Heart Attack : हृदयविकाराने मृत्यू होऊ नये म्हणून दररोज काय करायचं?

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

What to do every day to prevent death from Heart Attack
What to do every day to prevent death from Heart Attack
social share
google news

How to Avoid Heart Attack : गेल्या काही वर्षांत हृदयविकाराच्या (Heart Attack) रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. पूर्वी, फक्त 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांनाच हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता होती, परंतु आता 30 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या लोकांना देखील याचा सामना करावा लागत आहे. हा ट्रेंड का वाढत आहे? याला आपली लाइफस्टाइल जबाबदार आहे का? की आणखी काही कारणे आहेत? त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात. (What to do every day to prevent death from Heart Attack)

ADVERTISEMENT

हृदयविकाराचा झटका येणे ही अशी स्थिती ज्यामध्ये तुमचे हृदय काम करणे थांबवते. यामुळे, व्यक्तीला अचानक श्वास घेण्यास त्रास होतो आणि डोळ्यासमोर अंधार येऊ लागतो. यावर ताबडतोब वैद्यकीय उपचार न घेतल्यास ते जीवघेणे ठरते.

वाचा : Maratha Reservation : एक वाक्य लिहिलं अन् दिला जीव; तरुणाचा मृतदेह बघून…

हृदयविकाराचा झटका कशामुळे येतो?

हृदयविकाराच्या झटक्यामुळे एरिथमिया होतो. एरिथमिया म्हणजे जेव्हा हृदयाचे ठोके अनियमित होतात तेव्हा त्या स्थितीला एरिथमिया म्हणतात. हा हृदयाच्या वाहिन्यांमधील ब्लॉकेज आहे, ज्याला वैद्यकीय भाषेत प्लेक्स असेही म्हणतात. त्यामुळे हृदयाला रक्तपुरवठा कमी होतो किंवा थांबतो आणि हृदयविकाराचा झटका येतो.

वाचा : Gunaratna Sadavarte : “मराठा तरूणांना दहशतवादी ठरवण्याचा प्रयत्न”, पाटलांचा गंभीर आरोप

हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे कोणती?

हृदयविकाराच्या झटक्याची अनेक लक्षणे आहेत, जसे की श्वास घेण्यास त्रास होणे, छातीत जडपणा, डाव्या हाताला/खांद्यात तीव्र वेदना होणे, पायऱ्या चढताना श्वास लागणे, वारंवार जड वाटणे, उलट्या झाल्यासारखे वाटणे, चक्कर येणे इत्यादी.

हृदयविकाराची कारणे कोणती?

व्यायाम न करणे, वेळेवर जेवण न करणे, पुरेशी झोप न लागणे, चिंता करणे, रात्री उशिरापर्यंत जागे राहणे, पौष्टिक आहार न घेणे, अशी अनेक कारणे आहेत ज्यांमुळे हृदयविकाराचा झटका येतो.

ADVERTISEMENT

वाचा : रोडरोमियोंना अद्दल! पोलिसांनी अशी दिली शिक्षा, मुलींची छेडछाड आली अंगलट

हृदयविकाराचा झटका कसा टाळावा?

हृदयविकाराचा झटका टाळण्यासाठी आहार नियमित घेणे गरजेचे आहे. वेळेवर झोपणे आणि सकाळी उठल्यानंतर फेरफटका मारणे, रात्रीच्या जेवणानंतरही फेरफटका मारणे, वेळोवेळी गरम पाणी पिणे, थोड्या अंतराने शरीराची तपासणी करून घेणे, रक्त तपासणी करणे हे सर्व करणं गरजेचं आहे. तुम्ही व्यायाम करा, पण जास्त नाही, एका मर्यादेत व्यायाम करा. शक्य असल्यास ट्रेनरच्या देखरेखीखाली व्यायाम करा.

ADVERTISEMENT

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT