Optical Illusion : थांबा जरा! कँडी क्रश खेळताय? आधी शोधून दाखवा फोटोत लपलेली चुकीची 'Candy'
Optical Illusion IQ Test: गेल्या काही दिवसांपासून ऑप्टिकल इल्यूजनचे कठीण फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. रोजच्या धावपळीच्या जीवनात मेंदूला चालना देण्यासाठी हे ऑप्टिकल इल्यूजनचे फोटो जबरदस्त उदाहरण असतात.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
ऑप्टिकल इल्यूजनचा कठीण फोटो पाहिलात का?
कोण कोण आहे सर्वात जास्त हुशार?
चुकीची कँडी 10 सेकंदाच्या आत शोधून दाखवा
Optical Illusion IQ Test: गेल्या काही दिवसांपासून ऑप्टिकल इल्यूजनचे कठीण फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. रोजच्या धावपळीच्या जीवनात मेंदूला चालना देण्यासाठी हे ऑप्टिकल इल्यूजनचे फोटो जबरदस्त उदाहरण असतात. कारण या फोटोंमध्ये लपलेल्या बारीक सारीक गोष्टी शोधण्यासाठी सर्वांनाच बुद्धीचा कस लावावा लागतो. अनेक लोकांना मोबाईलवर कँडी क्रश गेम खेळायला आवडते. पण या लोकांपुढे आता एक मोठं आव्हान असणार आहे. कारण व्हायरल झालेल्या ऑप्टिकल इल्यूजनच्या फोटोमध्ये अनेक कँडी दिसत आहेत. पण या फोटोत एक कँडी चुकीच्या पद्धतीनं ठेवण्यात आली आहे. हीच कँडी शोधण्यासाठी तुम्हाला 10 सेकंदाची वेळ देण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
ऑप्टिकल इल्यूजनच्या या फोटोत तुम्ही पाहू शकता की, रंगीबेरंगी कँडी या फोटोत दिसत आहेत. जणू काही छत्रीचा दांडाच या फोटोमध्ये लपला आहे, अशा आकाराच्या कँड्या या फोटोत आहेत. पण एक कँडी इतर कँड्यांपेक्षा वेगळी आहे. हीच कँडी शोधण्यासाठी तुम्हाला तल्लख बुद्धीचा वापर करावा लागणार आहे. या फोटोला तुम्ही टाईमपास म्हणून पाहिलं, तर या फोटोत लपलेली अनोखी कँडी तुम्हाला दिसणार नाही. पण या फोटोला तीक्ष्ण नजरेनं पाहिलं तर, तुम्हाला या फोटोत लपलेली चुकीची कँडी शोधता येईल.
हे ही वाचा >> Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींनो! 'या' दिवशी मिळणार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे 2100?
ज्या लोकांना या फोटोत लपलेली चुकीची कँडी दहा सेकंदाच्या आत शोधता आलीय, त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन..पण ज्या लोकांना या फोटोत लपलेली अनोखी कँडी शोधण्यात यश आलं नाही, त्यांना टेन्शन घ्यायची गरज नाही. कारण आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, या फोटोत कोणती कँडी चुकीच्या पद्धतीने ठेवण्यात आलीय. तुम्ही या फोटोला नीट पाहिलं तर तिसऱ्या लाईनमध्ये आम्ही रेड सर्कलमध्ये या फोटोत असलेली चुकीची कँडी दाखवली आहे.
हे वाचलं का?
हे ही वाचा >> India Alliance : उद्धव ठाकरे, ममता बॅनर्जी यांच्याकडे नेतृत्व द्यावं, बड्या नेत्याचा राहुल गांधींवर अविश्वास?
ऑप्टिकल इल्यूजनचे अशाप्रकारचे फोटो सुस्तावलेला मेंदू सक्रीय करण्यासाठी नेहमीच फायदेशीर ठरतात. कारण या फोटोंमध्ये लपलेल्या बारीक सारीक गोष्टी शोधण्यात एक वेगळाच आनंद असतो. कारण या लपलेल्या गोष्टी शोधण्यासाठी बुद्धीचा कस लावावा लागतो आणि ऑप्टिकल इल्यूजनच्या व्हायरल फोटोंना पाहिल्यावरच तुमचा मेंदू सक्रीय होतो, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT