Health Tips : जोर लावूनही पोट साफ होत नाही? 'हे' उपाय केल्यास झटपट होईल समस्या दूर

मुंबई तक

ADVERTISEMENT

constipation home remedies warm milk and ghee get relief from constipation
एकदा मल घट्ट झाला की तासनतास टॉयलेट सीटवर बसून राहावं लागतं.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पोट साफ न होणे म्हणजेच बद्धकोष्ठतेचा त्रास

point

चुकीच्या खानपानामुळे तब्येतीवर परिणाम होतो

point

अनेकांना मल त्याग करण्यात समस्या येतात

Constipation Home Remedies : सकाळी सकाळी अनेकांचे पोट साफ होत नाही. मग ना कामात मन लागत ना कशात. सकाळी पोट साफ होणे, ही एक हेल्दी गोष्ट आहे. पोट साफ न होणे म्हणजेच बद्धकोष्ठतेचा त्रास हा आपल्याला आपल्या चुकीच्या खानपानामुळे होतो. अनहेल्दी फुडचे सेवन, खाण्यापिण्यात अनियमितता, शरीरात पाणी कमी होणं आणि शरीरात फायबर्सची कमतरता यामुळे तब्येतीवर चुकीचा परिणाम होतो. त्यामुळे अनेकांना मल त्याग करण्यात समस्या येतात. मल अधिकाधिक घट्ट होत जातो. एकदा मल घट्ट झाला की तासनतास टॉयलेट सीटवर बसून राहावं लागतं. तरीसुद्धा पोट साफ होत नाही. त्यामुळे या समस्येपासून सुटका करून देण्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही उपाय सांगणार आहोत. हे उपाय काय आहेत? हे जाणून घेऊयात. (constipation home remedies warm milk and ghee get relief from constipation)

ADVERTISEMENT

बद्धकोष्ठता म्हणजेच पोट साफ न होण्याच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही गरम दुधाचे सेवन करू शकता. पोटाच्या समस्या टाळण्यासाठी रात्री दूध पिण्याच सल्ला दिला जातो. रात्रीच्यावेळी एक ग्लास गरम दूधात २ चमचे तूप घालून प्यायल्याने गॅसच्या समस्येपासून आराम मिळतो. अशा प्रकारे दूध प्यायल्याने सकाळी पोट सहज साफ होते आणि मल त्याग करणं सोपं होतं.

हे ही वाचा : Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेत 6 मोठे बदल, वाचा काय आहेत नव्या अटी शर्ती?

पोट साफ होण्यासाठी खास उपाय

लिंबाचा रस 

लिंबाच्या रसाचे सेवन केल्याने गॅसपासून सुटका मिळते. रात्री झोपण्याच्याआधी एक ग्लास पाण्यात लिंबाचा रस मिसळून सकाळी ते प्यायल्याने पोट साफ होण्यास मदत होते. याव्यतिरिक्त एक ते दोन वेळा लिंबू पाणी पिऊ शकता.गॅस झाल्यानंतर तुम्ही जितके जास्त तरल पदार्थ खाल तितका जास्त फायदा होईल. 

हे वाचलं का?

ऑलिव्ह ऑईल

सकाळी एक चमचा ऑलिव्ह ऑईलचे सेवन करा यामुळे गॅसच्या समस्येपासून आराम मिळेल. ऑलिव्ह ऑईलमुळे पचनक्रिया चांगली राहते आणि ल्युब्रिकेट्ंसप्रमाणे काम करते. ज्यामुळे खाल्लेल्या अन्नाचे पचन व्यवस्थित होते, मल त्याग करणं सोपं होतं.

हे ही वाचा : Shyam Manav : फडणवीसांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणारे श्याम मानव कोण?

आल्याचे सेवन करा

आल्याचे सेवन केल्यास गॅसेसच्या समस्येवर आराम मिळतो. आलं बारीक करून ते गरम पाण्यात मिसळून या चहाचे सेवन करा. आल्याचा हा हर्बल चहा प्यायल्याने गॅस याव्यतिरिक्त पोट फुगणं, भिती वाटणं या समस्या दूर होण्यास मदत होते.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT