Scam 2003: ट्रेनमध्ये विकायचा शेंगदाणे! 30,000 कोटींचा घोटाळा करणारा तेलगी कोण?

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

what is telagi scam? who was abdul karim telagi? what is story of scam 2003?
what is telagi scam? who was abdul karim telagi? what is story of scam 2003?
social share
google news

What is Telgi scam : ‘स्कॅम 2003’ हा देशातील सर्वात मोठ्या घोटाळ्यांपैकी एक घोटाळा आहे. हा घोटाळा एवढा मोठा होता की, त्यामुळे देशभरात हाहाकार माजला होता. याच घोटाळ्यावर वेब सीरिज आणि चित्रपट येऊन गेलाय. यात हा घोटाळा 30 हजार कोटींचा असल्याचे सांगण्यात आले आहे. पण, तुम्हाला माहीत आहे का ती व्यक्ती कोण होती, ज्याने अतिशय हुशारीने ३० हजार कोटींचा घोटाळा केला होता. (Who was Abdul Karim Telgi, who scammed 30 thousand crores)

ADVERTISEMENT

हंसल मेहता हे इंडस्ट्रीतील सर्वोत्तम दिग्दर्शकांपैकी एक आहेत. ते जेव्हा कधी चित्रपट किंवा मालिका घेऊन येतात, तेव्हा सगळीकडे त्याचीच चर्चा होते. 2020 मध्ये जेव्हा ते ‘स्कॅम 1992’ ही वेब सीरिज घेऊन आले, तेव्हा लोकांनी त्यांचे कौतुक केले. ‘स्कॅम 1992’ नंतर आता त्याच्या ‘स्कॅम 2003’ची चर्चा होत आहे. सत्य घटनेवर आधारित नवीन वेब सीरिज सोनी लिव्हवर प्रदर्शित होणार आहे. ही वेब सीरिज अब्दुल करीम तेलगीच्या जीवनावर आधारित आहे. याबद्दल आपण जाणून घेऊयात…

काय आहे ‘स्कॅम 2003’ची कथा?

‘स्कॅम 2003’ ही देशातील सर्वात मोठ्या घोटाळ्यांची कहाणी आहे. हा घोटाळा एवढा मोठा होता की, त्यामुळे देशभरात हाहाकार माजला होता. शोमध्ये 30 हजार कोटींचा घोटाळा असल्याचे सांगण्यात आले आहे. प्रत्यक्षात या घोटाळ्यात अनेक सरकारी कर्मचारी आणि पोलीस अधिकारी सामील होते. मात्र, या घोटाळ्यातील मुख्य आरोपी तेलगी होता. याच घोटाळ्याच्या गुन्ह्यात त्याला 30 वर्षांची जन्मठेपेची शिक्षा झाली होती.

हे वाचलं का?

30 हजार कोटींचा घोटाळा

30 हजार कोटींचा स्टॅम्प पेपर घोटाळा करणाऱ्या तेलगीचे कुटुंब कर्नाटकचे रहिवासी होते. तेलगीचे वडील भारतीय रेल्वेत कर्मचारी होते. लहानपणीच त्याने वडिलांना गमावले. उदरनिर्वाहासाठी त्याने ट्रेनमध्ये शेंगदाणे विकण्यास सुरुवात केली. शेंगदाणे विकून त्याने शालेय शिक्षण पूर्ण केले आणि पदवीचे शिक्षणही पूर्ण केले.

हेही वाचा >> Geetika Shrivastava : पाकिस्तानातील भारतीय उच्चायुक्तपदी पहिल्यांदाच महिला, कोण आहेत श्रीवास्तव?

दरम्यान, त्याला सौदीला जाऊन काम करण्याची संधी मिळाली. भारतात परत आल्यावर त्याने बनावट कागदपत्रे आणि पासपोर्ट बनवण्यास सुरुवात केली. त्याने आपली ट्रॅव्हल कंपनी उघडली आणि त्याद्वारे तो लोकांची बनावट कागदपत्रे तयार करून सौदीला पाठवू लागला.

ADVERTISEMENT

कोट्यवधी रुपयांची फसवणूक

हळूहळू तेलगीचे काम सुरू झाले. तो सतत पुढे जात होता आणि बनावट शिक्क्यांद्वारे बँका, विमा कंपन्या आणि स्टॉक एक्स्चेंज फॉर्मची फसवणूक करू लागला. अशा प्रकारे त्याने बनावट स्टॅम्प पेपरच्या जगात आपली खास ओळख निर्माण केली होती. पण असं म्हणतात की चोर कितीही हुशार असला तरी एक दिवस तो नक्कीच पकडला जातो. तेलगीही पकडला गेला. 2003 मध्ये त्याचे काळे कारनामे उघडकीस येताच पोलिसांनी त्याला अटक करून तुरुंगात पाठवले. 2017 मध्ये वयाच्या 56 व्या वर्षी त्यांचा तुरुंगात मृत्यू झाला.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> मुंबई TaK चावडी: अजित पवार गटाची ऑफर…रोहित पवारांनी का नकार दिला?

‘स्कॅम 2003’ ची कथा पत्रकार संजय सिंह यांच्या ‘रिपोर्टर्स डायरी’ या पुस्तकातून घेण्यात आली आहे. या वेब सीरिजमध्ये ज्येष्ठ अभिनेते गगन देव रियार तेलगीची भूमिका साकारत आहेत. ‘स्कॅम 2003’ 1 सप्टेंबर रोजी सोनी लिव्हवर प्रदर्शित होणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT