Ladki Bahin Yojana: महिलांनो! 'या' दिवशी मिळणार लाडकी बहीण योजनेचे डिसेंबरचे 1500?

मुंबई तक

ADVERTISEMENT

कार्यक्रमाच्या लोकप्रियतेत वाढ महायुती आघाडीने ती वाढवून रु त्यांच्या जाहीरनाम्यात 2,100 रुपये.
कार्यक्रमाच्या लोकप्रियतेत वाढ झाल्याने महायुतीने त्यांच्या जाहीरनाम्यात ती वाढवून २१०० रुपये करण्याचे वचनबद्ध केले.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

लाडकी बहीण योजनेची सर्वात मोठी अपडेट एकदा वाचाच

point

लाडकी बहीण योजनेचे पुढच्या हफ्त्याचे पैसे कधी मिळणार?

point

5 डिसेंबरला होणार महायुती सरकारचा शपथविधी

Ladki Bahin Yojana December 2024 Installment : राज्यातील महिलांना आर्थिकृदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महायुती सरकारने लाडकी बहीण योजना सुरु केली. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात महायुतीला बहुमत मिळालं. लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीला बहुमताचा आकडा पार करता आल्याची चर्चा आहे. परंतु, महिलांना आतापर्यंत पाच हफ्त्यांचे 1500 रुपये देण्यात आले आहेच. पण आता लाडक्या बहिणींना डिसेंबरच्या हफ्त्याची प्रतिक्षा लागली आहे. 

ADVERTISEMENT

राज्यातील पात्र महिलांना जुलै 2024 पासून लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला आहे. सरकारने ऑक्टोबर महिन्यातच नोव्हेंबरच्या हफ्त्याचे 1500 रुपये महिलांच्या खात्यात जमा केले आहेत. अशातच महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी मोठी घोषणा केली होती. "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरूच राहणार. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी जुलै 2024 पासून सुरू झाली आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील पात्र भगिनींना दरमहा 1,500 रुपये थेट त्यांच्या आधार लिंक केलेल्या बँक खात्यात जमा केले आहेत. शासनाने जुलै, ऑगस्ट, आणि सप्टेंबर 2024 या महिन्यांसाठीचा लाभ आधीच पात्र भगिनींच्या खात्यात जमा केला आहे.

हे ही वाचा >> PM Narendra Modi बघणार 'द साबरमती रिपोर्ट', 'या' ठिकाणी होणार चित्रपटाची स्पेशल स्क्रीनिंग

तसेच 4 ते 6 ऑक्टोबर 2024 दरम्यान ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यांचा लाभ राज्यातील 2 कोटी 34 लाख पात्र भगिनींना देण्यात आला आहे. सर्व पात्र भगिनींना डिसेंबर महिन्याचा लाभ डिसेंबर महिन्यात देण्यात येणार असून या योजनेबाबत कोणत्याही चुकीच्या माहितीला महाराष्ट्रातील माता भगिनींनी बळी पडू नये ही नम्र विनंती", असं ट्वीट तटकरे यांनी केलं होतं. 

हे वाचलं का?

लाडक्या बहिणींना डिसेंबरचे 1500 रुपये कधी मिळणार?

माझी लाडकी बहीण योजनेच्या पुढील हफ्त्याच्या रक्कमेबाबत सरकारकडून कोणत्याही प्रकारची अधिकृत घोषणा करण्यात आली नाहीय. महायुतीने अद्यापही मुख्यमंत्र्यांचं नाव जाहीर केलेलं नाही. 5 डिसेंबरला मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. त्यामुळे या सोहळ्यात डिसेंबरच्या हफ्त्याची रक्कम जाहीर होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT