Viral News: नवं घर पाहायला गेला, उंबरठ्यात पाय ठेवताच काळाने घातला घाव; एका क्षणात…
नव्या स्वप्नांसाठी इमारत बघायला गेलेल्या व्यक्तीवर काळाने झडप घातली. आपल्या नव्या व्यवसायासाठी इमारत पाहतानाच इमारत कोसळली आणि त्यातच ते गाडले गेले. त्यानंतर त्यांना बाहेर काढल्यानंतर मात्र ते कोमात गेल्याचं समजलं.
ADVERTISEMENT
Viral News: कधी कोणी घर, दुकान किंवा कोणतीही इमारत भाडोत्री घेण्यापूर्वी ती पूर्णपणे तपासून घेतली जाते. त्यामध्ये काही दोष आहे का, किंवा अडचणी नाहीत ना असं सगळं पाहिले जाते. मात्र एखाद्या व्यक्तीला फक्त भाडोत्री घर बघून जर शिक्षा मिळाली असेल तर तो प्रसंग एखाद्या कथेसारखा तुम्हाला वाटेल. मात्र अशी एक घटना घडली आहे. इटलीमध्ये 22 वर्षीय मॅटेओ बटाग्लिया (Matteo Battaglia) आणि त्याची बायको (wife) प्रॉपर्टी एजंटला (Property Agent) घेऊन घर बघण्यासाठी गेले होते. आपल्या नव्या उद्योगासाठी तो भाडोत्री घर (rent house) शोधत होता. मात्र तो जेव्हा एका इमारतीत पोहचला तेव्हा मात्र त्याला नेमकं काय झाले हे समजले नाही.
ADVERTISEMENT
पायाखालची जमिन सरकरली
तो जेव्हा इमारत पाहायला गेला तेव्हा मात्र त्याला धक्का यासाठी बसला की, अचानक पायाखालची जमिन सरकरली, आणि बघता बघता तो तीन मीटरपेक्षा जास्त खाली येऊन पडाल. ही घटना घडली आहे 8 ऑक्टोबर रोजी. या दुर्घटनेत माटेओ यांच्या डोक्याला गंभीर दुखापतही झाली. त्यानंतर कॉमिसोमधील घटनास्थळावरून त्यांना रुग्णवाहिकेतून जवळच्या असलेल्या व्हिटोरियामधील रुग्णालयात दाखल करण्यात आले.
हे ही वाचा >> MLA Disqualification : ‘शेवटची संधी देतोय’, सुप्रीम कोर्ट विधानसभा अध्यक्षांवर संतापले
कुटुंबीयांसाठी मोठा धक्का
मॅटेओ बटाग्लियाच्या आयुष्यात ही घटना घडल्यानंतर त्याला कॅटानियामधील एका मोठ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. कारण मॅटेओ बटाग्लिया दोन दिवस कोमात गेले. त्यानंतर मात्र त्यांच्या कुटुंबायींना मोठा धक्का बसला आणि 10 ऑक्टोबर रोजी त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. मॅटेओ बटाग्लिया यांना त्यांच्या आयुष्यात दोन मोठे छंद होते.
तुझी मला आता प्रचंड आठवण येतेय
पहिला छंद होता, कारचा आणि दुसरा होता फुटबॉलचा. त्यामुळे ते कारच्या डीलरशीपवर गेल्या काही दिवसांपासून काम करत होते. कारण त्यांना नवा व्यवसायही सुरु करायचा होता. मॅटेओ बटाग्लिया यांचा त्या अपघातात मृत्यू झाला आणि त्यांच्या सगळ्या स्वप्नांना मूठमाती मिळाली. त्यामुळेच मॅटेओंच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नीने सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिले की, तुझी मला आता प्रचंड आठवण येते आहे.
दुःखातही घेतला मोठा निर्णय
आपल्या व्यवसायासाठी मॅटेओ बटाग्लिया इमारत भाडोत्री घेण्यासाठी गेले होते. मात्र त्यांना त्यांच्या नशिबाने साथ दिली नाही. व्यवसायासाठी जी इमारत ते बघायला गेले होते आणि नंतर ती कोसळल्यानंतर आता ती इमारत अधिकाऱ्यांनी सील केली आहे. कारण मॅटेओ बटाग्लिया यांचा आता पोस्टमार्टमचा रिपोर्ट येणे बाकी आहे. मॅटेओंचा मृत्यू झाल्याने आता त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला आहे. ती इमारत जिर्ण झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले असून त्याची चौकशी सुरु करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> ‘विरोधात मतदान करा..’, रिलायन्समध्येच Anant Ambani ला विरोध; काय आहे प्रकरण?
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT