Horoscope In Marathi: बॉसशी उडतील खटके तर काहींवर पैशांचा पाऊस! आज तुमच्या राशीत काय?
Horoscope : ज्योतिष शास्त्रात राशींचं विशेष महत्त्व असतं. राशींच्या माध्यमातून कुणाच्याही भविष्याचं वर्णन केलं जातं. यामध्ये एकूण 12 राशींची माहिती दिली जाते. प्रत्येक राशीचा स्वामी ग्रह असतो.
ADVERTISEMENT

2nd October 2024 Horoscope : ज्योतिष शास्त्रात राशींचं विशेष महत्त्व असतं. राशींच्या माध्यमातून कुणाच्याही भविष्याचं वर्णन केलं जातं. यामध्ये एकूण 12 राशींची माहिती दिली जाते. प्रत्येक राशीचा स्वामी ग्रह असतो. याचा राशींवर सर्वात जास्त प्रभाव पडतो. 2 ऑक्टोबर 2024 रोजी म्हणजेच आज बुधवार आहे. बुधवारचा दिवस पांडुरंगाला समर्पित केला जातो. या दिवशी पांडुरंगाची पूजा केल्याने शुभ लाभ होतो. ज्योतिष गणनेनुसार 2 ऑक्टोबरचा दिवस काही राशींसाठी अत्यंत शुभ असणार आहेत. तर काही राशींना समस्यांचा सामना करावा लागणार आहे. जाणून घेऊयात या राशींबाबत सविस्तर माहिती
मेष राशी
आज या राशीच्या व्यक्तींना अचानक लाभ होण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती मजबूत होईल. शुभ कार्यासाठी पैसे खर्च होतील. व्यापारात धोका पत्करु नका.
वृषभ राशी
आज वृषभ राशीच्या लोकांना समस्यांचा सामना करावा लागू शकतो. त्यांते बॉसशी खटके उडतील. हिरव्या रंगाची वस्तू जवळ ठेवा.
मिथुन राशी
जे काही तुम्ही ठरवलं आहे, त्याला व्यावसायिक दृष्टीकोनातून पाहा. आर्थिक लाभ होईल. आरोग्य मध्यम स्वरुपाचं राहील. लाल वस्तूचं दान करा.
कर्क राशी
भीती, मानसिक निराशा निर्माण होईल. कुटुंबाची काळजी घेण्याची गरज आहे. आर्थिक गोष्टींमध्ये वाढ होईल. पण खर्चातही वाढ होईल. व्यापार चांगला आहे. लाल वस्तू जवळ ठेवा.
सिंह राशी
तुमच्यात सकारात्मक उर्जा दिसत आहे. आरोग्य उत्तम आहे. मुलांचं आरोग्य खूप चांगलं आहे. व्यापारात प्रगती होईल. तुम्हाला भरपूर यश मिळेल.
कन्या राशी
खूप खर्च होऊ शकतो. मन अशांत राहील. आरोग्य, प्रेम आणि व्यापार चांगला राहील. पार्टनरशिपमध्ये समस्या निर्माण होऊ शकतात.
तुळा राशी
आर्थिक समस्या सुटतील. आनंदाची बातमी मिळेल. सरकारी कार्यालयात वादविवाद करू नका. आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. शनिदेवाला नमस्कार करा.
वृश्चक राशी
व्यावसायीक, व्यापरीक समोताल राहील. तुमची प्रगती होईल. सरकारी कामं, कोर्ट कचेरीचे खटले आणि राजकीय कामात यश मिळेल. आरोग्य, प्रेम आणि व्यापार खूप चांगला राहिल. पिवळी वस्तू जवळ ठेवा.
धनु राशी
तुम्हाला नशीब साथ देईल. प्रवासाचा योग येईल. आरोग्य चांगलं आहे. प्रेम-आरोग्य आणि व्यापार खूप चांगलं आहे. लाल वस्तू जवळ ठेवा.
मकर राशी
परिस्थिती प्रतिकूल आहे. आरोग्याची काळजी घ्या. वाहने सावकाश चालवा. मुलांचं सहकार्य लाभेल आणि व्यापारही चांगला राहिल.
कुंभ राशी
जीवन आनंददायी होईल. आरोग्य चांगलं राहील. मुलांचं खूप सहकार्य लाभेल. नोकरीत प्रगती होईल. पार्टनरची चांगली साथ मिळेल. सूर्यदेवाला नमस्कार करा.
मीन राशी
शत्रुंवर कायमचा दबदबा राहील. गुण-ज्ञानाची प्राप्ती होईल. ज्येष्ठांचा आशीर्वाद मिळेल. मुलांचं आरोग्य चांगलं राहील. तांब्याची वस्तू दान करा