कामाची बातमी: 'या' 7 स्टेप्स फॉलो करा, आता घर बसल्याच मिळवा Driving Licence
आताच्या डिजिटल युगात ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज करण्याची प्रक्रिया अगदीच सोपी आणि सोयीस्कर झाली आहे. भारत सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाइट, ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस पोर्टलद्वारे तुम्ही घरबसल्या ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अप्लाय करू शकता.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

ड्रायव्हिंग लायसन्ससाठी घरबसल्या अर्ज करण्याची प्रक्रिया

ड्रायव्हिंग लायसन्स घरबसल्या कसं मिळवता येते?

ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी ऑनलाईन टिप्स
Driving License Online Apply: भारतात ड्रायव्हिंग लायसन्स (Driving Licence) हे एक महत्त्वपूर्ण दस्तऐवज मानलं जातं. या महत्त्वाच्या कागदपत्रामुळे वाहन चालवण्याची कायदेशीर परवानगी प्राप्त होते. आताच्या डिजिटल युगात ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज करण्याची प्रक्रिया अगदीच सोपी आणि सोयीस्कर झाली आहे. भारत सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाइट, ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस पोर्टलद्वारे तुम्ही घरबसल्या लर्निंग लायसन्स (Learner’s Licence) आणि कायमस्वरूपी ड्रायव्हिंग लायसन्स (Permanent Driving Licence) साठी अर्ज करू शकता. जाणून घ्या, स्टेप बाय स्टेप प्रक्रिया.
ऑनलाइन ड्रायव्हिंग लायसन्ससाठी कसं अप्लाय कराल?
ड्रायव्हिंग लायसन्स मिळविण्याची प्रक्रिया दोन टप्प्यात आहे:
- लर्निंग लायसन्स
- कायमस्वरूपी ड्रायव्हिंग लायसन्स
दोन्हीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया पुढीलप्रमाणे
1. वेबसाइट वर जा: sarathi.parivahan.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
2. राज्य निवडा: तुम्ही राहत असलेलं राज्य निवडा.
3. सेवा पर्याय निवडा:
- जर तुम्ही पहिल्यांदा ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अप्लाय करत असाल तर 'Apply for Learner License ' पर्याय निवडा.
- जर तुमच्याकडे लर्निंग लायसन्स असेल तर 'Apply for Driving License ' हा पर्याय निवडा.
4. फॉर्म भरा: फॉर्ममध्ये आवश्यक ती माहिती भरा आणि महत्त्वाचे दस्तऐवज अपलोड करा.
5. शुल्क भरा: ऑनलाइन पर्यायांचा वापर भरून शुल्क भरा.
6. टेस्ट शेड्यूल करा: ड्रायव्हिंग टेस्टसाठी स्लॉट बुक करा.
7. RTO ला उपस्थिती लावा: आवश्यक कागदपत्रांसह नियोजित तारखेला RTO कार्यालयात भेट द्या.
हे ही वाचा: Today Gold Rate : अहो राव, काय ते सोन्याचे भाव! सोनं पुन्हा कडाडलं, आजचे दर वाचून सर्वांनाच बसलाय धक्का
ड्रायव्हिंग लायसन्ससाठी आवश्यक कागदपत्रे
ओळखपत्र: आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट इ.
पत्त्याचा पुरावा: वीजबील, रेशन कार्ड, बॅंक स्टेटमेंट इ.
वय प्रमाणपत्र: 10 वीची मार्कशीट, जन्म प्रमाणपत्र इ.
फोटो: 2 ते 3 पासपोर्ट साइज फोटोज
वैद्यकीय प्रमाणपत्र:
- 40 वर्षांपेक्षा कमी वयासाठी: फॉर्म 1 (स्व-घोषणापत्र).
- 40 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या व्यक्तींसाठी: फॉर्म 1A (वैद्यकीय प्रमाणपत्र).
ड्रायव्हिंग लायसन्स मिळविण्याचा खर्च
वाहनाच्या प्रकारानुसार आणि राज्य नियमांनुसार शुल्क बदलू शकते. नेहमीचे शुल्क खालीलप्रमाणे आहे:
शिकण्याचा परवाना:
अर्ज शुल्क: 150 ते 200 रुपये
टेस्ट शुल्क: 50 रुपये (पुनर्चाचणीसाठी अतिरिक्त 50 रु.)
परमनन्ट (Permanent)ड्रायव्हिंग लायसन्स:
अर्ज शुल्क: 200 ते 400 रुपये
टेस्ट: 300 रुपये (काही राज्यांमध्ये)
स्मार्ट कार्ड शुल्क: 200 रुपये
इतर शुल्क (लागू असल्यास)
- ड्रायव्हिंग स्कूल प्रमाणपत्र: 500 ते 1000 रुपये (खाजगी संस्थांवर अवलंबून)
- डुप्लिकेट लायसन्स: 200 ते 500 रुपये
- आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग लायसन्स: 1000 रुपये
टीप: नेमके शुल्क जाणून घेण्यासाठी तुमच्या राज्याच्या RTO पोर्टल किंवा वाहतूक वेबसाइटवर तपास करा.
हे ही वाचा: Personal Finance: मुलीच्या लग्नासाठी मिळतील 27 लाख रुपये, LIC चा हा प्लॅन पाहिला का, फक्त 121 रुपयात!
प्रक्रियेसाठी लागणारा कालावधी
लर्निंग लायसन्स: अर्ज केल्यानंतर आणि टेस्ट पास झाल्यानंतर लर्निंग लायसन्स त्याच दिवशी किंवा 1 ते 2 दिवसांच्या आत पीडीएफ स्वरूपात उपलब्ध होते.
काही राज्यांमध्ये ते 7 ते 14 दिवसांच्या आत पोस्टाने पाठवले जाते.
कायमस्वरूपी वाहन चालविण्याचं लायसन्स: ड्रायव्हिंग टेस्ट उत्तीर्ण झाल्यानंतर 7 ते 30 दिवसांच्या आत लायसन्स पोस्टाने तुमच्या पत्त्यावर पोहोचते.
ऑनलाइन डाउनलोड पर्याय देखील उपलब्ध असू शकतो.
टीप: कालावधी RTO कार्यालयाच्या कार्यक्षमतेवर आणि अर्जांच्या संख्येवर अवलंबून असतो.