Valentine Day 2024: 14 फेब्रुवारीलाच का साजरा केला जातो व्हॅलेंटाईन डे? काय आहे इतिहास?

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

History of Valentines Day : फेब्रुवारी महिना हा प्रेमाचा महिना म्हणून ओळखला जातो. रोझ डेने सुरू झालेला व्हॅलेंटाईन वीक, 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डेने (Valentine Day) संपतो. अशावेळी या दिवसांबाबत लोकांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळतो. पण या दिवसाचा इतिहास काय आहे आणि व्हॅलेंटाईन डे फक्त 14 तारखेलाच का साजरा केला जातो हे तुम्हाला माहीतीये का? नसेल तर, याविषयी आज आपण सविस्तर जाणून घेऊयात. 

Valentines Day ची सुरुवात कशी झाली?

व्हेलेंटाईन डे ची सुरूवात रोम देशातून झाली. 'Aurea of ​​Jacobus de Verizon' नावाच्या पुस्तकानुसार, रोममध्ये एक धर्मगुरू होते ज्यांचे नाव सेंट व्हॅलेंटाईन (संत व्हॅलेंटाईन) असे होते. जगात प्रेम वाढवण्यावर त्यांचा विश्वास होता. त्यांच्यासाठी प्रेम हेच जीवन होते. पण तिथला रोमन राजा क्लॉडियसला हे सर्व मान्य नव्हतं. तो याच्या विरोधात होता. 

रोमन राजा क्लॉडियसचा असा विश्वास होता की, प्रेम आणि विवाह पुरुषांच्या बुद्धिमत्तेवर आणि सामर्थ्यावर परिणाम करतात. याच कारणामुळे राजाच्या राज्यात राहणारे सैनिक आणि अधिकारी लग्न करू शकत नव्हते.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

पण, राजाच्या या विरोधाला न जुमानता, संत व्हॅलेंटाईन यांनी रोमच्या लोकांना प्रेम आणि विवाहासाठी प्रेरित केले जेणेकरून प्रेमाला चालना मिळू शकेल. यातून प्रेरीत होऊन राजाच्या राज्यात राहणाऱ्या अनेक सैनिक आणि अधिकाऱ्यांनी लग्न केले आणि आपले आयुष्य पुढे नेले. यामुळे संतप्त होऊन राजा क्लॉडियसने 14 फेब्रुवारी इसवी सन पूर्व 269 रोजी धर्मगुरू संत व्हॅलेंटाईन यांना फाशी दिली. त्या दिवसापासून दरवर्षी हा दिवस प्रेमाचा दिवस म्हणजेच व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा केला जातो.

व्हॅलेंटाईन नावामागील कहाणी काय? 

आपल्या मृत्यूच्या वेळी संत व्हॅलेंटाईन यांनी जेलरची अंध मुलगी जेकोबस हिला डोळे दान करत एक पत्र लिहिले होते. या पत्रात त्यांनी 'युअर व्हॅलेंटाइन' असं लिहिलं होतं. 

ADVERTISEMENT

त्या अंध मुलीसाठी संत व्हॅलेंटाईन यांच्याकडून मिळालेली ही अनमोल भेट ठरली. त्यांच्या मृत्यूनंतर हा प्रेमाचा दिवस साजरा केला जाऊ लागला. यादिवशी फक्त कपल्सच एकमेकांना भेट वस्तू देऊ शकतात असं नाहीये. आपण आपल्या जवळच्या कोणत्याही प्रिय व्यक्तीला भेट वस्तू देऊन हा प्रेमाचा दिवस साजरा करू शकतो. 

ADVERTISEMENT


 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT