ladki Bahin Yojana: ...तरच तुम्हाला मिळणार लाडकी बहीण योजनेचे पैसे! महिलांनो एकदा अटी तर वाचा

मुंबई तक

ADVERTISEMENT

लाडकी बहीण योजना अटी
लाडकी बहीण योजना अटी
social share
google news

बातम्या हायलाइट

point

महिलांनो सर्वात मोठी अपडेट आली समोर

point

पैसे मिळविण्यासाठी 'या' अटी कराव्या लागतील पूर्ण

point

कोणत्या महिलांना मिळणार पैसे?

Mazi ladki Bahin Yojana Update: राज्य सरकारने महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. सरकारने या योजनेच्या माध्यमातून अनेक पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये देण्याची तरतूद केली आहे. दोन कोटींहून अधिक महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाल्याचं सरकारकडून सांगण्यात येत आहे. पहिल्या ते चौथ्या हफ्त्यापर्यंतची रक्कमही महिलांच्या खात्यात डिपॉझीट झाल्याचं सरकारी अधिकारी सांगतात.

लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सरकारच्या वतीनं महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. तर ज्या महिलांचे अर्ज उशिराने वैध ठरत आहेत त्या महिलांना एकत्रितरित्या रक्कम मिळत आहे. म्हणजे एकूण काही महिलांना थेट 7500 रुपये म्हणजेच पहिल्या हप्त्यापासूनचे पैसे मिळत आहेत.

हे ही वाचा >> Horoscope In Marathi : 'या' राशींच्या व्यक्ती प्रेमात असतात लकी! तुमचं लव्ह लाईफ कसं राहील?

सरकारने महिलांसाठी ही महत्वाकांक्षी योजना सुरु केली असून महिलांना प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपयांचं आर्थिक सहाय्य दिलं जात आहे. सरकारकडून  ही रक्कम थेट महिलांच्या खात्यावर जमा केली जाते. पण यासाठी महिलांना काही नियमांचं पालन करावं लागतं. म्हणजेच महिलेचं वय 21 ते 60 वर्षांमध्ये असलं पाहिजे. ती महिला महाराष्ट्राची रहिवासी असली पाहिजे. त्यांचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असणं आवश्यक आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

येत्या काही दिवसात दिवाळीचा सण-उत्सव सुरु होणार आहे. त्यासाठी महिलांनी शॉपिंग करण्यासाठी जय्यत तयारी केली आहे. अशातच महिलांना सरकारकडून लाडकी बहीण योजनेचा जो लाभ मिळत आहे. त्याचा त्यांना नक्कीच फायदा होईल.  पण योजनेचे हे पैसे अशा महिलांनाच मिळतात, ज्या महिला या योजनेच्या अटी पूर्ण करणार आहेत.

हे ही वाचा >> Maharashtra Weather: राज्यात परतीच्या पावसाची पुन्हा बॅटिंग? 'या' जिल्ह्यांना मुसळधार इशारा 

'या' आहेत लाडकी बहीण योजनेच्या अटी

  • महिलेचं नाव लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी सूचीत असलं पाहिजे.
  • आधार कार्ड आणि बँक खाते लिंक असलेलं पाहिजे.
  • ही योजना सर्व नियम आणि अटींचं पालन करत आहे. या अटी पूर्ण केलेल्या सर्व महिलांना पैसे हे त्यांच्या बँक खात्यात जमा होतात.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT