मोनालिसाची ही पेंटिंग जगात इतकी लोकप्रिय का, सम्राट नेपोलियनचं कनेक्शन काय?

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

Mona Lisa Painting History : जगात दोन पेंटिंग सर्वात जास्त प्रसिद्ध आहेत. यामध्ये योगायोग असा आहे की, दोन्ही पेंटिंगच्या चित्रकारांची नावं लिओनार्डो आहे. यामधील एक प्रसिद्ध पेंटिंग म्हणजे टायटॅनिक चित्रपटातील जे लिओनार्डो द कॅप्रिओने बनवले होते. तर दुसरे प्रसिद्ध पेंटिंग मोनालिसाचे आहे जे लिओनार्डो दि विंचीने बनवले होते. (How did the painting of Mona Lisa get worldwide fame)

ADVERTISEMENT

टायटॅनिकमधील पेंटिंग प्रसिद्ध आहे कारण, चित्रपट प्रसिद्ध असल्यामुळे पेंटिंगही प्रसिद्ध आहे. पण प्रश्न असा आहे की लिओनार्डो द विंचीची पेंटिंग, मोनालिसा जगभर एवढी प्रसिद्ध कशी झाली? ज्या व्यक्तीला पेंटिंगमध्ये अजिबात रस नाही अशा व्यक्तीलाही या पेंटिंगचं नाव माहिती आहे. कदाचित तुम्ही ऐकले असेल की मोनालिसाच्या प्रसिद्धीचे कारण तिचे रहस्यमयी स्मित हास्य आहे. पण हे खरं आहे का? किंवा आणखी काही कारण आहे. या पेंटिंगचा इतिहास काय आहे? ते इतकं प्रसिद्ध कसं झालं आणि त्याची किंमत किती? याविषयी आपण सविस्तर जाणून घेऊयात.

Maharashtra Politics : शिंदेंची खेळी… 12 आमदार नियुक्तीत ‘मविआ’ला कसा बसला झटका!

Mona Lisa पेंटिंगची झाली होती चोरी…

22 ऑगस्ट 1911 या वर्षापासून मोनालिसाच्या कहाणीला सुरुवात झाली. फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये लूव नावाचं एक संग्रहालय आहे, जे उघडण्याची तयारी सुरू होती. लूव हे जगातील सर्वात मोठं संग्रहालय आहे. हॉलिवूड चित्रपटांमधील तुम्ही जर पेंटिंग्स पाहिल्या असतील तर त्यातील बहुतेक पेंटिंग्स लूवमध्ये आहेत. जगातील सर्वात प्रसिद्ध पेंटिंग मोनालिसा देखील येथेच आहे.

हे वाचलं का?

1911 मध्ये त्यादिवशी सकाळी लूवमध्ये खूप गोंधळ उडाला. कारण लुई बेरुड नावाचा प्रसिद्ध चित्रकार संग्रहालयाला भेट देणार होता. लुई बेरुड त्यादिवशी मोनालिसाची कॉपी बनवणार होता. पण तो पेंटिंगजवळ पोहोचताच. तिथलं दृश्य वेगळं होतं. पेंटिंग ऐवजी तिथे चार खिळे आणि धुळीचा थर होता. हे पाहून लुई बेरुड गार्डला विचारू लागला की, लिओनार्डोची मोनालिसा पेंटिंग कुठेय?

गार्ड हैराण होते. या पेंटिंगकडे कोणीच लक्ष दिलं नव्हतं. पेंटिंगचा शोध घेण्यात आला. मात्र ते सापडले नाही. ही बाब संग्रहालय व्यवस्थापनापर्यंत पोहोचताच खळबळ उडाली. ही बातमी संपूर्ण शहरात पसरली. मग देशात आणि मग जगात. एखादी गोष्ट हरवली की त्याची खरी किंमत कळते. मोनालिसाच्या बाबतीतही असंच घडलं. जरी तोपर्यंत मोनालिसा सामान्य लोकांमध्ये इतकी प्रसिद्ध नव्हती. शेकडो लोक लूवमध्ये जमले. न्यूयॉर्क टाइम्सने दुसऱ्या दिवशी ही बातमी पहिल्या पानावर छापली. त्यावेळी, पॅरिसमधील परिस्थिती अशी झाली होती की जणू आपल्या एखाद्या जवळच्या व्यक्तीचा मृत्यूच झालाय. मोनालिसाच्या पेंटिंगच्या रिकाम्या जागी लोकांनी फुलं वाहण्यास सुरुवात केली.

ADVERTISEMENT

Tejas Thackeray : पश्चिम घाटात ठाकरेंनी शोधला नवा साप, नावाचा अर्थ आहे खास

ज्या दिवशी मोनालिसा पेंटिंग चोरीला गेली, त्यादिवशी संग्रहालयाचे संचालक मेक्सिकोला सुट्टीवर गेले होते. त्यांना परतल्यानंतर संचालक पदावरून हटवण्यात आलं. पण हा या समस्येचा उपाय नव्हता. लिओनार्डोची मोनालिसा पेंटिंग, जी गेली 400 वर्षे एका जागी होती. अचानक कुठे गेली? या प्रश्नाचं उत्तर कोणाकडेच नव्हतं.

ADVERTISEMENT

लिओनार्डोनेच चोरली मोनालिसाची पेंटिंग?

मोनालिसा पेंटिंगच्या शोधासाठी जगभरात पोलिसांची धावपळ झाली. ठिकठिकाणी छापे टाकण्यात आले. पण फायदा काहीच झाला नाही. पोलिसांनी शेकडो लोकांना ताब्यात घेऊन चौकशी केली. अटक केलेल्यांपैकी एक व्यक्ती तो होता जो नंतर जगातील महान चित्रकार बनला. त्याचं नाव पाब्लो पिकासो होतं. चित्रकलेच्या विश्वात पिकासो हे खूप मोठं नाव आहे. पिकासो यावेळी संशयाच्या भोवऱ्यात आले कारण त्यांनी काही चोरलेल्या पेंटिंग्स विकत घेतल्या होत्या. पिकासोंचीही चौकशी झाली पण नंतर त्यांना सोडून देण्यात आलं. अशातच दोन वर्षे उलटली. मोनालिसा पेंटिंगबद्दल काहीच कळलं नव्हतं.

1913 मध्ये मोनालिसा पुन्हा एकदा चर्चेत आली. इटलीमध्ये कोणीतरी हे पेंटिंग विकण्याचा प्रयत्न केल्याचं आढळून आलं. 29 नोव्हेंबर 1913 रोजी इटलीतील प्राचीन वस्तूंचा व्यापारी अल्फ्रेडो गेरी यांना एक पत्र आलं. त्यावर लिहिलं होतं “माझ्याकडे लिओनार्डो दि विंचीचे चोरलेले पेंटिंग आहे. हे पेंटिंग इटलीचे असावे कारण त्याचा निर्माता देखील इटलीचा होता”. पत्रात खाली लिओनार्डो अशी स्वाक्षरी होती.

अल्फ्रेडोने पत्राला उत्तर दिलं. पत्राद्वारेच बैठक निश्चित करण्यात आली. 10 डिसेंबर 1913 रोजी अल्फ्रेडो गेरीच्या दुकानात पाच फूट तीन इंचाचा व्यक्ती आला. या व्यक्तीने आपलं नाव लिओनार्डो असं सांगितलं. पेंटिंग दाखवण्याऐवजी त्याने 1 लाख डॉलर्स म्हणजे 2023 नुसार सुमारे 80 लाख रुपये मागितले. करार झाला. काही दिवसांनंतर अल्फ्रेडोने इटलीतील त्रिपोली येथील एका हॉटेलच्या खोलीत प्रवेश केला. ही लिओनार्डोची खोली होती. अल्फ्रेडोने लिओनार्डोला पेंटिंगबद्दल विचारलं. लिओनार्डो घाईत होता.

त्याने बेडखालून एक सुटकेस काढली. सुटकेसमध्ये कपडे होते. त्याने कपडे काढले. कपड्यांखाली एक गुप्त खिसा बनवला होता. त्याने खिशातून पेंटिंग काढले. अल्फ्रेडो गेरीने पेंटिंगकडे पाहिले. त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटले. लिओनार्डोला वाटले की पेंटिंग खरी आहे याबद्दल तो समाधानी आहे. तो उठला आणि करारावर शिक्कामोर्तब करण्यासाठी अल्फ्रेडोकडे हात पुढे केला. एक हात दुसऱ्या मार्गाने हातकडी घेऊन आला. लिओनार्डोने मान वर केली तेव्हा त्याला दिसले की पोलीस खोलीत शिरले होते. तेव्हा त्याला समजलं की हा सारा खेळ त्याला अडकवण्यासाठी रचला गेला.

मोनालिसा पेंटिंग कशी चोरीला गेली?

स्वतःला लिओनार्डो म्हणवून घेणाऱ्या व्यक्तीचं खरं नाव विन्सेंझो पेरुगिया होतं. पेरुगियाने पोलिसांना पेंटिंगच्या चोरीची संपूर्ण कहाणी सांगितली. 21 ऑगस्ट 1911 च्या सकाळी लूव म्युझियम देखभालीसाठी बंद ठेवण्यात आले होते आणि पेरुगियाला हे माहित होतं. तो बाकीच्या कामगारांसह संग्रहालयात शिरला आणि पांढरा पोशाख घाला. जो म्युझियमच्या कर्मचाऱ्यांचा ड्रेस होता. यानंतर तो म्युझियममधील त्या ठिकाणी गेला जिथे मोनालिसाची पेंटिंग होती. पेंटिंग काचेच्या आत होती. त्याने तिथून ती काढली आणि पांढऱ्या कपड्यात गुंडाळली. नंतर तो जसा संग्रहालयात शिरला होता तसाच बाहेर आला.

त्याने हे पेंटिंग पॅरिसमधील त्यांच्या घरात दोन वर्षे लपवून ठेवले. त्यानंतर तो ते इटलीला घेऊन गेला. येथे त्याने पेंटिंग विकण्याचा प्रयत्न केला आणि या जाळ्यात अडकला गेला. पेंटिंग विकून पैसे मिळवणं हा त्याचा हेतू होता. तसंच ही पेंटिंग इटलीकडे असावी अशीही त्याची इच्छा होती.

विन्सेंझो पेरुगिया पकडला गेला. त्याला काही वर्षे तुरुंगात काढावी लागली. पण त्याच वेळी तो इटलीचा हिरो बनला. पेंटिंग मिळाल्यानंतर, त्याचे इटलीमध्ये प्रदर्शन केले गेले. तसंच, इटालियन सरकारने ते फ्रान्सला परत करण्याचा निर्णय घेतला. कारण फ्रान्सचा सम्राट राजा फ्रान्सिसने लिओनार्डो दि विंचीकडून ते विकत घेतले होते.

Onion export duty : फडणवीसांचा जपानमधून अमित शाहांना फोन, केंद्राचा मोठा निर्णय

दरवर्षी सुमारे 10 दशलक्ष लोक लूव म्युझियमला ​​भेट देतात. यापैकी 75% परदेशी पर्यटक आहेत. म्युझियमने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, यापैकी 80% लोक मोनालिसा पाहण्यासाठी खास येतात. मोनालिसाच्या प्रसिध्दीचे अनेक अर्थ लावले गेले. उदाहरणार्थ, असं म्हटलं जातं की तिचे स्मित हास्य खूप रहस्यमयी आहे. एका नजरेत तुम्हाला मोनालिसा हसताना दिसते. पण बराच वेळ पाहत राहिलो तर हळूहळू हे हसू नाहीसे होते.

मोनालिसामध्ये असं आहे तरी काय?

मोनालिसाचे अडीच फूट लांबीचे हे पेंटिंग पाहण्यासाठी 12 फूट अंतरावर उभे राहावे लागते. यासाठी हजारो लोक रांगा लावतात. आणि हे फक्त एक मिनिट पाहण्याची संधी मिळते. मोनालिसाची पेंटिंग बुलेट प्रूफ ग्लासमध्ये ठेवण्यात आली जरी भूकंप आला तरी या पेंटिंगला काही होणार नाही, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.

चित्रकलेच्या इतिहासाबद्दल सांगायचे तर, इटालियन चित्रकार लिओनार्डो दि विंची यांनी ऑक्टोबर 1503 मध्ये हे चित्र काढण्यास सुरुवात केली. ज्या महिलेचे हे पेंटिंग आहे, तिचे नाव लिसा डेल जिओकॉन्डो होते. जी एका इटालियन जमीनदाराची पत्नी होती. जमीन मालकाने लिओनार्डोला पेंटिंगचे काम दिले होते. पण लिओनार्डोने ते जमीन मालकाच्या स्वाधीन केले नाही. उलट काही कारणास्तव हे पेंटिंग चार वर्षे अपूर्णच राहिले.

पुढे जाऊन फ्रान्सच्या सम्राटाने लिओनार्डो दि विंचीला फ्रान्समध्ये येण्याचे आमंत्रण पाठवले. फ्रान्समध्ये पुन्हा या पेंटिंगचे काम सुरू झाले. पण नंतर 1517 मध्ये लिओनार्डो दि विंचीच्या उजव्या हाताला अर्धांगवायू झाला. त्यामुळे मोनालिसा कधीच पूर्ण होऊ शकली नाही. जगातील ही सर्वात प्रसिद्ध पेंटिंग अपूर्णच आहे, परंतु त्याचे आकर्षण इतकं आहे की एकेकाळी फ्रेंच सम्राट नेपोलियन हे पेंटिंग आपल्या बेडरूममध्ये ठेवायचे.

मोनालिसाच्या पेंटिंगची किंमत किती?

एखादी गोष्ट विकली जाते तेव्हाच त्याची किंमत कळते. पण फ्रेंच हेरिटेज कायद्यानुसार मोनालिसा ही सार्वजनिक मालमत्ता आहे, त्यामुळे ती विकता येत नाही. तसंच, अजूनही काही आकडे आहेत ज्यावरून आपण काही अनुमान काढू शकतो. 1962 मध्ये मोनालिसाला प्रदर्शनासाठी अमेरिकेत आणण्यात आले होते. तेव्हा त्याचा विमा 100 दशलक्ष डॉलर्स होता म्हणजेच 2023 नुसार अंदाजे 5500 कोटी रुपये आहे.

 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT