Ladki Bahin Yojana : ...तर 4500 हातातून गमावून बसाल, 'ही' चूक आताच टाळा

मुंबई तक

ADVERTISEMENT

ladki bahin yojana scheme third installment amount deposite your bank account but avoid these mistake mukhymantri ladki bahin yojana scheme eknath shinde aditi tatkare ajit pawar
महिलांचं लक्ष आपल्या बँक खात्याकडे लागले आहे.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

तिसऱ्या हप्त्याचे पैसे जमा व्हायला सूरूवात

point

अर्ज भरताना ही चूक केलात

point

आता योजनेचे पैसे गमावून बसाल

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात (Women Bank Account) तिसरा हप्ता (Third Installement) जमा व्हायला सूरूवात झाली आहे. त्यामुळे महिलांचं लक्ष आपल्या बँक खात्याकडे लागले आहे. असे असतानाच आता जर तुम्ही फॉर्म भरताना ही चूक केली असेल, तर तुम्ही हातात आलेले 4500  गमावून बसाल. त्यामुळे ही चूक काय आहे? आणि नेमकी ती कशी टाळता येईल हे जाणून घ्या. (ladki bahin yojana scheme third installment amount deposite your bank account but avoid these mistake mukhymantri ladki bahin yojana scheme eknath shinde aditi tatkare ajit pawar)  

ADVERTISEMENT

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरताना आपल्या बँकेचे तपशील मागितले जातात. हे तपशील भरताना आपण थेट चालू बँक खाते अर्जात भरून घेतो. हे बँक खाते भरत असतान आपण आपलं कोणतं बँक खातं आधारशी लिंक आहे, याची चाचपणी देखील करत नाही. इथेच आपल्याकडून मोठी चूक घडते आणि आपल्याला लाडक्या बहिणींच्या निधीपासून वंचित राहावे लागते. 

हे ही वाचा : Gold Price Today: आरारारा खतरनाक! 18,22,24 कॅरेट सोन्याचे भाव कडाडले, किंमत वाचून डोकंच धराल

काही प्रकरणात तर असं झालंय की महिलांनी भरलंय एक अकाऊंट आणि दुसऱ्याच अकाऊंटमध्ये पैसे जमा झाले आहे. या मागचे कारण म्हणजे महिलेने जे अकाऊंट अर्जात भरले होते ते अकाऊंट आधारशी लिंक नव्हते. तर महिलेचे दुसरेच अकाऊंट हे आधारशी लिंक नव्हते. त्यामुळे महिलांनी अर्ज भरताना किंवा अर्ज भरल्यानंतर देखील आधारकार्ड बँकेशी जोडून घेता येणार आहे. त्यामुळे महिलांनी अर्ज भरताना या गोष्टीची काळजी घ्यायची आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

विशेष म्हणजे तुम्हाला या गोष्टीसाठी बँकेत जायचीही गरज नाही. ऑनलाईनही आधारच्या वेबसाईटवर बँक आधारशी लिंक करता येते. या संबंधित अनेक बातम्या मुंबई तके आधी केल्या आहेत. त्यामध्ये तुम्हाला सोप्प्या पद्धतील आधार बँकेशी लिंक करता येणार आहे. त्यामुळे आताच तुमची ही चूक सूधारून घ्या. 

'इतक्या' महिलांनी घेतला योजनेचा लाभ 

''मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने अंतर्गत आतापर्यंत जवळपास दोन कोटी 40 लाखांपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले आहेत. यामध्ये जुलै महिन्यात अर्ज करणाऱ्या एक कोटी 7 लाख महिलांना ऑगस्ट महिन्यामध्ये लाभ देण्यात आला आहे. तसेच 31 ऑगस्ट रोजी नागपूरमध्ये एक कार्यक्रम झाला. त्यावेळी तब्बल 52 लाख महिलांना आम्ही या योजनेच्या माध्यमातून लाभ वितरीत केला'', अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : IT Rule amendments : मुंबई हायकोर्टाचा केंद्राला मोठा झटका, Fact Check ला ठरवलं घटनाबाह्य

''सप्टेंबर असेल किंवा आतापर्यंत जे काही अर्ज प्राप्त झाले आहेत. त्या अर्जांची छाननी सुरु आहे. ती छाननी पूर्ण झाल्यानंतर मला खात्री आहे की, दोन कोटी पेक्षा अधिक महिला यासाठी पात्र ठरतील. आमचा प्रयत्न आहे की, अडीच कोटी महिलांना या योजनेचा लाभ द्यायचा'', असंही आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT