Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे 4500 आले, मग 1500 कधी येणार?

मुंबई तक

ADVERTISEMENT

ladki bahin yojana third installement women receive 4500 rupees but 1500 rupees did not receive know the reason
तिसऱ्या हप्यात महिलांच्या खात्यात 4500 आणि 1500 रूपये जमा होणार होते. त
social share
google news

बातम्या हायलाइट

point

लाडकी बहीणचा तिसरा हफ्ता आला

point

तिसरा हप्ता महिलांच्या खात्याच जमा

point

तुमच्या खात्यात पैसे आले का?

Ladki Bahin yojana, Third Installement : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत तिसरा हप्ता महिलांच्या खात्यात जमा झाला आहे. तिसऱ्या हप्यात महिलांच्या खात्यात 4500 आणि 1500 रूपये जमा होणार होते. त्यापैकी फक्त 4500 महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. ज्या महिलांच्या खात्यात एकही रूपया जमा झाला नाही, त्या महिलांच्या खात्यात 4500 जमा झाले आहेत. त्यामुळे आता 1500 रूपये कधी येणार आहेत? आणि ते कोणत्या महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत? हे जाणून घेऊयात. (ladki bahin yojana third installement women receive 4500 rupees but 1500 rupees did not receive know the reason) 

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा राज्यस्तरीय मेळावा रायगडमध्ये 29 सप्टेंबरला पार पडणार आहे. याच तारखेला महिलांच्या खात्यात 1500 रूपये आणि 4500 रूपये खात्यात जमा होतील असे बोलले जात होते. मात्र आता सरकारने 25 डिसेंबरच्या आधीच बँकांना योजनेचे पैसे पाठवले आहेत. त्यामुळे बँकांनी बुधवारपासून हे पैसे महिलांच्या खात्यात पाठवायला सुरुवात केली आहे. 

हे ही वाचा : Ladki Bahin Yojana : तिसऱ्या हप्त्यात 4500 झाले खात्यात डिपॉझिट, तुमचे पैसै आले का?

सध्या पाहायाला गेले तर महिलांच्या खात्यात 4500 रूपये जमा झाले आहेत. ज्या महिलांच्या खात्यात आतापर्यंत एकही रूपया जमा झाला नव्हता. त्या महिलांच्या खात्यात हे पैसे जमा झाले आहेत .खरं तर योजनेची घोषणा झाल्यानंतर 31 जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन सरकारने केले होते. मात्र कागदपत्राअभावी अनेक महिलांना जुलै आधी अर्जच करता आला नव्हता. त्या महिलांनी ऑगस्टमध्ये अर्ज केले होते. त्यामुळे या महिलांना जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर अशा तीन महिन्याचे एकत्रित 4500 रूपये आले आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

1500 कुणाला मिळणार? 

ज्या महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्टचे मिळून 3000 रूपये जमा झाले होते. त्या महिलांना आता सप्टेंबर महिन्याचा निधी मिळणार आहे.हा निधी 1500 रूपये असणार आहे. अद्याप 1500 रूपये कुणाच्या खात्यात जमा झाले नाहियेत. त्यामुळे 29 सप्टेंबरपर्यंत हे पैसे जमा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महिलांनी थोडी आणखीण वाट पाहावी लागणार आहे. 

हे ही वाचा : Ladki Bahin Yojana : महिलांनो, 29 सप्टेंबरआधी 'ही' गोष्ट करून घ्या, नाहीतर 4500 रूपये विसरा

दरम्यान या महिलांसह ज्या महिलांनी सप्टेंबर महिन्यात अर्ज केले आहेत आणि त्यांचे अर्जही मंजूर झाले आहेत. त्या महिलांनाही सप्टेंबर महिन्याचे पैसे मिळणार आहे. या महिलांना याआधीचे 3000 रूपये मिळणार नाही आहेत. कारण सरकारने आता ज्या महिन्यापासून अर्ज भरले, त्या महिन्यापासून लाभ द्यायला सूरूवात केली आहे. 
 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT