Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! 'या' महिन्यात मिळणार 6 व्या हफ्त्याचे 1500?

मुंबई तक

ADVERTISEMENT

तिसऱ्या टप्प्याचा लाभ हस्तांतरण झाला
तिसऱ्या टप्प्याचा लाभ हस्तांतरण झाला
social share
google news

बातम्या हायलाइट

point

लाडकी बहीण योजनेचा सहावा हफ्ता कधी मिळणार?

point

लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट आली समोर

point

...तरच मिळेल लाडकी बहीण योजनेचा लाभ

Ladki Bahin Yojana Latest News: राज्यातील महिलांसाठी दिलासा देणारी अपडेट समोर आलीय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने सुरु केलेल्या लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत राज्यातील लाखो महिलांना सहाव्या हफ्त्याचे पैसे डिसेंबर महिन्यात मिळणार असल्याची चर्चा आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेने राज्यातील विधानसभा निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. 

ADVERTISEMENT

महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक सहाय्यता

राज्यातील 18-65 वर्ष वयोगटातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणं हा लाडकी बहीण योजनेचा उद्देश आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना दरमहा 1500 रुपये देण्याची तरतूद महायुती सरकारने केली आहे. राज्य सरकारकडून ही रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँख खात्यात जमा केली जाते. जुलै 2024 मध्ये सुरु झालेल्या या योजनेचा ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा हफ्ता सरकारने याआधीच महिलांच्या खात्यात जमा केला आहे.

हे ही वाचा >> Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली बाबा आढावांची भेट, म्हणाले,  "त्यावेळी EVM बद्दल कोणी..."

निवडणुकीत झाला योजनेचा लाभ

राज्याची विधानसभा निवडणूक 2024 मध्ये लाडकी बहीण योजनेनं महत्त्वाची भूमिका बजावली. ही योजना निवडणुकीचा प्रमुख मुद्दा बनली. या योजनेच्या माध्यमातून सरकारने महिलांना आर्थिक लाभ दिला. राज्यातील लाखो महिलांना या योजनेचा लाभ मिळत आहे. महिलांनी मोठ्या प्रमाणात महायुतीला समर्थन दर्शवल्याचं सांगितलं जात आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा >> 30th November Gold Rate: सोनं घ्या सोनं! 24 तासातच सोन्याच्या भावात मोठी घसरण, मुंबईत आजचे भाव काय?

डिसेंबरमध्ये मिळणार सहावा हफ्ता

राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं आहे. आता लाभार्थी महिलांना डिसेंबरमध्ये वितरित होणाऱ्या लाडकी बहीण योजनेच्या हफ्त्याची प्रतिक्षा लागली आहे. राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदित तटकरे यांनी आधीच घोषणा केली होती की, योजनेच्या माध्यमातून जुलै आणि सप्टेंबरचा हफ्ता आधीच लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबरचा हफ्ताही 2 कोटी 34 लाख महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. आता सरकारने डिसेंबरच्या हफ्त्याची रक्कम महिलांच्या खात्यात वेळेत जमा केली, तर महिलांना मोठा दिलासा मिळेल.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT