Diwali 2024 Date: 'इतक्या' तासांसाठी आहे लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त, जाणून घ्या सविस्तर माहिती
Diwali Laxmipujan 2024 Date: येत्या काही दिवसात दिवाळीच्या उत्सवाचा धुमधडाका सुरु होणार आहे. लहान मुलांपासून अबालवृद्धापर्यंत दिवाळीच्या उत्सवाची प्रतिक्षा लागलेली असते. दिवाळी सुरु होण्याआधीच लोक घराची साफसफाई करतात.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
कधी आहे यंदाची दिवाळी?
लक्ष्मीपूजनाचा शुभमहूर्त कोणता आहे?
दिवाळी कॅलेंडर 2024 बद्दल सविस्तर माहिती वाचा
Diwali Laxmipujan 2024 Date: येत्या काही दिवसात दिवाळीच्या उत्सवाचा धुमधडाका सुरु होणार आहे. लहान मुलांपासून अबालवृद्धापर्यंत दिवाळीच्या उत्सवाची प्रतिक्षा लागलेली असते. दिवाळी सुरु होण्याआधीच लोक घराची साफसफाई करतात. दिवाळीच्या दिवशी फटाके फोडतात. लक्ष्मी माता आणि श्री गणेशाची पूजा करतात. हिंदू धर्मात दिवाळीच्या सणाला विशेष महत्त्व असतं. दिवाळीचा सण अमावस्याच्या रात्री साजरा केला जातो. अशातच अनेक जणांचा दिवाळीच्या तारखेबाबत गोंधळ उडाला आहे. काहींना वाटतंय की दिवाळी 31 ऑक्टोबरला साजरी केली जाईल, तर काही जण 1 नोव्हेंबरला दिवाळी साजरी करण्याचा प्लॅन करत आहेत.
ADVERTISEMENT
कधी आहे यंदाची दिवाळी?
दिवाळीचा उत्सव साजरा करण्याबाबत लोक अजूनही गोंधळात पडले आहेत. हिंदू शास्त्रानुसार, दिवाळीचा उत्सव अमावस्येचा रात्री साजरा केला जातो. श्री राम प्रभुने रावणाचा वध करून लंकेवर विजय मिळवला आणि ते अयोध्येत परतले होते. त्यावेळी अयोध्येला दिव्यांनी सजवलं होतं आणि भगवान श्री राम प्रभुचं भव्य स्वागत केलं होतं. त्या दिवशी कार्तिक महिन्याची अमावस्या तिथी होती. त्यानंतर दिवाळी साजरी करण्याची परंपरा सुरु झाली.
हे ही वाचा >> Narak Chaturdashi 2024: छोटी दिवाळी कधी आहे? नरक चतुर्दशीच्या रात्री यमाचा दिवा का लावला जातो?
लक्ष्मीपूजनाचा शुभमहूर्त कोणता आहे?
दिवाळीच्या सायंकाळी माता लक्ष्मी आणि भगवान श्री गणेशाची पूजा केली जाते. या शुभ मुहूर्तावर पूजा केल्याने घरात माता लक्ष्मी प्रसन्न होते. लक्ष्मीच्या कृपेने घरात धनसंपत्ती वाढते. घरात सुख-समृद्धी येते. 31 ऑक्टोबरला सायंकाळी 6.27 मिनिटांपासून रात्री 8.32 मिनिटांपर्यंत पूजा करण्याचा शुभ मुहूर्त आहे. तसच दिवाळी पूजेचा निशिता मुहूर्त रात्री 11.39 मिनिटांपासून उशिरा रात्री 12 वाजून 31 मिनिटांपर्यंत आहे.
हे वाचलं का?
हे ही वाचा >> Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींनो! डिसेंबरचे 1500 कधी मिळणार? सरकारने दिली सर्वात मोठी अपडेट
दिवाळी कॅलेंडर 2024
धनतेरस - 29 ऑक्टोबरला साजरा केला जाईल
नरक चतुर्दशी किंवा छोटी दिवाळी - 30 ऑक्टोबर
दिपावली लक्ष्मी पूजा - 31 ऑक्टोबर
गोवर्धन पूजा - 2 नोव्हेंबर
भाऊबीज - 3 नोव्हेंबर
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT