Horoscope In Marathi: 'या' राशीच्या लोकांसाठी गूड न्यूज! संपत्तीचे वादविवाद मिटतील, तर काहींचा बँक बॅलेन्स वाढेल

मुंबई तक

20 October 2024 Horoscope : वैदिक ज्योतिष शास्त्रात एकूण 12 राशींचं वर्णन केलं आहे. प्रत्येक राशीचा स्वामी ग्रह असतो. ग्रह नक्षत्रांच्या स्थितीनुसार राशीचं आकलन केलं जातं. आजा 20 ऑक्टोबरला रविवार आहे.

ADVERTISEMENT

20 October 2024 Horoscope In Marathi
20 October 2024 Astrology
social share
google news

बातम्या हायलाइट

point

कोणत्या राशी होतील मालामाल?

point

'या' राशींवर येणार आर्थिक संकट

point

'या' राशींना घ्यावी लागेल आरोग्याची काळजी

20 October 2024 Horoscope : वैदिक ज्योतिष शास्त्रात एकूण 12 राशींचं वर्णन केलं आहे. प्रत्येक राशीचा स्वामी ग्रह असतो. ग्रह नक्षत्रांच्या स्थितीनुसार राशीचं आकलन केलं जातं. आजा 20 ऑक्टोबरला रविवार आहे. आजच्या दिवशी कोणत्या राशींमध्ये मोठे बदल होणार आहेत आणि कोणत्या राशींना समस्यांचा सामना करावा लागू शकतो, याबाबत जाणून घ्या राशी भविष्याची सविस्तर माहिती.

मेष राशी 

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खास असणार आहे. फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत मजेदार क्षण एन्जॉय करू शकता. आर्थिक गोष्टींमध्ये घाईगडबीत चुकीचा निर्णय घेऊ नका. खर्च वाढल्याने मन अशांत राहील.

वृषभ राशी

व्यावसायीक गोष्टींमध्ये सुरु केलेल्या कामात यश मिळेल. शैक्षणिक कार्यात यश मिळवण्यासाठी खूप मेहनत करा. धार्मिक कार्यात सहभागी व्हा. पार्टनरशिप करून नवीन उद्योग सुर करू शकता.

मिथुन राशी 

मिथुन राशीच्या लोकांना कौशल्य सिद्ध करण्याची संधी मिळेल. बॉस तुमच्या कामगिरीवर इम्प्रेस होईल. कौटुंबिक जीवन सुखमय राहील. पार्टनरचं सहकार्य मिळेल. तणाव कमी करण्यासाठी कुटुंबासोबत वेळ घालवा.

कर्क राशी

कर्क राशीच्या लोकांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागू शकतो. प्रवासाचा योग बनेल. संपत्तीबाबत सुरु असलेले वाद मिटतील. कायदेशीर प्रकरणांमध्ये यश मिळेल. व्यापारात वाढ होईल.

सिंह राशी 

सिंह राशीच्या व्यक्तींना आज खूप विचारपूर्वक गुंतवणूक करावी लागेल. कार्यालयात कौशल्य दाखवण्याची संधी आहे. कुटुंबासोबत पिकनिकला जाऊ शकता. नोकरी-व्यावसायात परिस्थिती अनुकूल राहील.

हे ही वाचा >> Sanjay Raut: '...तर महाराष्ट्रातल्या मतदारांचा विराट मोर्चा निघेल', संजय राऊतांचा निवडणूक आयोगाला इशारा

कन्या राशी

आजचा दिवस सामान्य स्वरुपाचा राहिल. खर्चावर नियंत्रण ठेवाल. घाईगडबडीत कोणतीही खरेदी करू नका. संपत्ती खरेदी करण्यासाठी चांगंला दिवस आहे. करिअरमध्ये आव्हानांचा सामना करावा लागू शकतो.

तुळा राशी

तुळा राशीच्या लोकांना आज आरोग्याबाबत सतर्क राहावं लागेल. लव्ह लाईफ चांगली राहील. कार्यालयातील सर्व कामे यशस्वी होतील. नातेवाईकांना आर्थिक मदत करावी लागू शकते.

वृश्चिक राशी 

वृश्चिक राशीच्या लोकांना संपत्तीबाबत सुरु असलेल्या वादांपासून दिलासा मिळेल. धनलाभ होईल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. तुम्हाला एखाद्या महत्त्वपूर्ण कामाची जबाबदारी मिळेल. कार्यालयात व्यस्त शेड्युल राहील. पार्टनरचं प्रेम आमि सहकार्य मिळेल.

धनू राशी

धनु राशीच्या लोकांनी वादविवादापासून दूर राहा. आज विरोधक सक्रिय होतील. कार्यालयात प्रतिस्पर्धी निर्माण होतील. आर्थिक खर्चावर नियंत्रण ठेवा.

मकर राशी

आज मकर राशीच्या लोकांसाठी चांगला दिवस असेल. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. गूंतवणुकीच्या नवीन संधी उपलब्ध होतील. गृहनिर्माणचे कार्य सुरु होतील. सामाजिक कार्याल रुची वाढेल. आज तुन्ही नवीन कामाची सुरुवात कराल.

कुंभ राशी 

आर्थिक उत्पन्नाचे नवीन स्त्रोत उपलब्ध होतील. प्रिय व्यक्तींसोबत मजा-मस्ती करू शकाल. दूरच्या प्रवासाचा योग बनेल. मेहनत आणि प्रयत्नांना यश नक्की मिळेल.

मीन राशी

मीन राशीच्या लोकांना छोट्या मोठ्या आर्थिक गोष्टींचा सामना करावा लागू शकतो. कौटुंबीक जीवन सुखमय राहील. आज पार्टनरसाठी स्पेशल प्लॅन करू शकता. 


टीप - सूत्रांच्या आधारावर राशी भविष्याची माहिती देण्यात आली आहे. मुंबई तक राशी भविष्यात दिलेल्या मजकूराची पुष्टी करत नाही.

हे वाचलं का?

    follow whatsapp