Ladki Bahin Yojana : 'लाडक्या बहिणीं'नो 3000 रूपये कसे येणार खात्यात?

मुंबई तक

ADVERTISEMENT

ladki bahin yojana scheme these women get benefit of diwali bonus of rs 5500 mukhymantri ladki bahin yojana scheme
महिलांच्या खात्यात थेट 5500 जमा होणार आहेत.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

'या' महिलांना मिळणार 3000 रूपये एकत्र

point

कोणत्या महिला पात्र ठरणार?

point

तुमच्या खात्यात पैसे येणार का?

Mukhymantri Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा चौथा हप्ता हा महिलांच्या खात्यात जमा झाला आहे. या चौथ्या हप्त्यात महिलांच्या खात्यात ऑक्टोबर आणि नोव्हेंबर असे एकत्रित मिळून 3000 जमा झाले. पण काही महिलांच्या खात्यात हे पैसे अद्यापही आलेले नाहीत. पण हे पैसे का आले नाहीत आणि नेमकी काय अडचण झाली हे आपण जाणून घेऊयात.

ADVERTISEMENT

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत चौथ्या आणि पाचव्या टप्प्यात 10 ऑक्टोबरपर्यंत महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार होते. त्यानुसार अनेक महिलांच्या खात्यात 3000 रूपये आणि 7500 रूपये जमा झाले होते. यामध्ये ज्या महिलांना सप्टेंबरचा हप्ता आधीच मिळाला होता त्यांच्या खात्यात ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे असे एकत्रित मिळून 3000 रूपये जमा झाले आहेत. तर ज्या महिलांच्या खात्यात तीन हप्त्यापर्यंत एकही रूपया जमा झाला नव्हता. त्या महिलांच्या खात्यात चौथ्या हप्त्यात एकत्रितपणे 7500 रूपये जमा झाले. 

हे ही वाचा : Ladki Bahin Yojana : महिलांनो, उरली शेवटची संधी!...तर एकही रूपया खात्यात येणार नाही?

दरम्यान हे पैसे जमा झाल्यानंतर अजूनही काही महिलांना सरकारकडून काही 3000 रुपये जमा झालेले नाहीत. पण यामुळे चिंता करण्याचं कारण नाही. बँक खात्यात पैसे जमा होण्याची एक विशिष्ट प्रक्रिया आहे. त्यामुळे ज्या पात्र महिला आहेत त्यांना 3000 रुपये मिळतील. पण ज्या महिलांचं डीबीटी अॅक्टिव्ह नाही त्यांना आतापर्यंत या योजनेचा लाभच मिळू शकणार नाही. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

'या' महिलांच्या खात्यात पैसे येणार?

1) महिलेचं नाव लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी सूचीत असलं पाहिजे.
2) त्यांचा आधार कार्ड आणि बँक खाते लिंक असलेलं पाहिजे.
4) ही योजना सर्व नियम आणि अटींचं पालन करत आहे.

ज्या महिला या अटीत बसतात त्याच महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. 

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेची संपली मुदत? महिलांनो, आता कसे मिळणार पैसे ?

तुम्ही तुमच्या जिल्ह्यातील लाभार्थी यादी तपासू शकता. या यादीत तुमचे नाव असेल तर तुम्हाला पैसे मिळतील. यासोबत योजनेचे पैसै खात्यात आल्यानंतर तुम्हाला फोनवर मेसेज देखील येतो. जर मेसेज आला नसेल तर बँकेत जाऊन तुम्ही तुमचे पासबूकही तपासू शकता. अशाप्रकारे तुम्हाला तुमच्या खात्यात पैसे जमा झाल्याची माहिती मिळणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT