Ganesh Chaturthi: 2025, 2026, 2027 साली कोणत्या तारखेला येणार गणपती बाप्पा? पुढच्या वर्षी तर...

मुंबई तक

ADVERTISEMENT

ganesh chaturthi 2024 what was the date of ganesh chaturthi 2025 2026 and 2027 One and a half day ganesh immersion read full story
आता 11 दिवसांचा पाहूणचार करून बाप्पा निरोप घेणार आहेत.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पुढच्या वर्षी 'या' तारखेला येणार बाप्पा

point

12 दिवस लवकर होणार आगमन

point

गणेश चतुर्थीची तारीख काय?

Ganesh Chaturthi 2025 : यंदा 7 सप्टेंबरपासून गणेशोत्सवाची सुरुवात झाली आहे. आता 11 दिवसांचा पाहुणचार घेऊन बाप्पा निरोप घेणार आहेत. तर काल (8 ऑगस्ट) दीड दिवसांच्या (One and a half day)  बाप्पांचं विसर्जन पार पडलं. आता येत्या बुधवारी पाच दिवसांचे बाप्पा निरोप घेणार आहेत. मात्र असं असलं तरी गणेशभक्तांना बाप्पा पुढच्या वर्षी कधी येणार याचीच उत्सुकता लागून राहिली आहे. (Ganesh Chaturthi 2025) पुढच्या वर्षी बाप्पा हे नेमके कधी येणार, त्यांच्या आगमनाची नेमकी तारीख काय आहे? हेच आम्ही आपल्याला आता सांगणार आहोत. (ganesh chaturthi 2024 what was the date of ganesh chaturthi 2025 2026 and 2027 One and a half day ganesh immersion read full story)

रविवारी दीड दिवसाच्या बाप्पांचे विसर्जन झाले आहे. त्यामुळे या विसर्जनाला गणेशभक्तांनी बाप्पांना 'पुढच्या वर्षी लवकर या' अशा घोषणा देऊन लवकर येण्याची साद घातली आहे. भक्तांची हीच हाक बाप्पाने देखील ऐकली असून पुढच्या वर्षी बाप्पाचं आगमन लवकर होणार आहे. बाप्पा पुढच्या वर्षी तब्बल 12 दिवस लवकर येणार आहेत. यंदाच्या वर्षी गणेश चतुर्थी ही शनिवारी 7 सप्टेंबरला 2024 ला होती. तर पुढच्या वर्षी गणेश चतुर्थी ही 27 ऑगस्टला असणार आहे. त्यामुळे पुढच्या वर्षी गणपती बाप्पा हे 12 दिवस लवकर येणार आहेत.

हे ही वाचा : Ladki Bahin Yojana : 'या' दिवशी 4500 महिलांच्या खात्यात डिपॉझिट होणार?

2026 आणि 2027 ला बाप्पाचं आगमन कधी होणार? 

हिंदू पंचांगानुसार दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीपासून गणेशोत्सव साजरा केला जातो.त्यानुसार 2026 ला गणेश चतुर्थी ही 14 सप्टेंबरला असणार आहे. त्यामुळे 2025 च्या तारखेनुसार बाप्पा तब्बल 24 दिवस उशिराने येणार आहेत. त्यामुळे गणेशभक्तांना जास्त वाट पाहावी लागणार आहे. त्याचबरोबर 2027 मध्ये बाप्पांचे आगमन हे 4 सप्टेंबरला होणार आहे. त्यामुळे 2027 मध्ये बाप्पांचे 10 दिवस लवकर आगमन होणार आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ या जयघोषात रविवारी दीड दिवसांच्या घरगुती गणपती बाप्पांना निरोप देण्यात आला. दीड दिवसांच्या बाप्पाचे जयघोषात विसर्जन करण्यात आले. संपूर्ण राज्यभरासह गणेशोत्सव प्रसिद्ध असणाऱ्या कोकणात देखील दीड दिवसांच्या गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यात आले आहे. तर कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील घरगुती गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यात आले. संपूर्ण राज्यभरात दीड दिवसांच्या गणपती बाप्पाचे मोठ्या जयघोषात, जड अंतःकरणाने विसर्जन करण्यात आले.

हे ही वाचा : Gold Price Today: सोन्याचे भाव स्थिरावले! खरेदीआधी एका क्लिकवर तपासा आजचे दर...

आता या दीड दिवसांच्या विसर्जनानंतर गणेशभक्तांना पुन्हा एकदा गणेश चतुर्थीच्या आगमनाची आतुरता लागली आहे. त्यानुसार आता पुढच्या वर्षी 27 ऑगस्टला गणपती येणार आहेत. त्यामुळे आतापासून गणेशभक्तांना गणेश चतुर्थीची आतुरता लागली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT