Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेची संपली मुदत? महिलांनो, आता कसे मिळणार पैसे ?

मुंबई तक

ADVERTISEMENT

ladki bahin yojana scheme women have a last chance to apply for scheme mukhyamantri ladaki bahin yojana scheme
लाडकी बहीण योजनेची मुदत आता संपूष्ठात येणार आहे.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

महिलांजवळ आता फक्त एकच दिवस उरला

point

लाडकी बहीण योजनेची मुदत संपत आली

point

महिलांना योजनचे पैसे मिळणार का?

Mukhyamatri Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची मुदत आता संपूष्ठात येणार आहे. महिलांजवळ आता फक्त एकच दिवस उरला आहे. या एका दिवसातच महिलांना अर्ज करता येणार आहे. या दिवसानंतर महिलांना अर्ज करता येणार नाही आहेत. त्यामुळे महिलांना योजनेचे पैसे देखील मिळणार नाही आहे. त्यामुळे अर्जाची शेवटची तारीख काय असणार आहे? आणि योजनेचे पैसे मिळणे बंद होणार आहे का? हे जाणून घेऊयात. (ladki bahin yojana scheme women have a last chance to apply for scheme mukhyamantri ladaki bahin yojana scheme) 

ADVERTISEMENT

खरं तर याआधी 30 सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याची शेवटची मुदत होती. ही मुदत संपल्याच्या आठवड्याभरानंतर सरकारने लाडकी बहीण योजनेत अर्ज भरण्याची मुदत 15 ऑक्टोबरपर्यंत वाढवली होती. अनेक महिलांना या योजनेत अर्ज करता आला नव्हता. त्यामुळे सरकारने 15 ऑक्टोबर 2024 पर्यंत रात्री 12 वाजेपर्यंत मुदतवाढ दिली होती. आता ही मुदत संपायला फक्त एकच दिवस उरला आहे. त्याआधीच महिलांना अर्ज करावा लागणार आहे.

हे ही वाचा : Atul Parchure Death : मराठी सिनेसृष्टीवर शोककळा! ज्येष्ठ अभिनेते अतुल परचुरे यांचे निधन

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लाडकी बहीण योजनेची ही शेवटची मुदतवाढ असणार आहे. कारण आता लवकरच महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची घोषणा होऊन आचारसंहिता लागणार आहे. त्यामुळे सरकार पुन्हा मुदतवाढ देणार नाही आहे. राहिली गोष्ट योजनेच्या पैशाची तर जे अर्ज उद्यापर्यंत मंजूर होतील त्या महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहे. बाकी इतर महिलांना या योजनेच्या निधीपासून वंचित राहावे लागणार आहे.  

हे वाचलं का?

सरकारने महिलांना दिल्या 'या' सूचना 

 "मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण" या योजनेचे अर्ज करण्यासाठी 15 ऑक्टोबर 2024 च्या रात्री बारा वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. मात्र, हे अर्ज फक्त अंगणवाडी सेविकांमार्फतच भरण्यात यावेत, अशी सूचना शासनाकडून प्राप्त झाली आहे. त्यामुळे, लाडक्या बहिणींना आता नव्याने अर्ज करण्याची संधी मिळाली आहे. पुढील 4 दिवसांत अर्ज करुन या योजनेचा लाभ घेता येईल. त्यामुळे ज्या महिलांनी अद्याप अर्ज भरले नाहीयेत, त्यांनी आताच अर्ज भरून घ्या. 

हे ही वाचा : Kitchen Tips : 2 दिवसातच सुकतात लिंबू? 'या' खास टीप्स फॉलो करा, Lemon राहतील ताजे आणि फ्रेश

दरम्यान  लाडकी बहीण योजनेचे अर्ज करण्यासाठी आधी 1 जुलै, 2024 ते 15 जुलै, 2024 पर्यंत मुदत दिली होती. परंतु त्यानंतर ती वाढवून 31 ऑगस्ट केली. त्यानंतर पुन्हा एकदा मुदत वाढवून 30 सप्टेंबर केली. आता तिसऱ्यांदा मुदत वाढवते 15 ऑक्टोंबर करण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT