Kitchen Tips: आठवडाभर कोथिंबीर राहील फ्रेश! फ्रिजमध्ये ठेवण्याआधी 'या' 3 गोष्टी अजिबात विसरू नका
How To Keep Coriander Fresh : हिरवी कोथिंबीर किंवा कोथिंबीरीची पाने खाद्य पदार्थांना आणि जेवणाला स्वादिष्ट बनवते. परंतु, कोथिंबीर गरमीच्या दिवसात स्टोर करणं कठीण असतं.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

'हे' आहेत कोथिंबीर स्वच्छ आणि फ्रेश ठेवण्याचे सोपे उपाय

कोथिंबीर फ्रिजमध्ये ठेवण्याआधी या गोष्टी लगेच करा

कोथिंबीर आठवडाभर अजिबात खराब होणार नाही, फक्त...
How To Keep Coriander Fresh : हिरवी कोथिंबीर किंवा कोथिंबीरीची पाने खाद्य पदार्थांना आणि जेवणाला स्वादिष्ट बनवते. परंतु, कोथिंबीर गरमीच्या दिवसात स्टोर करणं कठीण असतं. म्हणजे कोथिंबीर आज खरेदी केली तर उद्या लगेचच ती खराब होते. अशा परिस्थितीत कोथिंबीर स्टोअर करण्याची योग्य पद्धत कोणती? याबाबत तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. फ्रिजशिवाय तुम्ही कोथिंबीर साध्या ओल्या कपड्यात ठेवू शकता. तुम्हाला कोथिंबीर दिर्घकाळासाठी ठेवायची असेल, तर तुम्ही कोथिंबीर फ्रिजमध्ये ठेऊ शकता. पण तुम्ही जर फ्रिजमध्येही कोथिंबीर उघडी ठेवली, तर थंडीतही कोथिंबीर सुकेल. अशा स्थितीत कोथिंबीर स्टोर करण्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या ट्रिक्स फॉलो करू शकता.
फ्रिजमध्ये कोथिंबीर ठेवण्याआधी करा हे काम
1) मुळांना कापून टाका आणि कोथिंबीर साफ करा
हिरवी कोथिंबीर स्टोअर करण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी कोथिंबीरीच्या मुळांना कापलं पाहिजे. कोथिंबीर अशा पद्धतीने साफ करा की, यामध्ये खराब झालेली पाने अजिबात राहणार नाहीत. कारण कोथिंबीरीच्या पानांना साफ न करता ठेवले, तर ती कोथिंबीर लवकर खराब होऊ शकते.
हे ही वाचा >> Amit Shah: "फक्त मार्केटिंग करून नेता बनू नका, त्यासाठी जमिनीवर...", सहकार परिषदेत अमित शाहांचा शरद पवारांवर निशाणा
2) पेपरमध्ये कोथिंबीरीला गुंडाळून ठेवा
कोथिंबीर खराब होऊ नये यासाठी तुम्ही फ्रेश कोथिंबीर पेपरमध्ये गुंडाळून ठेऊ शकता. याशिवाय तुम्ही कोथिंबीरीला एखाद्या पेपर बॅगमध्येही ठेऊ शकता. याचा फायदा असा होईल की, फ्रिजमध्ये असलेली ठंड हवा आवश्यकतेप्रमाणे कोथिंबीरीला मिळेल आणि कोथिंबीर फ्रेश राहील.
हे ही वाचा >> Ankit Chatterjee : दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने मोडला सौरव गांगुलीचा विक्रम! अंकित चॅटर्जी आहे तरी कोण?
3) व्हेजिटेबल बास्केटमध्ये स्टोअर करा
सामान्य माणसं अशाप्रकारची चूक नेहमीच करतात. ते हिरवी कोथिंबीर फ्रिजच्या दरवाज्यासमोर किंवा वरच्या कोपऱ्यात ठेऊन देतात. पण तुम्ही कोथिंबीर नेमही व्हेजिटेबल बास्केमध्ये ठेवली पाहिजे. यामुळे आवश्यकतेप्रमाणे कोथिंबीरीला थंड तापमान मिळतं आणि कोथिंबीर ताजी राहते आणि लगेच सुकत नाही.