Ladki Bahin Yojana : महिलांनो, तुमच्या 'या' खात्यात 4500 होणार जमा?
Mukhymantri Ladki Bahin Yojana Scheme : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आता तिसरा हप्ता महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. गेल्या तीन दिवसात ही हप्ता जमा होणार असल्याची माहिती आहे. मात्र अद्याप याबाबत कोणतीही अपडेट समोर आली नाही.मात्र असे असले तर तुमच्या वाट्याला येणारे पैसे नेमके कोणत्या बँकेत जमा होणार आहेत? हे जाणून घेऊयात.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
4500 या खात्यात जमा होणार
आधार बँकेशी जोडलंय ना
या दिवशी खात्यात पैसे जमा होणार
Mukhymantri Ladki Bahin Yojana Scheme : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आता तिसरा हप्ता महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. गेल्या तीन दिवसात ही हप्ता जमा होणार असल्याची माहिती आहे. मात्र अद्याप याबाबत कोणतीही अपडेट समोर आली नाही.मात्र असे असले तर तुमच्या वाट्याला येणारे पैसे नेमके कोणत्या बँकेत जमा होणार आहेत? हे जाणून घेऊयात. ( ladki bahin yojana 4500 amount deposite women these account know the full details)
ज्या महिलांनी 31 जुलै आधी अर्ज भरले होते आणि त्यांचे अर्ज देखील मंजूर झाले होते. त्या महिलांच्या खात्यात ऑगस्ट महिन्यात रक्षाबंधनाच्या दिवशी ओवाळणी म्हणून 3000 रूपये जमा झाले होते. या योजनेत दरमहा 1500 रूपये दिले जातात. पण या महिलांना जुलै आणि ऑगस्ट अशा दोन महिन्यांचे एकत्रित 3000 रूपये देण्यात आले होते. आता ऑगस्टपर्यंतचा निधी या महिलांना मिळाला होता. आता उरला फक्त चालू असलेला सप्टेंबर महिना आहे. त्यामुळे या महिलांच्या खात्यात सप्टेंबर महिन्याचे 1500 रूपये जमा होणार आहेत.
हे ही वाचा : ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! योजनेची रक्कम वाढणार, फक्त...
आणि ज्या महिलांना 31 जुलैआधी अर्ज भरता आले नव्हते. तसेच अर्ज भरून देखील मंजूर झाले नव्हते. अशा महिलांच्या खात्यात हे 4500 जमा होणार आहे. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा तीन महिन्याचे पैसे हे जमा होणार आहेत. त्यामुळे ज्या महिलांचा अर्ज मंजूर होऊन खात्यात एकही रूपया आला नाही आहे, अशा महिलांच्या खात्यात 4500 जमा होणार आहे. पण हे पैसै नेमके कोणत्या खात्यात जमा होणार आहेत? हे जाणून घेऊयात.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
आता अर्जात तुम्ही जे बँक अकाऊंट भरलं आहे त्या अकाऊंटमध्ये पैसे येणे अपेक्षित आहे. पण त्याआधी तुमचं बँक अकाऊंट आधारशी लिंक असणे गरजेचे आहे. जर आधार लिंक नसेल तर बँक खात्यात पैसेच जमा होणार नाही आहे. त्यामुळे पैसै जमा होण्याआधी बँक खाते आधारशी लिंक आहे की नाही हे तपासून घ्या.काही प्रकरणात महिलांना भरलंय एक बँक अकाऊंट आणि त्याच्या दुसऱ्याच खात्यात पैसै आले आहेत. त्यामुळे या गोष्टी टाळण्यासाठी तुमच्या हव्या त्या बँक खाते आधारशी जोडून घ्या. जे बँक अकाऊंट आधारशी जोडलेली असेल तर त्या बँकेत पैसे येणे अपेक्षित आहे.
हे ही वाचा : Ladki Bahin Yoajan: महिलांनो! लगेच मिळतील 4500 रुपये, पण Aadhaar कार्डचं 'हे' काम तातडीनं करा
'इतक्या' महिलांनी घेतला योजनेचा लाभ
''मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने अंतर्गत आतापर्यंत जवळपास दोन कोटी 40 लाखांपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले आहेत. यामध्ये जुलै महिन्यात अर्ज करणाऱ्या एक कोटी 7 लाख महिलांना ऑगस्ट महिन्यामध्ये लाभ देण्यात आला आहे. तसेच 31 ऑगस्ट रोजी नागपूरमध्ये एक कार्यक्रम झाला. त्यावेळी तब्बल 52 लाख महिलांना आम्ही या योजनेच्या माध्यमातून लाभ वितरीत केला'', अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली.
ADVERTISEMENT
''सप्टेंबर असेल किंवा आतापर्यंत जे काही अर्ज प्राप्त झाले आहेत. त्या अर्जांची छाननी सुरु आहे. ती छाननी पूर्ण झाल्यानंतर मला खात्री आहे की, दोन कोटी पेक्षा अधिक महिला यासाठी पात्र ठरतील. आमचा प्रयत्न आहे की, अडीच कोटी महिलांना या योजनेचा लाभ द्यायचा'', असंही आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT