Relationship Tips : लग्नानंतर तुमचं नातं होऊ शकतं आणखी घट्ट, या टिप्स करा फॉलो

मुंबई तक

ADVERTISEMENT

Relationship Tips Follow these tips to maintain love with your partner even after marriage
Relationship Tips Follow these tips to maintain love with your partner even after marriage
social share
google news

Relationship Tips : सध्याच्या लोकांचे आयुष्य प्रचंड धावपळीचे झाले आहे. कारण सकाळी लवकर बाहेर पडणे आणि रात्री उशिरा घरी पोहचणे हीच सध्याची लाईफस्टाईल झाली आहे. कारण आता रात्रीचे 9 वाजल्यानंतर घरी जाणं ही प्रत्येकाची जीवनशैली झाली आहे. यामुळे लोकांच्या नातेसंबंधाव व वैवाहिक आयुष्यावरही (married life) त्याचे वाईट परिणाम होत आहेत. अनेकदा कामामुळे लोकं त्यांच्या कुटुंबातील (Family) सदस्यांनाही योग्य तो वेळ देऊ शकत नाही. मात्र खरं कारण वेगळचं आहे कारण ज्यावेळी लोकं काम करुन खूप उशिरा घरी परतत असतात तेव्हा त्यांच्या घरातल्यांसाठी आणि त्यांच्या त्यांच्या जोडीदारासाठी त्यांना तो वेळ देऊ शकत नाहीत.

ADVERTISEMENT

मिळू शकतो आनंद

जेव्हा कोणत्याही नात्यात एकमेकांना वेळ दिला जात नाही तेव्हा साहजिकच एक नकारात्मक भावना निर्माण झालेली असते. त्यामुळे नात्यात ताणतणावही येतो. या गोष्टीमुळेच आम्ही तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहोत. त्या काही गोष्टींमुळे तुम्ही तुमच्या नात्यामध्ये आणि वैवाहिक आयुष्यातील आनंद मिळवू शकणार आहात.

प्रेम जपून ठेवा

तुमच्या वेळापत्रक कितीही व्यस्त असले तरी तुम्ही तुमच्या जोडीदारासाठी थोडा वेळ काढणे हेच महत्त्वाचे असते. कारण तुम्हाला वेळ कमी मिळाला तरी तुम्ही तुमच्या जोडीदाराला वेळ देताना त्यामध्ये कोणाचाही व्यत्ययही आणू नका. यावेळी जाणीवपूर्वक तुमचा फोन दूर ठेवा आणि एकमेकांकडे जाणीवपूर्वक लक्ष द्या.

हे वाचलं का?

हे ही वाचा >> Team India : राहुल द्रविड टीम इंडियाला करणार बाय बाय, ‘या’ दोन संघाकडून मोठी ऑफर

या गोष्टींचे करा पालन

तुम्ही दिवसभर तुमच्या कामामध्ये व्यस्त असला तरी तुमच्या नात्यातील काही गोष्टी पाळणे हे अत्यंत महत्वाचे आहे. ज्या प्रमाणे सकाळी एकत्र चहा पिणे किंवा फिरायला जाणे. या गोष्टी छोट्या असल्या तरी त्यातून जवळीकता निर्माण होण्यास मदत होते.

मोबाईल, लॅपटॉप ठेवा दूर

तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत वेळ घालवताना मोबाईल, टीव्ही किंवा लॅपटॉप या गोष्टी कटाक्षपणे दूर ठेवा. कारण तुमच्या जोडीदाराबरोबर तुम्ही शारीरिक आणि मानसिकरित्या सोबत असणे हे महत्वाचे आहे.

ADVERTISEMENT

सहलीचेही करा नियोजन-

आयुष्यातील ताणतणाव दूर करायचा असेल तर जोडीदारासोबत चर्चा करुन काही तरी वेगळं नियोजन करा. शनिवार व रविवार किंवा दीर्घ सुट्टी दिवशी छोट्या सहलीचे नियोजन करा. त्यामुळे तुम्ही आणखी जवळ येऊ शकणार आहात.

ADVERTISEMENT

हितगूज ठरेल प्रेमावर उपाय

सध्या धावपळीच्या युगात जोडीदार असला तरी एकमेकांशी बोलणं होत नाही. त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी एकमेकांशी बोला. दिवसभरात काय काय झाले त्याची चर्चा करा. काही गोष्टी एकमेकांशी चर्चा करा.

हे ही वाचा >> ”आरक्षण हवंय, पण बाबासाहेबांच नाव घ्यायचं नाही”, गोपिचंद पडळकरांनी जरांगेंना सुनावलं

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT