Ladki Bahin Yojana: 3000 की 4500 रुपये मिळणार, नेमके किती पैसे तुमच्या खात्यात येणार?

मुंबई तक

ADVERTISEMENT

 ladki bahin yojana scheme who will get 3000 or 4500 installment amount second term dbt transfer ajit pawar eknath shinde aditi tatkare
50 लाख महिलांना दुसऱ्या टप्प्यात मिळणार लाभ
social share
google news

बातम्या हायलाइट

point

दुसऱ्या टप्प्यात पैसे जमा व्हायला सुरूवात

point

नागपुरमध्ये झाला दुसऱ्या टप्प्याचा शुभारंभ

point

तुमच्या खात्यात किती पैसे जमा होणार?

Mukhymantri Majhi Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात दुसऱ्या टप्प्यात पैसे जमा व्हायला सुरूवात झाली आहे. यामुळे महिलांच्या चेहऱ्यावर आनंद तर आहे, पण त्या काहीशा गोंधळात देखील सापडल्या आहेत. यामागचे कारण म्हणजे काही महिलांना वाटतेय त्यांच्या खात्यात 3000 रूपये जमा होतील, तर काहींना 4500 जमा होतील, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे नेमक्या महिलांच्या खात्यात (Women Account) किती पैसे जमा होणार आहेत? हे जाणून घेऊयात.  (ladki bahin yojana scheme who will get 3000 or 4500 installment amount second term dbt transfer ajit pawar eknath shinde aditi tatkare) 

ADVERTISEMENT

खरं तर 3000 की 4500 रूपये जमा होणार आहेत. यामुळे महिलांमध्ये काहीसा संभ्रम निर्माण झाला आहे. पण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लागू झाल्यानंतर पहिल्यांदा पहिल्या टप्प्यात रक्षाबंधनाच्या पुर्वसंध्येला महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले होते. त्यावेळेस महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट असे दोन महिन्यांचे एकत्रित पैसे जमा झाले होते.ज्या महिलांचे अर्ज 31 जुलैआधी मंजूर झाले होते. त्याच्यात खात्यात हे पैसे जमा झाले होते. 

हे ही वाचा : Tanaji Sawant: अजित पवारांचं नाव घेताच तानाजी सावंतांना उलट्या का होतात? Inside स्टोरी

दरम्यान आता दुसऱ्या टप्प्यात 31 जुलैनंतर अर्ज केलेल्या महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. दरम्यान ज्या महिलांनी जुलैमध्ये अर्ज केले होते पण काही तांत्रिक कारणास्तव त्यांचा अर्ज सबमिट झाला नाही. किंवा सबमिट करून देखील ज्यांना दुरूस्ती सांगण्यात आली होती.त्यानंतर त्यांनी पुन्हा अर्ज सबमिट केला होता. त्या महिलांच्या खात्यात 3000 रूपये जमा होण्याची शक्यता आहे. 

हे वाचलं का?

आता 4500 कुणाच्या खात्यात जाणार?

ज्या महिलांनी ऑगस्टमध्ये अर्ज केले आहेत आणि त्यांचे अर्ज देखील मंजूर झाले आहेत. त्यांना पहिल्या टप्प्यात लाभ देखील मिळाला नव्हता. अशा महिलांच्या खात्यात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा तीन महिन्यांचे एकत्रित म्हणजेच 4500 जमा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्या महिलांचे अर्ज ऑगस्टमध्ये मंजूर झालेत त्याच्या खात्यात 4500 जमा होण्याचा अंदाज आहे. 

50 लाख महिलांना दुसऱ्या टप्प्यात मिळणार लाभ 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत  1 ऑगस्टपासून जे अर्ज आले आहेत. त्याचा निधी 31 ऑगस्टपासून वितरीत होणार असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.  तसेच लाडकी बहीण योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील निधी वितरणाचा कार्यक्रम नागपूरमध्ये होणार आहे. या कार्यक्रमात ज्या महिलांनी 1 ऑगस्टपासून अर्ज केले आहेत त्याच महिलांना पैसे मिळणार आहे. तसेच दुसऱ्या टप्प्यात 45 ते 50 लाख महिलांना पैसे मिळणार असल्याची माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे. 

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Beef Carrying Man Assaulted : 'गोमांस आणतो काय...' मांस पाहून वृद्धाला ट्रेनमध्येच भीषण मारहाण; Video व्हायरल

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT