Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेत 'त्या' महिलांना मिळणार नाहीत 2100? CM फडणवीसांनी केली घोषणा
Devendra Fadnavis On Ladki Bahin Yojana: राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाल्यानं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले. महायुतीला बहुमत मिळण्यामागे महिलांचं मोठं योगदान असल्याचं समोर आलंय.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लाडकी बहीण योजनेबाबत केलं मोठं विधान
महिलांना लाडकी बहीण योजनेचे 2100 रुपये कधी मिळणार?
....म्हणून त्या महिलांना मिळणार नाही लाडकी बहीण योजनेचा लाभ
Devendra Fadnavis On Ladki Bahin Yojana: राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाल्यानं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले. महायुतीला बहुमत मिळण्यामागे महिलांचं मोठं योगदान असल्याचं समोर आलंय. लाडकी बहीण योजनेमुळे विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळाल्याचं बोललं जात आहे. अशातच मुख्यमंत्री होताच देवेंद्र फडणवीसांनी लाडकी बहीण योजनेबाबत मोठी घोषणा केलीय.
ADVERTISEMENT
राज्याचे CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
राज्याच्या विधानसभा निवडणुकीआधी महायुतीने लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांना दरमहा 2100 रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं. या पार्श्वभूमीवर फडणवीस म्हणाले, आम्हाला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरु ठेवायची आहे. आम्ही महिलांना 2100 रुपयेही देणार आहोत. आम्ही अर्थसंकल्पात याबाबत विचार करणार आहोत. आम्ही वित्तीय साधनांच्या योग्य चॅनलायजेशनंतरच असं करू शकतं. आम्ही दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करू. आम्ही यासाठी योग्य ती व्यवस्था करू.
हे ही वाचा >> Aaditya Thackeray : मारकडवाडीचा मुद्दा पेटणार? आमदारांनी शपथच घेतली नाही, आदित्य ठाकरे म्हणाले आता राज्यभर...
'या' महिला लाडकी बहीण योजनेतून होणार बाहेर
लाडकी बहीण योजनेतील महिला लाभार्थ्यांच्या नोंदींची तपासणी केली जाईल, असं बोललं जात आहे. तसच काही महिलांना या योजनेतून बाहेर केलं जाईल. यावर प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले, जर कोणी योजनेच्या निकषांचं पालन न करताच लाभ घेतला असेल, तर यावर विचार केला जाईल. ज्या महिलांनी नियमांचं पालन केलं आहे, त्या कोणत्याही महिलेचं नाव काढलं जाणार नाही.
हे वाचलं का?
हे ही वाचा >> Nilesh Rane: "कोकणातून उद्धव ठाकरेच्या पक्षाला हद्दपार..."; विधानभवनात आमदार निलेश राणे कडाडले
पुढील अर्थसंकल्पात घेतला जाईल मोठा निर्णय
राज्यात लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून जवळपास 2.43 कोटी महिलांना लाभ मिळाला आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांच्या खात्यात दरमहा 1500 रुपये जमा केले जात आहेत. यासाठी राज्य सरकारला प्रत्येक महिन्याला 3700 कोटी रुपये खर्च करावा लागतो. आता लाभार्थ्यांच्या नोंदीची तपासणी आणि अर्थसंकल्पानंतरच महिलांना वाढीव रक्कम दिली जाणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT