Mazi Ladki Bahin Yojana List 2024 PDF: माझी लाडकी बहीण योजनेची यादी जाहीर, कशी करणार PDF डाऊनलोड?

मुंबई तक

ADVERTISEMENT

माझी लाडकी बहीण योजनेची यादी जाहीर, कशी करणार PDF डाऊनलोड?
माझी लाडकी बहीण योजनेची यादी जाहीर, कशी करणार PDF डाऊनलोड?
social share
google news

बातम्या हायलाइट

point

माझी लाडकी बहीण योजनेची यादी जाहीर

point

माझी लाडकी बहीण योजनेची यादीची PDF करा डाऊनलोड

point

माझी लाडकी बहीण योजनेत कोण ठरणार पात्र?

Mazi Ladki Bahin Yojana list online: मुंबई: माझी लाडकी बहीण योजनेची यादी महाराष्ट्र सरकारने जाहीर केली आहे. पण आता याच यादीची पीडीएफ देखील आपल्याला डाऊनलोड करता येणार आहे. ज्यांनी माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केला आहे अशा सर्व महिलांना जिल्ह्यानुसार यादीची पीडीएफ डाऊनलोड करता येणार आहे. राज्यातील ज्या महिलांची नावे या यादीत असतील त्याच या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत. (mazi ladki bahin yojana list 2024 announced how to download pdf)

माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्रता

  • माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्जदार महिला ही महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असावी.
  • महिलेचे किमान वय 21 वर्षे आणि कमाल वय 65 वर्षे असावे.
  • राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता, निराधार आणि राज्यातील कुटुंबातील एकच अविवाहित महिला पात्र असतील.
  • लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.50 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.
  • अर्जदाराचे बँक खाते आधार कार्ड आणि मोबाइल क्रमांकाशी जोडलेले असावे.

माझी लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • पत्त्याचा पुरावा
  • उत्पन्न प्रमाणपत्र
  • जन्म प्रमाणपत्र
  • अर्ज क्रमांक
  • मोबाइल नंबर
  • बँक खाते क्रमांक

हे ही वाचा>> Mazi Ladki Bahin Yojana: महिलांनो तुमचा अर्ज Pending म्हणजे, 1500 रुपये...

माझी लाडकी बहीण योजनेची लाभार्थी यादी अशी करा डाऊनलोड

  • महाराष्ट्र शासनाच्या आधिकृत वेबसाईटवर जायचा.
  • नंतर माझी लाडकी बहीण लाभार्थी यादी वर क्लिक करा.
  • इथे तुमच्या जिल्ह्याचे नाव टाका
  • त्यानंतर तुमचा आधार क्रमांक टाका.
  • जिल्ह्यातील वार्ड क्रमांकानुसार तुम्हाला लिस्ट मिळेल त्यावर क्लिक करा.
  • त्यानंतर याची पीडीएफ फाईल डाऊनलोड करून घ्या

महिलांना कधी मिळणार पैसे?

माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे हे 17 ऑगस्ट 2024 रोजी लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत. त्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्याचे मिळून 3000 रुपये जमा होतील.

हे ही वाचा>> Mazi Ladki Bahin Yojana: ...नाहीतर 1500 रुपये मिळणार नाही, तुमच्या अर्जाचं नेमकं Status काय?

माझी लाडकी बहीण योजनेची ऑनलाईन लाभार्थी यादी तपासा

  • सर्वप्रथम तुम्हाला माझी लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जावं   लागेल. अधिकृत वेबसाइटला भेट दिल्यानंतर, मुख्यपृष्ठ उघडेल.
  • या होम पेजवर तुम्हाला चेक लाभार्थी यादीचा पर्याय दिसेल, तुम्हाला या पर्यायावर क्लिक करावे लागेल. ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर पुढचे पेज तुमच्या समोर ओपन होईल.
  • तुमच्या डेस्कटॉप स्क्रीनवर एक नवीन पेज दिसेल, अर्जदाराला विचारलेले सर्व तपशील प्रविष्ट करावे लागतील.
  • सर्व तपशील प्रविष्ट केल्यानंतर अर्जदाराने त्वरीत त्याचे पुनरावलोकन केले पाहिजे आणि त्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सबमिट पर्यायावर क्लिक करा.
  • यानंतर तुमच्यासमोर लाभार्थ्यांची यादी उघडेल.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT