17 September 2024 Horoscope : लव्ह लाईफमध्ये 'या' राशीच्या लोकांना मिळेल यश! काहींच्या संपत्तीत होईल भरमसाठ वाढ
17 September 2024 Horoscope: वैदिक ज्योतिष शास्त्रात एकूण 12 राशींचं वर्णन केलं आहे. प्रत्येक राशीचा स्वामी ग्रह असतो. ग्रह नक्षत्रांच्या स्थितीनुसार राशीचं आकलन केलं जातं.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
कोणत्या राशीच्या लोकांना प्रेमात मिळेल यश?
या राशीचे लोक होतील गडगंज श्रीमंत
आजच्या राशी भविष्याबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती
17 September 2024 Horoscope: वैदिक ज्योतिष शास्त्रात एकूण 12 राशींचं वर्णन केलं आहे. प्रत्येक राशीचा स्वामी ग्रह असतो. ग्रह नक्षत्रांच्या स्थितीनुसार राशीचं आकलन केलं जातं. आज मंगळवार आहे. 17 सप्टेंबर 2024 ला मंगळवार. हा दिवस हनुमान देवाला समर्पित केला जातो. हनुमान देवाची पूजा केल्यानं जीवनातील सर्व समस्या दूर होतात. ज्योतिष गणनेनुसार 17 सप्टेंबरचा दिवस काही राशींसाठी खूप शुभ असणार आहे. तर काही राशींना समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
ADVERTISEMENT
मेष राशी
या राशीच्या लोकांना मोठ्या प्रकल्पात आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. एखाद्या प्रवासादरम्यान सेलिब्रिटीसोबत संवाद होऊ शकतो. आरोग्याची काळजी घ्या.
वृषभ राशी
तुमची आर्थिक प्रगती होईल. लव्ह लाईफ सुधारेल. सोनं खरेदी करताना विचार करा. तणावात राहून काम करू शकता.
हे वाचलं का?
मिथुन राशी
या राशीच्या लोकांना आर्थिकदृष्ट्या थोडं सावध राहावं लागेल. पैसे कमवण्यासाठी योग्य पद्धतीने गुंतवणूक करा. एखाद्या प्रकल्पात नफा होऊ शकतो.
कर्क राशी
कर्क राशीच्या लोकांच्या जीवनात मोठे बदल होऊ शकतात. आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी व्यायाम करा. बाहेरील प्रवासाचा योग येईल. कोर्ट-कचेरीत सुरु असलेल्या संपत्तीत वाढ होईल.
ADVERTISEMENT
सिंह राशी
आज सिंह राशीच्या लोकांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होईल. कार्यलयात तुमची कामगिरी चांगली राहील. कौटुंबीक जीवनात आनंदाचं वातावरण राहील. नवीन संपत्ती खरेदी करण्याच योग आहे. व्यापारात वाढ होईल.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> Vijay Shivtare: "मंत्रिमंडळात शेवटपर्यंत नाव होतं माझं, अचानक..."; आमदार विजय शिवतारेंच्या विधानामुळे खळबळ
कन्या राशी
आज कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहिल. एखाद्या योजनेत गुंतवणूक केलेला पैशांमध्ये नफा होईल. फिटनेसबाबत काळजी घ्या. तणावात काम करु नका. प्रवास आनंददायी राहील.
तुळा राशी
तुळा राशीच्या लोकांना गूंतवणुकीचा चांगला फायदा होईल. सकस आहारामुळं आरोग्य उत्तम राहील. कामात तुम्हाला पॉजिटिव्ह रिझल्ट मिळेल. नवीन व्यवसाय सुरु करण्याची चांगली वेळ आहे.
वृश्चिक राशी
वृश्चिक राशीचे लोक आर्थिकदृष्या मजबूत राहतील. मानसिक तणावातून बाहेर पडण्यासाठी योग करा. स्वप्न पूर्ण करण्यासाठी कौटुंबिक सहकार्य मिळेल. संपत्ती खरेदी करण्याचा योग येऊ शकतो.
धनू राशी
धनू राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला असेल. आर्थिक संपत्तीत वाढ होईल. रोजच्या लाईफस्टाईलमध्ये व्यायामाचा समावेश करा. काही लोकं नवीन व्यावसाय सुरु करू शकतात.
हे ही वाचा >> Maharashtra Assembly Session: कुर्ला बस अपघात प्रकरण तापलं! ठाकरे गटाच्या आमदाराने फडणवीस सरकारला घेरलं, CM म्हणाले...
मकर राशी
मकर राशीसाठी आजचा दिवस चांगला आहे. पैसे कमवण्यासाठी चांगला योग येऊ शकतो. डाएटवर नियंत्रण ठेऊन व्यायाम करण्याची आवश्यकता आहे. परदेशात जाण्याचा योग येईल.
कुंभ राशी
कुंभ राशीच्या लोकांचं नशीब लवकरच चमकणार आहे. रोज व्यायाम केल्यानं तुमचं आरोग्य सुधारेल. पार्टनरच्या शोधात असलेल्या लोकांचं स्वप्न पूर्ण होईल. दूरचा प्रवासाचा योग येईल.
मीन राशी
मीन राशीचे लोक चांगल्या कमाईची अपेक्षा करू शकतात. शारिरीक आरोग्य उत्तम ठेवा. आर्थिक संपत्तीत वाढ होऊ शकते. एखाद्या जुन्या नातेवाईकाशी मुलाखत होऊ शकते. संपत्ती खरेदी करण्यासाठी चांगला दिवस आहे.
टीप - राशी भविष्याबाबत दिलेली माहिती सूत्रांच्या आधारावर आहे. मुंबई तक या माहितीची पुष्टी करत नाही.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT