सावधान! प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये पाणी पिताय? 'हे' 3 धोकादायक आजार होतील? कसं ते जाणून घ्या

मुंबई तक

Drinking Water In Plastic Bottles : दैनंदिन जीवनात मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा वापर होत असतो. किचनच्या भांड्यांपासून ते पाण्याच्या बाटल्यापर्यंत प्रत्येक गोष्टींमध्ये प्लास्टिकचा वापर केलेला असतो.

ADVERTISEMENT

Drinking Water In Plastic Bottles, Impact On Health Drinking Water In Plastic Bottles, Impact On Health
Drinking Water In Plastic Bottles, Impact On Health
social share
google news

बातम्या हायलाइट

point

प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये पाणी पिणं किती धोकादायक?

point

'हे' धोकादायक आजार तोंड वर करू शकतात

point

जाणून घ्या सविस्तर माहिती

Drinking Water In Plastic Bottles : दैनंदिन जीवनात मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा वापर होत असतो. किचनच्या भांड्यांपासून ते पाण्याच्या बाटल्यापर्यंत प्रत्येक गोष्टींमध्ये प्लास्टिकचा वापर केलेला असतो. कप, प्लेट किंवा स्ट्रॉ अशा अनेक वस्तू प्लास्टिकपासूनही बनवलेल्या असतात. दरम्यान, प्रदुषण रोखण्यासाठी प्लास्टिकचा वापरणं टाळा, अशा सूचना देऊन सरकार लोकांना जागरूक करण्याचं काम करतं. तरीही काही लोक प्लास्टिकचा वापर सऱ्हासपणे करत असल्याचं पाहायला मिळतंय. पण तुम्हाला प्लास्टिकबाबत काही महत्त्वाच्या गोष्टी माहित असणं खूप गरजेचं आहे.

ज्या प्लास्टिकच्या बाटल्यांमधून लोक पाणी पितात, त्यामुळे धोकादायक आजार होऊ शकतात. टाईम्स ऑफ इंडियाच्या माहितीनुसार, पाणी साठवून ठेवण्यासाठी वापरण्यात आलेल्या प्लास्टिकच्या बाटल्यांमुळे फ्लोराइड, आर्सेनिक आणि बीपीएसारखे धोकादायक द्रव्य काढले जातात. यामुळे कर्करोग, मधुमेह म्हणजे डायबिटीज आणि इम्यूनिटीसारखे गंभीर आजार होऊ शकतात. प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये पाणी प्यायल्याने आरोग्याच्या कोणत्या समस्या निर्माण होऊ शकतात? याबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती.

हे ही वाचा >> Jaykumar Gore : राऊतांनी गंभीर आरोप केले, ज्युनिअर किरीट सोमय्या म्हटलं... जयकुमार गोरेंचं प्रकरण काय?

धोकादायक पदार्थ 

प्लास्टिकमध्ये असलेल्या धोकादायक पदार्थांशिवाय, प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये पाणी ठेवल्याने फ्लोराईड, आर्सेनिक आणि अॅल्युमिनियमसारखे धोकादायक पदार्थही असतात. हे पदार्थ मानवी आरोग्यासाठी जीवघेणेही ठरू शकतात. त्यामुळे प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये पाणी पिणं आरोग्यासाठी धोकादायक आहे. यामध्ये असलेले विषारी पदार्थ शरीरात मिसळतात आणि आरोग्य बिघडतं.

डायऑक्सिन उत्पादन

प्लास्टिक गरम वातावरणात वितळतं. पण लोक नेहमी प्रवासादरम्यान प्लास्टिकच्या बाटल्यांमधून पाणी पितात. पण कारमध्ये या पाण्याच्या बाटल्या ठेवल्यास त्याचा संपर्क सूर्यकिरणांशी होतो. बाटल्या गरम झाल्याने त्यातून डायऑक्सिन नावाचं विषारी द्रव्य बाहेर पडतं. यामुळे स्तन कॅन्सरचा धोका निर्माण होऊ शकतो. 

हे ही वाचा >> Marathi Language: 'घाटकोपरची भाषा गुजराती', असं म्हणणारे RSS चे भैय्याजी जोशी आहेत तरी कोण?

डायबिटीज

बिस्फेनॉल एक औद्योगिक रसायन आहे. याचा उपयोग प्लास्टिक बनवण्यासाठी केला जातो. यामुळे मधुमेह, लठ्ठपणा आणि प्रजननसंबंधीत समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये असलेलं पाणी न पिणेच आरोग्यासाठी चांगलं ठरू शकतं.

विटॅमीनयुक्त पाणी

बाजारात प्लास्टिकच्या बाटल्यांमध्येच पाण्याच्या जास्त साठा असल्याचं दिसतं. बाटल्यांमध्ये असलेल्या पाण्यात जास्त विटॅमीन्स असतात, असं कंपन्यांकडून सांगितलं जातं. परंतु, हे आणखी धोकादायक आहे. कारण यामध्ये रंग आणि हाय फ्रुक्टोज कॉर्न सिरपसारखे पदार्थ धोकादायक असतात. प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये पाणी प्यायल्याने आपल्या इम्युनिटी सिस्टमवरही धोकादायक परिणाम होऊ शकतो.

टीप - सूत्रांच्या आधारावर ही माहिती देण्यात आली आहे. मुंबई तक या माहितीची पुष्टी करत नाही. 


 

हे वाचलं का?

    follow whatsapp