Race 4: 'या' दिवशी होणार रिलीज, हायवेवर निघणार धूर! सलमान नव्हे, सैफ अली खानचा रंगणार थरार
Race 4 Movie Release Date : बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणाऱ्या रेस चित्रपटाबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. रेस 1 आणि रेस 2 मध्ये अप्रतिम अभिनय करून प्रेक्षकांची वाहवा मिळवणारा अभिनेता सैफ अली खान पुन्हा एकदा पडद्यावर झळकणार आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
'रेस 3' चित्रपटात झळकलेला सलमान खान रेस 4 मध्ये दिसणार नाही, कारण...
'रेस 4' चित्रपटात सैफ अली खान साकारणार महत्त्वाची भूमिका
'रेस 4' चित्रपट कधी प्रदर्शीत होणार?
Race 4 Movie Release Date : बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणाऱ्या रेस चित्रपटाबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. रेस 1 आणि रेस 2 मध्ये अप्रतिम अभिनय करून प्रेक्षकांची वाहवा मिळवणारा अभिनेता सैफ अली खान पुन्हा एकदा पडद्यावर झळकणार आहे. बॉलिवूडच्या शर्यतीत 'रेस' चित्रपटाच्या सीरिजने धमाका केला आहे. रेस 1 आणि रेस 2 मध्ये अष्टपैलू भूमिका साकारणारा सैफ रेस 3 मध्ये झळकला नाही. सुपरस्टार सलमान खाने रेस 3 मध्ये मुख्य भूमिका साकारली होती. परंतु, आता सैफ अली खानच्या तोच रुबाब आणि जलवा पुन्हा एका रेस 3 चित्रपटाच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. (An important update has come out regarding the box office hit race movie. Actor Saif Ali Khan, who won the praises of the audience with his amazing acting in Race 1 and Race 2, is once again in the limelight)
ADVERTISEMENT
बॉलिवूड हंगामाच्या लेटेस्ट रिपोर्टनुसार, रेस 4 चित्रपटाचे लेखक सिराज अहमद यांनी सीरिजचा धमाका कायम ठेवला आहे. जानेवारी 2025 मध्ये रेस 4 चित्रपटी प्रदर्शीत केला जाईल, अशी घोषणा त्यांनी केली आहे. चित्रपटाची स्क्रिप्ट आणि कास्टिंग पूर्ण होत आहे, अशीही माहिती सिराझ यांनी दिली आहे. सैफ अली खान आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांची कास्टिंग आधीच निश्चित करण्यात आलीय. तर चित्रपटासाठी लागणारे इतर कलाकार टीप्स फिल्मच्या निर्मात्यांकडून योग्य वेळी अधिकृतपणे जाहीर केले जातील, असंही सिराझ म्हणाले.
हे ही वाचा >> Aishwarya-Abhishek Divorce : ...म्हणून ऐश्वर्या-अभिषेकच्या घटस्फोटाची होतेय तुफान चर्चा, 17 वर्षात बदलल्या 'या' गोष्टी
सिराज अहमद यांनी रेस 4 च्या स्टोरीबद्दलही माहिती दिलीय. रेस 1 आणि रेस 2 यांच्याप्रमाणेच रेस 4 चा थरार रंगणार आहे. यामध्ये रेस 3 च्या आठवणींना उजाळा देण्यात येणार आहे. रेस 4 चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना वेगळा अनुभव घ्यायचा आहे. पण रेस 3 मध्ये प्रेक्षकांच्या आवडीप्रमाणे काही गोष्टी दाखवण्यात आल्या नाहीत. सलमान खानच्या भूमिकेबाबत चाहत्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. कारण सलमान खान निगेटिव्ह रोल करत नाही.
हे वाचलं का?
त्यामुळे आमच्यासमोर काही आव्हान आहेत. या सर्व गोष्टी पाहता आम्ही रेसचा पुढचा सिक्वल करण्याचा निर्णय घेतला.
सैफ अली खानने पहिल्या दोन चित्रपटांमध्ये (रेस) उल्लेखनीय अभिनय केला आहे. परंतु, चित्रपटाच्या तिसऱ्या सिक्वलमध्ये सैफ अली खानने काम केलं नाही. सैफच्या जागी सलमान खान अभिनयाच्या शर्यतीत उतरला. रेस 3 मध्ये सलमान खानसह, बॉबी दीओल, जॅकलीन फर्नांडिस आणि डेजी शाहने भूमिका साकारली होती. 2018 मध्ये हा चित्रपट प्रदर्शीत झाला होता.
हे ही वाचा >> Gold Price Today: आरारारा खतरनाक! 18,22,24 कॅरेट सोन्याचे भाव कडाडले, किंमत वाचून डोकंच धराल
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT