Narak Chaturdashi 2024: छोटी दिवाळी कधी आहे? नरक चतुर्दशीच्या रात्री यमाचा दिवा का लावला जातो?

मुंबई तक

Narak Chaturdashi 2024: छोटी दिवाळी कधी आहे? नरक चतुर्दशीच्या रात्री यमाचा दिवा का लावला जातो? पंडितजींकडून शिका दिवाळीचा उत्सव सुरु होण्याच्या एक दिवस आधी छोटी दिवाळी साजरी केली जाते.

ADVERTISEMENT

Choti Diwali 2024
Narak Chaturdashi 2024 date
social share
google news

बातम्या हायलाइट

point

नरक चतुर्दशी 2024 तिथी आणि योग्य वेळ कोणती?

point

यमाचा दिवा कधी लावावा?

point

यमाचा दिवा लावण्याचे नियम कोणते?

Narak Chaturdashi 2024: दिवाळीचा उत्सव सुरु होण्याच्या एक दिवस आधी छोटी दिवाळी साजरी केली जाते. या दिवसाला नरक चतुर्दशी म्हणतात. हिंदू धर्मातील सण उत्सवांमध्ये दिवाळीला विशेष असं महत्त्व असतं. दिपावलीच्या एक दिवस आधी आणि धनतेरसच्या एक दिवस नंतर म्हणजेच कार्तिक कृष्ण पक्ष चतुर्दशीला नरक चतुर्दशी म्हणून साजरं केलं जातं. पाच दिवसांपर्यंत सुरु राहणाऱ्या या दिपावली पर्वाच्या दुसऱ्या दिवसाच्या पर्वाला चतुर्दशी आणि छोटी दिवाळी असंही म्हटलं जातं. शास्त्रांच्या माहितीनुसार, दिवाळीच्या आधी करण्यात आलेल्या साफसफाईचा हा शेवटचा दिवस असतो. उत्तर भारतात दिवाळीचा उत्सव पाच दिवसांपर्यंत साजरा केला जातो. 

दिवाळीच्या उत्सवाची सुरुवात धनतेरसने केली जाते. यावेळी छोट्या दिवाळीचा उत्सव 30 ऑक्टोबर 2024 ला साजरा केला जाणार आहे. या रात्री एक दिवा मृत्यूचे देवता म्हणजेच यमासाठी पेटवण्याची परंपरा आहे. नरक चतुर्दशीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णने राक्षस नरकासुराचा वध केला होता. त्याच्या कैदैतून 16000 महिलांना मुक्त केलं होतं.

हे ही वाचा >> Jayashree Thorat: "त्यांना सरळ करण्याचं काम...", वसंतराव देशमुखांच्या आक्षेपार्ह विधानानंतर जयश्री थोरात संतापल्या

नरक चतुर्दशी 2024 तिथी आणि योग्य वेळ

ज्योतिषांच्या माहितीनुसार, यंदा छोट्या दिवाळीचा उत्सव 30 ऑक्टोबर 2024 ला साजरा केला जाणार आहे. नरक चतुर्दशीची सुरुवात 30 ऑक्टोबरला दुपारी 1.16 वाजता होणार आहे. तर पुढच्या दिवशी 31 ऑक्टोबरला दुपारी 3.35 वाजता याचा समारोप होणार आहे. हा उत्सव सायंकाळी साजरा केला जातो. त्यामुळे यमाचा दिवा 30 ऑक्टोबरला लावणे शुभ ठरेल. नरक चतुर्दशीला सूर्यास्तानंतर प्रदोष काळात यमाचा दिवा पेटवला पाहिजे. दिवा लावल्याने कुटुंबातील सदस्यांमध्ये मृत्यूचं भय राहत नाही. तसच प्रार्थना केली जाते की, यमदेव नरकाचे दरवाजे बंद करा. आमचं आरोग्य चांगलं ठेवा. या दिवशी यमराजाचीही पूजा केली जाते आणि घरात दिवे लावले जातात. 

हे ही वाचा >>  Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींनो! डिसेंबरचे 1500 कधी मिळणार? सरकारने दिली सर्वात मोठी अपडेट

दिवा कधी लावावा?

ज्योतिषांच्या माहितीनुसार, नरक चतुर्दशीची संध्याकाळ किंवा रात्री यमाचा दिवा लावला पाहिजे. यावर्षी 30 ऑक्टोबरला सायंकाळी 5.30 पासून 7 वाजेपर्यंत यमाचा दिवा लावण्याची योग्य वेळ आहे.

यमाचा दिवा लावण्याचे नियम

यमाचा दिवा पेटवण्यासाठी एक चौमुखी दिवा असणं आवश्यक आहे. यामध्ये चारही दिशेला असलेल्या वाती पेटवा. यानंतर दिव्यात तेल टाका. या दिव्याला पेटवल्यानंतर संपूर्ण घरात तो दिवा फिरवा. घराच्या मुख्य प्रवेशाजवळ हा दिवा दक्षिण दिशेला ठेवा. 

हे वाचलं का?

    follow whatsapp