Ladki Bahin Yojana: महिलांनो! लाडकी बहीण योजना बंद होणार? निवडणुकीआधी समोर आली सर्वात मोठी अपडेट

मुंबई तक

Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana: राज्याच्या विधानसभा निवडणुकीआधी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. लाडकी बहीण योजना शिंदे सरकारची मुख्य योजना आहे.

ADVERTISEMENT

Mazi Ladki Bahin Yojana Latest News
Maharashtra Government On Ladki Bahin Yojana
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत अत्यंत महत्त्वाची माहिती वाचली का?

point

त्या पोस्टमुळे राजकीय वर्तुळात उडाली होती खळबळ

point

राज्य सरकारने दिलं स्पष्टीकरण, 'ते' ट्वीट वाचला का?

Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana: राज्याच्या विधानसभा निवडणुकीआधी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. लाडकी बहीण योजना शिंदे सरकारची मुख्य योजना आहे. आदर्श आचारसंहिता लागू झाल्यानंतर याची चर्चा रंगली आहे. या योजनेत 2.34 कोटी लाभार्थी आहेत. या लाभार्थ्यांना सलग पाच महिने 1500 रुपये मिळाल्याचं समजते.

यावर्षी (2024) जुलै ते नोव्हेंबरपर्यंत सर्व पात्र महिलांना 7500 रुपये मिळाले आहेत. आचार संहिता लागू झाल्यानंतर या योजनेत नवीन लाभार्थी जोडला जाऊ शकत नाही. भारतीय निवडणूक आयोगाच्या परवानगीनेच पैशांबाबतचे काही निर्णय घेतले जाऊ शकतात. 

दोन महिन्यांचा हफ्ता एकत्रित दिला

या योजनेबाबत राज्य सरकारने स्पष्ट केलंय की,  या योजनेला राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी थांबवलं आहे, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात येत आहे. परंतु, या योजनेचा शेवटचा हफ्ता 4 ते 6 ऑक्टोबरमध्ये वितरित केला होता. राज्य सरकारने नोव्हेंबरचा हफ्ता ऑक्टोबरमद्ये दिला होता. म्हणजेच प्रत्येक लाभार्थ्याला या महिन्यात 3000 रुपये मिळाले. पुढील हफ्ता निवडणूक झाल्यानंतर डिसेंबरमध्ये देण्यात येणार आहे.

हे ही वाचा >>  Maharashtra Weather : महाराष्ट्रावर घोंगावतंय दुहेरी संकट! IMD चा 'या' जिल्ह्यांना इशारा

'त्या' पोस्टमुळं उडाली होती खळबळ

शिवसेना ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदीने त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं की, निवडणूक आयोगाने लाडकी बहीण योजना थांबवली? त्यानंतर महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी ट्वीटरवर पोस्ट केली.  'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरूच राहणार !!मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी जुलै 2024 पासून सुरू झाली आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील पात्र भगिनींना दरमहा 1,500 रुपये थेट त्यांच्या आधार लिंक केलेल्या बँक खात्यात जमा केले आहेत.

हे ही वाचा >> Horoscope In Marathi: 'या' राशीच्या व्यक्तींना कामात उत्तम यश? काही होणार प्रचंड मालामाल, तुमचं भविष्य काय?

शासनाने जुलै, ऑगस्ट, आणि सप्टेंबर 2024 या महिन्यांसाठीचा लाभ आधीच पात्र भगिनींच्या खात्यात जमा केला आहे.तसेच 4 ते 6 ऑक्टोबर 2024 दरम्यान ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यांचा लाभ राज्यातील 2 कोटी 34 लाख पात्र भगिनींना देण्यात आला आहे. सर्व पात्र भगिनींना डिसेंबर महिन्याचा लाभ डिसेंबर महिन्यात देण्यात येणार असून या योजनेबाबत कोणत्याही चुकीच्या माहितीला महाराष्ट्रातील माता भगिनींनी बळी पडू नये ही नम्र विनंती, असं अदिती तटकरे यांनी ट्वीटरवर म्हटलं होतं. 

हे वाचलं का?

    follow whatsapp