Sexual Health Tips: लैंगिक संबंध ठेवताना या 5 गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर…
Physical Relations and Sexual Health: लैंगिक संबंध ठेवताना योग्य पद्धती निवडल्या नाहीत, तर सुखद अनुभवही खूप वेदनादायी असू शकतो. अशा परिस्थितीत आपण तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेणं गरजेचं आहे.
ADVERTISEMENT
5 Sexual Health Tips: लैंगिक संबंध (Physical Relations) ठेवण्याचे फायदे आणि तोटे दोन्ही आहेत. तुम्ही कोणत्या प्रकारची लैंगिक क्रिया करता यावर ते अवलंबून आहे. सुरक्षितता आणि माहिती लक्षात घेऊन शारीरिक संबंध ठेवल्यास तुम्हाला आनंददायी लैंगिक अनुभव मिळू शकतो. विचित्र लैंगिक वर्तनामुळे शारीरिक, भावनिक आणि सामाजिक कल्याणावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. अशा वर्तनामुळे अनेक समस्या उद्भवू शकतात, ज्यात प्रामुख्याने लैंगिक संक्रमित संसर्ग (STI), नको असलेली गर्भधारणा यांचा समावेश होतो. येथेआपण त्याचे दुष्परिणाम तपशीलवार समजून घेऊया. (sexual health tips keep 5 things in mind while having physical relations with your partner otherwise the condition will start worsening)
ADVERTISEMENT
1. असुरक्षित लैंगिक संबंध
सुरक्षित लैंगिक पद्धतींचा वापर न करता सेक्स केल्याने लैंगिक संक्रमित रोग (STI) आणि नको असलेल्या गर्भधारणा होण्याचा धोका वाढतो. अशा स्थितीत सेक्स करताना नेहमी कंडोमचा वापर करावा. गर्भधारणा रोखण्यासाठी हे 100% प्रभावी नसल्यामुळे, तुम्ही इतर गर्भनिरोधक पर्याय निवडण्याचा विचारही करू शकता.
2. एकापेक्षा अधिक पार्टनर
जर तुम्ही तुमचा लैंगिक साथीदार वारंवार बदलत असाल तर सावधगिरी बाळगा. कारण असे केल्याने STI चा धोका खूप जास्त असतो. तसेच इतर अनेक आजार पसरण्याचा धोका आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> Best foods for sex life: चांगल्या सेक्स लाइफसाठी नेमकं काय-काय खावं?
3. जबरदस्ती लैंगिक संबंध ठेवणं पडेल महागात
तुम्ही नेहमी तुमच्या जोडीदाराच्या संमतीने संबंध ठेवावे. तसे न केल्यास तुमच्याविरोधात कायदेशीर गुन्हा दाखल होऊ शकतो. तसेच तुमच्या जोडीदाराला शारीरिक आणि भावनिक हानी होण्याचा धोका असू शकतो.
4. उत्साह असला तरी भान गमावू नका
अनेक लोक सेक्स करताना उत्तेजित होऊन असे काही करतात, जे त्यांच्यासाठी आयुष्यभराचा आघात ठरतं. शिवाय सामाजिक प्रतिमा खराब होण्याचा धोका आहे. अशा परिस्थितीत जोडीदारासोबत शारीरिक संबंध ठेवताना खूप सावध राहण्याची गरज आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> Sexual health: लैंगिक संबंधांसाठी ‘ही’ वेळ सर्वात वाईट, काय आहे कारण?
5. तज्ज्ञांची मदत घ्या
जर तुम्हाला सेक्स दरम्यान अशा प्रकारच्या अस्वस्थ लैंगिक वागणुकींचा सामना करावा लागत असेल, तर एखाद्या तज्ज्ञाची मदत घ्या. थेरपिस्ट मूलभूत समस्यांचे निराकरण करण्यात आणि निरोगी लैंगिक सवयी विकसित करण्यात चांगली मदत करू शकतात.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT