Kitchen Tips: अरेरेरे! कपडे-पडदे, बेडशीटवर लागलेत तेलाचे डाग? 'या' सोप्या ट्रिक्सने होतील झटपट स्वच्छ

मुंबई तक

ADVERTISEMENT

How to Remove Oil Stains from Clothes,
How to Remove Oil Stains from Clothes,
social share
google news

बातम्या हायलाइट

point

डागलेले कपडे झटपट स्वच्छ कसे करायचे?

point

या सोप्या ट्रिक्सने तेलाचे डाग होतील झटपट नष्ट

point

या किचन टीप्सने तुमचा वेळही वाचेल अन् कपडेही होतील साफ

How to Remove Oil Stains from Clothes :  किचनमध्ये अनेकदा जेवण शिजवताना कपड्यांवर तेलाचे डाग लागतात. तुमच्या घरात लहान मुलं असतील, तर हे डाग कपडे, पडदे किंवा बेडशीट्सवरही लागलेले पाहायला मिळतील. या कपड्यांवर डाग लागल्यावर त्यांना साफ करणं खूप कठीण बनतं. त्यामुळे हे खराब झालेले कपडे लोकं बाहेर फेकून देतात. तुम्हीही डागललेले कपडे लगचे फेकून देत असाल, तर आम्ही तुम्हाला हे कपडे झटपट स्वच्छ करण्याच्या ट्रिक्स सांगणार आहोत. या सोप्या ट्रिक्सचा वापर केल्यावर तुमचे खराब झालेले कपडे नव्यासारखे दिसतील.

ADVERTISEMENT

कपड्यांना लागलेले डाग कसे साफ कराल?

गरम पाणी

तेलाचे डाग लागलेल्या कपड्यांना साफ करण्याचा प्रयत्न करा. जेव्हढा वेळ तुम्ही साफ करण्याचा प्रयत्न कराल, तेवढच ते कठीण होतं. अशातच तेलाचे डाग लागल्यावर सर्वात आधी कपडे, पडदे किंवा बेडशीटला गरम पाण्यात डिटर्जेंटने साफ करण्याचा प्रयत्न करा. असं केल्याने कपड्यांना लागलेले डाग साफ होतील.

हे ही वाचा >> Mazi Ladki Bahin Yojana: गुड न्यूज… नोव्हेंबरमध्ये ‘या’ तारखेला मिळणार १५०० रुपये

टेलकम पावडर

कपड्यांवर तेलाचे डाग लागल्यावर त्या भागावर टेलकम पावडर टाका. टेलकम पावडरमुळे तेल सुकण्यास मदत होते. यामुळे कपड्यांवर डाग लागत नाही. कपड्यावर टेलकम पावडर टाकल्यावर ते कपडे 20-30 मिनिटांसाठी तसेच ठेवा. त्यानंतर ब्रशच्या मदतीने त्या भागाला रगडा आणि गरम पाण्यात डिटर्जंट टाकून साफ करा.

बेकिंग सोडा

जर कपड्यांवरचे डाग खूप दिवसांपूर्वीचे असतील, तर तुम्ही बेकिंग सोडाच्या मदतीने हे कपडे साफ करू शकता. यासाठी कपड्याला ज्या ठिकाणी डाग लागले आहेत, त्या भागावर बेकिंग सोडा मिक्स केलेले पाणी टाका. त्यानंतर कपड्याचा तो भाग हाताने रगडा. त्यानंतर थोड्या वेळाने त्यावर गरम पाणी टाकून ते साफ करा.

हे ही वाचा >>  Shahrukh Khan Birthday: सर्वात आश्चर्यकारक Video आला समोर, किंग खानच्या 'मन्नत' बंगल्यासमोर घडलंय तरी काय?

व्हाईट व्हिनेगार

सफेद व्हिनेगारही तेलाने माखलेल्या कपड्यांना साफ करण्यात उपयोगी ठरतो. यासाठी सफेद व्हिनेगारलाही सोडाप्रमाणे कपड्याला लावा. त्यानंतर कपडे थोडा वेळ तसेच ठेवा. त्यानंतर गरम पाण्यात धुवा.

ADVERTISEMENT

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT