Sunita Williams : 8 दिवसांची मोहीम तब्बल 9 महिने कशी लांबली, कुठे आणि कश्या आल्या होत्या अडचणी?

मुंबई तक

Sunita Williams Return on Earth : सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांच्यासमोर अनेक शारीरिक आणि मानसिक आव्हानं असणार आहेत. 9 महिने अंतराळात राहिल्यानंतर, त्यांची हाडे आणि स्नायू चांगलीच कमकुवत झाली आहेत.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

नासाचं मिशन तब्बल 9 महिने कसं लांबलं?

point

ट्रम्प आणि एलन मस्क यांनी नेमके काय दावे केले?

Sunita Williams Return on Earth : नासाचे अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांनी 5 जून 2024 रोजी बोईंगच्या स्टारलाइनर प्रक्षेपण केलं होतं. या अंतराळयानातून पहिल्या क्रू फ्लाइटसाठी प्रक्षेपण केलं आणि 6 जून रोजी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले. तब्बल 9 महिन्यांनंतर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर पृथ्वीवर सुखरूप परतले आहेत.  SpaceX च्या ड्रॅगन अंतराळयानाद्वारे ते परत पृथ्वीवर आले.  या यानातून 17 तासांच्या प्रवासानंतर  ते पृथ्वीवर परतले. ड्रॅगन स्पेसक्राफ्ट कॅप्सूलने  ते 19 मार्च रोजी IST पहाटे 3.27 वाजता फ्लोरिडाच्या किनारपट्टीवरील समुद्रात उतरले. 

आठ दिवसांची मोहीम 9 महिने कशी लांबली? 

नासाचं हे मिशन सुरूवातीला फक्त आठ दिवसांचं होतं. मात्र नंतर काही अडचणींमुळे मोहीम तब्बल नऊ महिने लांबली. त्यानंतर अंतराळ स्थानकातील तांत्रिक गुंतागुंतीमुळे नासाने स्टारलाइनर यान रिकामेच परत आणले आणि दोघांनाही स्पेसएक्समध्ये हलवलं. स्पेसएक्स कॅप्सूलमधील पुढील तांत्रिक समस्यांमुळे अतिरिक्त महिनाभर विलंब झाला.

जून 2024: स्टारलाइनर 5 जून रोजी आयएसएससाठी प्रक्षेपित झाल होतं. जे 14 जूनपर्यंत परत येणार होतं. मात्र, हेलियम गळतीमुळे अडचणी आल्या. त्यामुळे सुरुवातीला ही मोहीम 18 जून आणि नंतर 26 जूनपर्यंत लांबली.

ऑगस्ट 2024: नासाने सुचवलं, की अंतराळवीरांना वेगळ्या अंतराळयानातून परतावं लागू शकतं. त्यामुळे 24 ऑगस्ट रोजी स्टारलाइनर क्रूला सोडून अंतराळातून परत निघालं. 7 सप्टेंबर रोजी ते न्यू मेक्सिकोमध्ये उतरलं.

डिसेंबर 2024: नवीन तयार केलेल्या स्पेसएक्स ड्रॅगन कॅप्सूलमध्ये बॅटरीची समस्या आल्यनं त्यालाही विलंब झाला. नासाने नव्यानं तयार केलेल्या ड्रॅगन कॅप्सूलचा पर्याय निवडला आणि मार्च 2025 मध्ये विल्यम्स आणि विल्मोर यांचे परतीचं नियोजन ठरलं.

सुनीता विल्यम्स अंतराळात अडकल्या नव्हत्या?

नासाचे अंतराळवीर बुच विल्मोर आणि सुनीता विल्यम्स अवकाशात अडकले असल्याची कहाणी वादाची ठरली आहे. कारण त्यांचं मिशन अनपेक्षितपणे एका आठवड्याच्या नऊ महिन्यांपर्यंत वाढवलं. तरीही नासानं सातत्यानं असं म्हटलंय की, अंतराळवीर अडकले नव्हते. त्यामुळे त्यांच्या वाढलेल्या मुक्कामामुळे वेगवेगळी मतं समोर आली.

एलोन मस्क आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह काहींनी असा दावा केला होता की, बायडेन प्रशासनाने राजकीय कारणांमुळे अंतराळवीरांना अवकाशात अडकवलं होतं. मात्र, नासा आणि स्वतः अंतराळवीर दोघांनीही हे दावे ठामपणे नाकारलं आहेत. सप्टेंबर 2023 पासूनच अंतराळवीरांना स्टेशनवर डॉक केलेल्या पूर्णपणे कार्यरत स्पेसएक्स कॅप्सूलची सुविधा होती. ही सुविधेच्या माध्यमातून ते आवश्यक असल्यास कधीही पृथ्वीवर येऊ शकत होते.

9 महिने काय खाऊन केला उदर्निवाह? 

आंतरराष्ट्रीय माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार अंतराळवीरांना पावडर दूध, पिझ्झा, रोस्ट चिकन, कोळंबी कॉकटेल आणि ट्यूनासह नाश्ता आणि धान्य उपलब्ध होतं. नासाच्या डॉक्टरांकडून त्यांच्या आहारात किती कॅलरीज जातात यावर सतत लक्ष ठेवलं जात होतं.

आता कोणती आव्हानं?

सुनीता विल्यम्स आणि बुच यांच्यासमोर अनेक शारीरिक आणि मानसिक आव्हानं असणार आहेत. 9 महिने अंतराळात राहिल्यानंतर, त्यांची हाडे आणि स्नायू चांगलीच कमकुवत झाली आहेत. त्यामुळे आता त्यांना रेडिएशन एक्सपोजर आणि दृष्टी कमी होण्यासारखे त्रास होऊ शकतात. दीर्घकाळ अंतराळात राहून पृथ्वीवर परतल्यावर अंतराळवीरांना अशा समस्यांना तोंड द्यावं लागते. गुरुत्वाकर्षणाच्या कमतरतेमुळे, हाडांची घनता लक्षणीयरीत्या कमी होते आणि कधीकधी ते परत बरे होऊ शकत नाही. नासाच्या म्हणण्यानुसार, जर काळजी घेतली नाही तर अंतराळात दर महिन्याला अंतराळवीरांच्या हाडांची घनता एक टक्का कमी होते.


 

हे वाचलं का?

    follow whatsapp