Bank Holidays in January 2025: 1 जानेवारी 2025 ला बँक आणि शेअर मार्केट राहणार बंद? सुट्ट्यांची यादी एकदा वाचा
: 1 जानेवारीला नवीन वर्षाचं आगमन होत आहे. पण वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच 1 जानेवारीला बँका आणि शेअर मार्केट बंद राहणार का?
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

नवीन वर्षात जानेवारी महिन्यात किती दिवस बँका राहणार बंद?

कोणत्या ठिकाणी बँका राहतील बंद?

बँकांच्या सुट्ट्यांची यादी वाचा एका क्लिकवर
Bank Holiday January 2025 : 1 जानेवारीला नवीन वर्षाचं आगमन होत आहे. पण वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच 1 जानेवारीला बँका आणि शेअर मार्केट बंद राहणार का? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. काही राज्यात बँक होली डे असणार आहे. परंतु, शेअर मार्केट खुलं राहणार आहे.एनएसई, बीएसईमध्ये कामकाज सुरु राहणार आहे. रिझर्व्ह बँकेकडून बँक होलीडे 2025 चं कॅलेंडर अधिकृतपणे जाहीर केलं नाहीय. परंतु, मीडिया रिपोर्ट्सनुसार, बुधवारी नवीन वर्षाच्या सुरुवातीला देशभरात बँका बंद राहतील.
ऑनलाईन बँकिंग राहणार सुरु
बँकांना सुट्टी असली, तरी ग्राहकांना ऑनलाईन बँकिंगचा दिलासा राहणार आहे. ऑनलाईन आणि मोबाईल बँकिंग सेवा सुरु राहणार आहे. या सुविधेच्या माध्यमातून ग्राहक आर्थिक व्यवहार करू शकतात. मोबाईल बँकिंग अॅप्सच्या माध्यमातून किंवा एटीएममधून पैसे काढता येतील.
हे ही वाचा >> New Rule 2025 : नवीन वर्षात बदलणार 'हे' 10 मोठे नियम! तुमच्या खिशाला लागणार कात्री?
जानेवारी 2025 बँक होली डे
1 जानेवारी 2025 : बुधवारी नवीन वर्षाच्या दिवशी देशभरात बँका बंद राहतील.
6 जानेवारी 2025 : सोमवारी गुरु गोविंद सिंह जयंतीच्या निमित्ताने पंजाबसह काही राज्यात बँका बंद राहतील.
11 जानेवारी 2025 : दूसरा शनिवार, देशभरात बँका बंद राहतील
12 जानेवारी 2025 : रविवारी साप्ताहिक सुट्टी
13 जानेवारी 2025 : सोमवारी पंजाब आणि काही राज्यात बँका बंद राहतील
14 जानेवारी 2025 : संक्रांत निमित्ताने मंगळवार तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशमध्ये बँका बंद राहतील.
हे ही वाचा >> Manoj Jarange : "आरोपींना पाठबळ देणारे मुख्यमंत्र्यांसोबत चहा पितायत...", कराड शरण, धनंजय देशमुख, जरांगे काय म्हणाले?
15 जानेवारी 2025 : बुधवारी तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये बँकांचं कामकाज बंद राहील.
23 जानेवारी 2025 : गुरुवारी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त अनेक राज्यात बँकांना सुट्टी राहणार आहे.
25 जानेवारी 2025 : शनिवारी साप्ताहिक सुट्टी असल्याने देशभरात बँका बंद राहतील.
26 जानेवारी 2025 : रविवारी गणराज्य दिनानिमित्त देशभरात बँकांना सुट्टी राहील.
30 जानेवारी 2025 : सिक्कीममध्ये बँकांना सुट्टी राहील.