ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींनो! दिवाळी बोनस नक्की मिळणार का? सरकारने दिली मोठी अपडेट

मुंबई तक

ADVERTISEMENT

लाडकी बहीण योजना दिवाळी बोनसबाबत मोठी अपडेट
लाडकी बहीण योजना दिवाळी बोनसबाबत मोठी अपडेट
social share
google news

बातम्या हायलाइट

point

माझी लाडकी बहीण योजनेबाबत नवीन अपडेट काय?

point

मंत्री अदिती तटकरेंनी दिली सर्वात महत्त्वाची माहिती

point

लाडकी बहीण योजनेच्या दिवाळी बोनसबाबत ''ही' माहिती आली समोर

Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातील गरजू महिलांना दरमहा 1500 रुपयांचं आर्थिक सहाय्य दिलं जात आहे. महायुती सरकारने दोन कोटींहून अधिक महिलांच्या खात्यात या योजनेचे पहिल्या ते चौथ्या हफ्त्याचे पैसे जमा केल्याचे समजते. अशातच सरकारकडून महिलांना दिवाळी बोनस मिळणार असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. या योजनेतील काही निवडक महिलांनाच या बोनसचा लाभ मिळणार असल्याचंही बोललं जात होतं. परंतु, ही माहिती खरी नसल्याचं सरकारकडून नुकतच जाहीर करण्यात आलं. महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना बोनस मिळणार नसल्याचं स्पष्ट केलं.

लाडकी बहिण योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांच्या खात्यात ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे एकूण 3000 रुपये खात्यात जमा केले होते. परंतु, या पैशांसोबतच लाडक्या बहिणींना अतिरिक्त 2500 रुपयांचा दिवाळी बोनस मिळणार, अशा चर्चांना उधाण आलं होतं. काही निवडक महिलांनाच या बोनसचा लाभ घेता येईल, असंही म्हटलं जात होतं. यासाठी काही अटींची पूर्तता करण्यात येईल असं सांगण्यात आलं होतं. परंतु, अशा प्रकारची कोणतीही माहिती अधिकृतपणे देण्यात आली नाही, असं राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

हे ही वाचा >> Today Gold Rate: बाईईई...दिवाळीआधीच सोनं गडगडलं! मुंबईसह 'या' 15 शहरांमध्ये 1 तोळ्याचा दर काय?

दिवाळी बोनसबाबत सरकारने दिली महत्त्वाची माहिती

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना दिवाळी बोनस दिला जाईल, अशाप्रकारच्या बातम्या व्हायरल झाल्या होत्या. त्यामुळे महिलांना दिवाळी बोनस नक्की कधी मिळणार? दिवाळी बोनसची रक्कम किती असेल? असे प्रश्न पडले होते. परंतु, मंत्री अदिती तटकरे यांनी याबाबत महत्त्वाची अपडेट दिली. दिवाळी बोनसबाबत कोणत्याही प्रकारचा शासन निर्णय झाला नाही. त्यामुळे महिलांना या दिवाळी बोनसचा लाभ मिळणार नाही, असं तटकरे यांनी सांगितलं. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Horoscope In Marathi: आज शनिवारी 'या' राशींची साडेसाती होईल दूर? पण काही राशींवर कोसळेल समस्यांचा डोंगर

लाडक्या बहिणींना मिळणार मोफत गॅस सिलेंडर?

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांना मोफत गॅस सिलेंडर मिळणार असल्याचं समजते. परंतु, याबाबत कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती समोर आली नाहीय. वर्ष 2024-25 च्या आर्थिक संकल्पानुसार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना किंवा मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची सुरुवात केली. या योजनांच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना प्रत्येक वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देण्याची तरतूद असल्याचं कळते. 
 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT