Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचे पैसे आतापर्यत किती महिलांना मिळाले?

मुंबई तक

ADVERTISEMENT

ladki bahin yojana scheme how many women get benefit of mukhymantri ladki bahin yojana scheme eknath shinde aditi tatkare ajit pawar
राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची खूप चर्चा आहे.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

लाडकी बहीण योजनेत किती महिलांना मिळाला लाभ

point

दुसऱ्या टप्प्यात महिलांच्या खात्यात पैसे जमा

point

अर्ज मंजुरीता अधिकार आता अंगणवाडी सेविकांना

Mukhymantri Ladki Bahin Yojana Scheme : राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची खूप चर्चा आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांच्या खात्यात दर महिन्याला 1500 रूपये जमा होत आहेत. आतापर्यंत या योजनेत करोडो महिलांनी नोंदणी केली आहे. मात्र या नोंदणीपैकी अनेकांचे अर्ज रद्द ठरलेत, तर अनेकांनी अद्याप कागदपत्राअभावी फॉर्मच भरले नाही आहेत. त्यामुळे या महिलांना आता सप्टेंबरमध्ये पुन्हा अर्ज करण्याची संधी आहे. त्यात आता या योजनेत नेमक्या किती महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे (Mukhymantri Ladki Bahin Yojana)  पैसे जमा झाले आहेत? याचा आता नेमका आकडा समोर आला आहे. हा आकडा नेमका किती आहे? तो जाणून घेऊयात. (ladki bahin yojana scheme how many women get benefit of mukhymantri ladki bahin yojana scheme eknath shinde aditi tatkare ajit pawar)  

ADVERTISEMENT

खरं तर जुलैमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली होती. या घोषणेनंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेद्वारे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मिळून 3 हजार रुपये पुण्यातील कार्यक्रमाद्वारे महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले होते. ज्या महिलांनी जुलै महिन्यात अर्ज दाखल केले होते त्यांना 17 ऑगस्ट रोजी जुलै आणि ऑगस्ट महिन्याची रक्कम खात्यात पाठवण्यात आली होती. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात ज्या महिलांनी अर्ज सादर केले त्यांना 31 ऑगस्ट रोजी नागपूर येथील कार्यक्रमाद्वारे दोन महिन्यांची रक्कम देण्यात आली आहे. 

हे ही वाचा : Manoj Jarange: मनोज जरांगे विधानसभा निवडणुकीत रणशिंग फुंकणार? छत्रपती संभाजी राजेंच्या भेटीत काय चर्चा झाली?

अशाप्रकारे आतापर्यंत राज्य सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत जुलै आणि ऑगस्ट अशा दोन टप्प्यात 1 कोटी 59 लाख भगिनींना 4787 कोटींचा लाभ देण्यात आल्याची माहिती राज्य सरकारनं दिलेली आहे.हा आकडा आता सप्टेंबर महिन्यात वाढण्याची शक्यता आहे. 

हे वाचलं का?

'त्या' महिलांना 3000 मिळणार नाही?

राज्य सरकारने अर्ज करण्यासाठी आता 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. पण 1 सप्टेंबरनंतर लाडकी बहीण योजनेसाठी नोंदणी करणाऱ्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचा लाभ मिळणार नाही. आता यापुढे ज्या महिन्यात महिला नोंदणी करतील, त्याच महिन्यापासून त्यांना लाभ मिळणार आहे, असे आदिती तटकरे यांनी गडचिरोलीमध्ये सांगितले होते. 

अंगणवाडी सेविकांना अर्ज मंजूर करणार

आता नवीन अर्ज भरणाऱ्या महिलांना अंगणवाडी सेविकांकडून अर्ज मंजूर करून घ्यावा लागणार आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांमध्ये लाडकी बहीण योजनेत घोटाळा होत असल्याचे अनेक प्रकार समोर आले होते.  एका व्यक्तीनं त्याच्या पत्नीच्या नावे 30 अर्ज दाखल केल्याचं प्रकरण समोर आलं होतं.  संबंधित व्यक्तीनं  पत्नीच्या नावे 30 अर्ज दाखल केले होते, त्यापैकी 26 अर्ज मंजूर झाले होते. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत गैरप्रकार टाळता यावेत यासाठी राज्य सरकारनं हे पाऊल उचलल्याचं समोर आलं आहे. 

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Maharashtra Weather: बाई... काय खरं नाही! महाराष्ट्रावर मोठं संकट, IMD चा महत्त्वाचा इशारा 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT