Ladki Bahin Yojana : तिसऱ्या हप्त्यात 4500 झाले खात्यात डिपॉझिट, तुमचे पैसै आले का?

मुंबई तक

ADVERTISEMENT

 ladki bahin yojana third installment 4500 deposite women account mukhymantri ladki bahin yojana scheme
तिसरा हप्ता महिलांच्या खात्यात जमा
social share
google news

बातम्या हायलाइट

point

तिसरा हप्ता आला

point

महिलांच्या खात्यात 4500 जमा

point

तुमच्या खात्यात पैसेे आले का?

Ladki Bahin Yojana Third Installement : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता येत्या 29 सप्टेंबरला महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. या तारखेआधीच बुधवार 25 सप्टेंबरपासून महिलांच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरूवात झाली आहे. अनेक महिलांच्या खात्यात 4500 रूपये जमा झाले आहेत. त्यामुळे महिलांनी आनंदी आहेत. तर अनेकांच्या खात्यात पैसेच आले नाहीयेत. त्यामुळे या महिलांचे लक्ष बँक खात्याकडे लागून राहिले आहे. (ladki bahin yojana third installment 4500 deposite women account mukhymantri ladki bahin yojana scheme) 

 मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा राज्यस्तरीय मेळावा रायगडमध्ये 29 सप्टेंबरला पार पडणार आहे. याच तारखेला महिलांच्या खात्यात 1500 रूपये आणि 4500 रूपये खात्यात जमा होतील असे बोलले जात होते. मात्र आता सरकारने 25 डिसेंबरच्या आधीच बँकांना योजनेचे पैसे पाठवले आहेत. त्यामुळे बँकांनी बुधवारपासून हे पैसे महिलांच्या खात्यात पाठवायला सुरुवात केली आहे. 

हे ही वाचा : Ladki Bahin Yojana : महिलांनो, 29 सप्टेंबरआधी 'ही' गोष्ट करून घ्या, नाहीतर 4500 रूपये विसरा

सध्या पाहायाला गेले तर महिलांच्या खात्यात 4500 रूपये जमा झाले आहेत. ज्या महिलांच्या खात्यात आतापर्यंत एकही रूपया जमा झाला नव्हता. त्या महिलांच्या खात्यात हे पैसे जमा झाले आहेत .खरं तर योजनेची घोषणा झाल्यानंतर 31 जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन सरकारने केले होते. मात्र कागदपत्राअभावी अनेक महिलांना जुलै आधी अर्जच करता आला नव्हता. त्या महिलांनी ऑगस्टमध्ये अर्ज केले होते. त्यामुळे या महिलांना जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर अशा तीन महिन्याचे एकत्रित 4500 रूपये आले आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

त्याचसोबत ज्या महिलांना ऑगस्ट महिन्यात रक्षाबंधनाच्या वेळेस ओवाळणीच्या रूपात 3000 रूपये आले होते. त्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट अशा दोन महिन्याचा एकत्रित लाभ मिळाला होता.त्यामुळे या महिलांच्या खात्यात आता सप्टेंबरचे पैसे येणे बाकी होते. म्हणजेच 1500 रूपये येणार आहेत. बँकेने हे पैसै पाठवायला सुरूवात केली आहे. त्यामुळे लवकरच तुमच्या खात्यात हे पैसे जमा होणार आहे. 

हे ही वाचा : Ladki Bahin Yojana : तिसरा हप्ता लवकरच येणार खात्यात, पण 'या' महिलांना एकही रूपया मिळणार नाही

आता ज्या महिलांच्या खात्यात पैसे आले नाहीयेत त्या महिलांनी निराश होण्याचे कारण नाही. कारण बँकेने हळूहळु पैसे पाठवायला सूरूवात केली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. त्यामुळे थोडासा धीर धरा. उद्या, पर्वापर्यंत तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT