Ladki Bahin Yojana : 'लाडक्या बहिणीं'ची दिवाळी आणखी गोड, दोन्ही महिन्यांचे पैसे एकत्रच...

मुंबई तक

ADVERTISEMENT

ladki bahin yojana
'लाडक्या बहिणीं'ची दिवाळी आणखी होणार गोड
social share
google news

बातम्या हायलाइट

point

लाडक्या बहिणींचा दिवाळी गोड होणार

point

दिवाळी आधीच मिळाले 3000 रुपये

point

कुणाच्या खात्यात पैसे जमा होणार?

Mukhymantri Ladki Bahin Yojana Scheme : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत नुकताच महिलांच्या खात्यात चौथा हप्ता जमा झाला होता. या चौथ्या हप्त्यात महिलांच्या खात्यात ऑक्टोंबर आणि नोव्हेंबरचा असा एकत्रितपणे 3000 रूपयाचा निधी महिलांच्या खात्यात जमा झाला होता. त्यामुळे लाडक्या बहिणींना दिवाळीआधीच भाऊबीजेच भेट मिळाली आहे. 

ऑक्टोबर महिन्याच्या सुरूवातीलाच सरकारने नोव्हेंबर महिन्याचा निधी देण्याची घोषणा केली होती. त्यामुळे ज्या महिलांना आधीच्या तीन महिन्याचे योजनेचे पैसे मिळाले होते. त्यांना चौथ्या हप्त्यात ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर महिन्याचे एकत्रितपणे 3000 रूपये देण्यात आले. त्यामुळे महिलांना भाऊबीजेची ओवाळणी महिनाभर आधीच मिळाली. तर ज्या महिलांच्या खात्यात तीन हप्त्यापर्यंत एकही रूपया जमा झाला नव्हता. त्या महिलांच्या खात्यात चौथ्या हप्त्यात एकत्रितपणे 7500 रूपये जमा झाले. 

हे ही वाचा : ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना सरकारने 'असं' दिलं दिवाळीआधी गिफ्ट, थेट खात्यात जमा होणार 3000

दरम्यान, हे पैसे जमा झाल्यानंतर आता पुन्हा पैसे कधी मिळणार याबाबत चर्चा सुरू झाली आहे. पण आता या योजनेचे पैसे थेट डिसेंबर महिन्यातच मिळू शकतात. कारण विधानसभा निवडणुका जाहीर झाल्याने ही योजना तात्पुरती बंद असणार आहे. कारण ही योजना थेट मतदारांना आकर्षित करू शकते. त्यामुळे आचारसंहिता सुरू असल्याने आता ती बंद आहे.  

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

कोणाला मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? 

 ज्या महिलांचं नाव लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी सूचीत आहे. ज्यांचे आधार कार्ड आणि बँक खाते लिंक आहे. आणि या योजनेत सर्व नियम आणि अटींचं पालन केले आहे, अशा महिलांनाच या योजनेचा लाभ मिळत आहे.

ज्या महिला या अटीत बसतात त्याच महिलांच्या खात्यात पैस जमा होतात. आता जर तुम्ही या अटीत बसत असाल तर तुमच्या खात्यात देखील पैसे जमा होणार आहेत. हे पैसे कसे तपासायचे, हे देखील आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

ADVERTISEMENT

हे ही वाचा :  Ladki Bahin Yojana: 'त्या' महिलांनाच मिळणार 3000 रुपये, जाणून घ्या काय आहे प्रक्रिया

खात्यात पैसे जमा झाल्याचे कसे कळणार? 

तुम्ही तुमच्या जिल्ह्यातील लाभार्थी यादी तपासू शकता. या यादीत तुमचे नाव असेल तरच तुम्हाला पैसे मिळतील. यासोबत योजनेचे पैसै खात्यात आल्यानंतर तुम्हाला फोनवर मेसेज देखील येतो. जर मेसेज आला नसेल तर बँकेत जाऊन तुम्ही तुमचे पासबूकही तपासू शकता. अशाप्रकारे तुम्हाला तुमच्या खात्यात पैसे जमा झाल्याची माहिती मिळणार आहे. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT