Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेत 6 मोठे बदल, वाचा काय आहेत नव्या अटी शर्ती?

मुंबई तक

ADVERTISEMENT

ladki bahin yojana new changes cabinet meeting eknath shinde big relief for women mukhymantri majhi ladki bahin yojana update
लाडकी बहीण योजनते नेमके कोणते बदल करण्यात आले आहेत?
social share
google news

बातम्या हायलाइट

point

लाडकी बहीण योजनेच्या नियमात बदल

point

लाडकी बहीण योजनेच 6 नवीन बदल

point

नवीन नियम आणि अटी शर्ती काय आहेत?

Mukhyamantri Ladki Bahin Yojana Scheme : राज्यातील महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आहे. या योजनेला महिलांचा भरघोस प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत 1 कोटी महिलांनी ऑनलाईन अर्ज केले आहेत. त्यामुळे अर्जदार महिलांची संख्या वाढत असताना आता योजनेच्या नियमात पुन्हा एकदा बदल करण्यात आले आहे. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनते नेमके कोणते बदल करण्यात आले आहेत? हे जाणून घेऊयात. (ladaki bahin yojana new changes cabinet meeting eknath shinde big relief for women mukhymantri majhi ladaki bahin yojana update) 

ADVERTISEMENT

लाडकी बहीण योजनेची घोषणा झाल्यापासून योजनेत अनेक अटी शर्तींमध्ये शिथिलता आणण्यात आली होती. जेणेकरून महिलांना कागदपत्राची जुळवाजुळव शक्य होईल. मात्र तरी देखील अनेक महिलांना कागदपत्रांबाबत अजूनहू अडचणी येत होत्या. विशेष करून नवविवाहीत महिलांना अर्ज करण्यात अडचण येत होती. याची दखल आता सरकारने घेतली आहे. आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेऊन 6 नवीन अटी शर्ती लागू करण्यात आल्या आहेत. त्यानुसार आता लवकरच शासन निर्णय काढला जाणार आहे. या नवीन बदलामुळे पात्र महिलांना अर्ज करणे अधिक सुलभ होणार आहे. 

हे ही वाचा : Crime News : IAS पतीला धोका, गँगस्टरवर जडला जीव अन् नको ते घडलं...

नवे 6 बदल कोणते? 

या योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्ट बँक खाते ग्राह्य धरले जाणार आहे. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

एखाद्या महिलेचा जन्म परराज्यात झाला असेल आणि तिने महाराष्ट्रात अधिवास असलेल्या पुरूषासोबत विवाह केला तर त्या महिलेच्या पतीच्या कागदपत्रांवर योजनेचा लाभ मिळणार आहे.

ग्रामस्तरीय समितीच्यामार्फत प्रत्येक शनिवारी लाभार्थी महिलांच्या यादीचे वाचन करावे लागणार आहे. तसेच त्यात काही बदल असेल तर तोही करावा लागणार आहे.

ADVERTISEMENT

केंद्र सरकारच्या योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलेला लाभार्थी म्हणून ग्राह्य धरावे. मात्र, तिच्याकडून ऑफलाईन अर्ज भरून घेण्यात यावा.

ADVERTISEMENT

नवविवाहित महिलेची विवाह नोंदणी लगेच शक्य नसेल तर त्या महिलेच्या विवाह दाखल्यानुसार पतीचे रेशनिंग कार्ड पुरावा म्हणून ग्राह्य धरावे.

ओटीपीचा कालावधी दहा मिनिटांचा करण्यात आला आहे.

खात्यात पैसै कधी जमा होणार?

राज्याचे मुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले की, पहिला हफ्ता जमा करण्यासाठी सरकारने रक्षाबंधनाचा मुहूर्त साधला आहे. लाभार्थी महिलांच्या खात्यात 19 ऑगस्ट 2024 रोजी योजनेचे पैसे जमा होणार आहेत. जुलै आणि ऑगस्ट असे दोन्ही महिन्यांचे मिळून 3000 हजार रुपये जमा केले जाणार आहेत.

हे ही वाचा : MNS: राज ठाकरेंची मोठी घोषणा, विधानसभा स्वबळावर लढणार.. भाजपसोबत युती नाही!

माझी लाडकी बहीण योजनेसाठी सरकारने एका वर्षासाठी 46 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. 21 ते 65 वर्ष वयोगटातील महिला या योजनेसाठी अर्ज करू शकणार आहेत. त्यासाठी कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असणे आवश्यक असून, उत्पन्न दाखला नसेल, तर पिवळे वा केशरी रेशन कार्डही ग्राह्य धरले जाणार आहे. 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT