1st January 2025 Horoscope In Marathi: नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच पडणार पैशांचा पाऊस! 'या' राशीचे लोक होतील मालामाल
1st January 2025 Horoscope: ग्रह नक्षत्रांच्या स्थितीनुसार राशी भविष्याची माहिती दिली जाते. ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक राशीचा एक स्वामी असतो, ज्याचा सर्व राशींवर प्रभाव असतो.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

कोणत्या राशीचे लोक होतील प्रचंड श्रीमंत?

या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल आरोग्याची काळजी

या राशीचे लोक शैक्षणिक कार्यात होतील यशस्वी
1st January 2025 Horoscope: ग्रह नक्षत्रांच्या स्थितीनुसार राशी भविष्याची माहिती दिली जाते. ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक राशीचा एक स्वामी असतो, ज्याचा सर्व राशींवर प्रभाव असतो. ज्योतिष गणनेनुसार, 1 जानेवारीचा दिवस काही राशींसाठी खूप शुभ असणार आहे. तर काही राशींसाठी सामान्य स्वरुपाचा राहणार आहे. 1 जानेवारी 2025 ला कोणत्या राशींना लाभ होणार आहे आणि कोणत्या राशीच्या लोकांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे? जाणून घेऊयात याबाबत सविस्तर माहिती.
मेष राशी
वादविवादांपासून दूर राहा. कुटुंबात शांतता ठेवा. आईला आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. आत्मविश्वास वाढेल. शैक्षणिक कार्यात यश मिळेल.
वृषभ राशी
खूप मेहनत घ्यावी लागेल. आरोग्याची काळजी घ्या. वडिलांचं सहकार्य मिळेल. खूप जास्त खर्च होईल. कुटुंबाच्या जबाबदाऱ्या वाढतील. धार्मिक कार्यात वाढ होईल.
मिथुन राशी
शैक्षणिक कार्यात समस्या निर्माण होऊ शकतात. आर्थिक खर्चावर नियंत्रण ठेवा. मुलांना मेहनत घ्यावी लागेल. प्रवासाचा योग येऊ शकतो. कुटुंबात मांगलिक कार्य होतील. मित्रांचं सहकार्य मिळेल.
कर्क राशी
कुटुंबात धार्मिक कार्य होऊ शकतात. मुलांच्या आरोग्यात सुधारणा होईल. भावनांवर नियंत्रण ठेवा. आशा-निराशेचे संमिश्र भाव मनात राहतील. आर्थिक खर्चात वाढ होईल.
हे ही वाचा >> Optical Illusion : मांजर पाळणं सोपं पण शोधणं कठीण! गरुडासारखी नजर असणाऱ्यांनाच दिसेल फोटोत लपलेली मांजर
सिंह राशी
आशा-निराशेचे भाव मनात येऊ शकतात. नोकरीत प्रगती होईल. कुटुंबापासून दूर जाऊ शकता. आत्मविश्वास कमी होईल. संवादात समतोल ठेवा.
कन्या राशी
नोकरीत अतिरिक्त जबाबदारी मिळू शकते. क्रोधावर नियंत्रण ठेवा. खर्चामुळं नैराश्य येऊ शकतं. एखाद्या मित्राच्या सहयोगामुळं महत्त्वाचं काम होऊ शकतं.
तुळा राशी
मानसिक आरोग्य चांगलं राहील. एखादं आर्थिक काम होईल. कुटुंबात सुख-समृद्धी राहील. कुटुंबासोबत धार्मिक स्थळांवर जाऊ शकता.
वृश्चिक राशी
आत्मविश्वास वाढेल. मन अस्वस्थ राहील. क्रोधापासून सावध राहा. मुलांच्या आरोग्याची काळजी घ्या. आशा-निराशेचे संमिश्र भाव राहतील.
हे ही वाचा >> Bank Holidays in January 2025: 1 जानेवारी 2025 ला बँक आणि शेअर मार्केट राहणार बंद? सुट्ट्यांची यादी एकदा वाचा
धनु राशी
मन अशांत राहील. आत्मविश्वासात कमी राहील. विनाकारण क्रोधी होऊ नका. कामकाजासाठी प्रवास करावा लागू शकतो. आर्थिक खर्चात वाढ होऊ शकते. कुटुंबाचं सहकार्य लाभेल. आईच्या सहकार्यामुळे धनप्राप्ती होईल.
मकर राशी
आई-वडिलांचं सहकार्य लाभेल. कार्यक्षेत्रात खूप मेहनत घ्यावी लागेल. आरोग्याची काळजी घ्या. धार्मिक कार्यात व्यस्त राहू शकता.
कुंभ राशी
आत्मविश्वास खूप वाढेल. आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा. स्वभावात चिडचीडपणा राहील. आर्थिक उत्पन्नात वाढ होईल.
मीन राशी
राशीच्या लोकांनी सकारात्मक विचार करणे आवश्यक आहे. एखाद्या व्यवहाराच्या माध्यमातून पैसे मिळू शकतात. काही नातेवाईकांची भेट होऊ शकते. दूरच्या प्रवासासाठी हा दिवस चांगला आहे. आरोग्याची काळजी घ्या.
टीप- सूत्रांच्या आधारावर राशी भविष्याची माहिती देण्यात आली आहे. मुंबई तक या माहितीची पुष्टी करत नाही.