तिने लालबागचा राजा येथील घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला तेव्हा एकच गदारोळ झाला. तसेच या घटनेचा व्हिडीओ देखील मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT