Ladki Bahin Free Gas Cylinder: लाडक्या बहि‍णींना मोठं गिफ्ट, मोफत सिलेंडर मिळणार!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Ladki Bahin Scheme Update
Ladki Bahin Scheme Free Cylinder
social share
google news

बातम्या हायलाइट

point

लाडक्या बहि‍णींना मिळणार मोठं गिफ्ट

point

कोणकोणत्या महिलांना मिळमार लाभ?

point

योजनेसाठी कोणकोण ठरणार पात्र?

Ladki Bahin Three Free Gas Cylinder मुंबई : राज्यातील महिला आणि मुलींसाठी सरकारने अनेक कल्याणकारी योजनांची सुरूवात केली आहे. यामध्ये सर्वात जास्त चर्चा होतेय ती, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची. मात्र या योजनेव्यतिरिक्त आणखी एक योजना महिलांमध्ये चर्चेचा विषय ठरतेय. ही योजना म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना. राज्य सरकारचं लक्ष आता या योजनेवर असल्याचं दिसतंय. विशेष म्हणजे या योजनेच्या माध्यमातून सरकार महिलांना मोठं गिफ्ट देणार आहे. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने महिलांसाठी सुरू केलेल्या कल्याणकारी योजनांपैकी एक योजना म्हणजे 'मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना'. या योजनेच्या माध्यमातून सरकार महिलांना तीन गॅस सिलेंडर मोफत देणार आहे. या योजनेच्या अंमलबजावणीला सुरूवात झाली आहे. ज्या महिला या योजनेसाठी पात्र आहेत, त्या महिलांना गॅस सिलेंडर मिळण्यास सुरूवातही झाली आहे. मात्र अजूनही लाखो महिला या योजनेपासून वंचित आहेत. 

लाडकी बहीणसाठी कोण-कोण पात्र? 

हे ही वाचा >> Google Free Meal: ...म्हणून गुगल कर्मचाऱ्यांना देतं मोफत जेवण, सुंदर पिचाई काय म्हणाले?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात. पंतप्रधान उज्ज्वला योजनेसाठी पात्र ठरलेल्या महिलाही या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

3 गॅल सिलेंडर मोफत मिळणार, पाहा सरकारचा GR >> View PDF

पुरुषांच्या नावावर गॅस सिलेंडर असेल तर लाभ मिळेल का? 

अनेक घरांमध्ये घरातील पुरुषांच्या नावावर गॅस सिलेंडर असतात. त्यामुळेही या योजनेचा लाभ घेण्यासाठी अनेकांना अडचणी येत आहेत. अशावेळी या कुटुंबांतील महिलांनी गॅस सिलेंडर आपल्या नावावर केल्यास त्यांना या योजनेचा लाभ घेण्यास मदत होऊ शकते.

 

ADVERTISEMENT

हे ही वाचा >>ladki Bahin Yojana: 'या' महिलांना मिळणार नाहीत लाडकी बहीण योजनेचे पैसे? नियम एकदा वाचा


 राज्य सरकारने मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत ऑक्टोबर महिन्याच्या सुरूवातीलाच 3 गॅस सिलेंडरचे पैसे प्राप्त झाल्याचं कळतंय. ज्या महिलांना पैसे मिळालेले नाहीत, त्यांनाही लवकरच पैसे मिळणार आहेत असं सांगण्यात येतंय. 

ADVERTISEMENT


 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT