Mazi Ladki Bahin Yojana: प्रचंड मोठी घोषणा, महिलांना मिळणार तब्बल 3000 रुपये!

मुंबई तक

Mazi Ladki Bahin Yojana Latest News : जानेवारीचा हफ्ता महिलांच्या खात्यात जमा झाल्यानंतर आता फेब्रुवारी आणि मार्चचा हफ्ता कधी मिळणार? असा सवाल उपस्थित झाला असतानाच राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदित तटकरे यांनी मोठं विधान केलं आहे.

ADVERTISEMENT

लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी जुलै 2024 पासून सुरू झाली आहे.
लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी जुलै 2024 पासून सुरू झाली आहे.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात मोठी अपडेट आली समोर

point

आदिती तटकरेंनी ट्वीटरवर योजनेबाबत दिली महत्त्वाची माहिती

point

लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी, मार्चचा हफ्ता कधी मिळणार?

Mazi Ladki Bahin Yojana Latest News : विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीने लाडकी बहीण योजनेंतर्गत राज्यातील पात्र महिलांना दरमहा 2100 रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं. परंतु, चार महिन्यांचा कालावधी उलटल्यानंतरही महिलांच्या खात्यात 2100 रुपयांची रक्कम जमा झाली नाहीय. जानेवारीचा हफ्ता महिलांच्या खात्यात जमा झाल्यानंतर आता फेब्रुवारी आणि मार्चचा हफ्ता कधी मिळणार? असा सवाल उपस्थित झाला असतानाच राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदित तटकरे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत मोठी घोषणा केली आहे. 

आदिती तटकरेंनी लाडकी बहीण योजनेबाबत कोणती घोषणा केली?

आदिती तटकरे ट्वीट करत म्हणाल्या, "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ! योजनेतील सर्व पात्र लाभार्थी भगिनींना फेब्रुवारी व मार्च महिन्याचा सन्माननिधी वितरित करण्याची प्रक्रिया दिनांक ७ मार्च २०२५ पासून सुरू झाली आहे. ही प्रक्रिया दिनांक १२ मार्च २०२५ पर्यंत सुरू राहणार असून सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात फेब्रुवारी महिन्याचे १५०० रुपये व मार्च महिन्याचे १५०० रुपये असे दोन टप्प्यात एकूण ३००० रुपये जमा करण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू आहे.सर्व पात्र लाभार्थ्यांना दोन्ही महिन्यांचा लाभ मिळणार असून याबाबत महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींनी निश्चिंत रहावे."

हे ही वाचा >> Viral Video: ब्रेकअपच्या 17 वर्षांनंतर शाहिदला पाहताच करीनाने केलं तरी काय? ज्याची तुफान चर्चा!

दरम्यान, काँग्रेसचे नेते आणि आमदार विजय वडेट्टीवार यांनी लाडकी बहीण योजनेबाबत मोठं विधान केलं होतं. त्यांनी आदिती तटकरेंवरही टीका केली होती. "आमच्या आदितीताई तटकरे म्हणतात, आमच्या जाहीरनाम्यात दिलं तर ते लगेच काय लागू करण्यासाठी नाही. आम्ही पाच वर्षात लागू करू. म्हणजे शेवटचे तीन महिने असताना लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार. निवडणुकीच्या तोंडावर तुम्ही लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा केले, त्यावेळी तुम्हाला निकष आठवले नाही का?", असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला होता.

हे ही वाचा >> पुण्यात भर चौकात लघुशंका आणि अश्लील चाळे करणारा गौरव आहुजा सापडला, पोलिसांनी 'इथून' उचलला

"सरकारची आर्थिक स्थिती इतकी वाईट आहे की, मागच्या बजेटमधील फक्त 40 टक्के निधीच खर्च करू शकले. ही परिस्थिती सरकारची आहे. अशा स्थितीत लाडक्या बहिणींच्या नावानं मतं घेऊन त्यांची फसवणूक होत असेल, तर त्या लाडक्या भावाला बहिणी माफ करणार नाहीत. कोणत्याही परिस्थितीत ते बंद होणार नाही. बंद झाले तर आम्ही लाडक्या बहिणींना घेऊन रस्त्यावर उतरू", असंही वडेट्टीवार म्हणाले होते. 

हे वाचलं का?

    follow whatsapp