Ayodhya Ram Mandir: कोण आहेत हे 4 शंकराचार्य? राम मंदिरावेळीच त्यांची का होतेय चर्चा?
राम मंदिरात होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे चारपैकी दोन शंकराचार्यांनी त्याचे स्वागत केले आहे. परंतु काही कारणास्तव ते अभिषेक कार्यक्रमात सहभागी होणार नसल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे शंकराचार्य राम मंदिराच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार की नाही हे आता 22 जानेवरी रोजीच समजणार आहे.
ADVERTISEMENT
Ayodhya Ram Mandir : रामनगरी अयोध्येत 22 जानेवारी रोजी नव्या राम मंदिरामध्ये प्रभू श्रीराम विराजमान होणार आहे. त्यामुळे अभिषेक सोहळ्याचीही जय्यत तयारी सुरु केली जात आहे. त्यासाठी देशातील अनेक मोठ्या व्यक्तींना निमंत्रणं पाठवली जात आहेत. मात्र या निमित्तानं शकराचार्यांची आता चर्चा सुरु करण्यात आली आहे. त्या शंकराचार्यांचीच (Shankaracharya) माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत. ते कोणत्या मठाचे प्रमुख आहेत, आणि ती पदवी का दिली जाते हे ही आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
ADVERTISEMENT
आदि शंकराचार्य कोण?
हिंदू धर्मात आदि शंकराचार्य हे हिंदू तत्वज्ञानी आणि धार्मिक नेते होते. त्यांना भगवान शंकराचा अवतारही मानले जात होते. सनातन धर्माची स्थापना करण्यासाठी आदि शंकराचार्यांनी भारतातील 4 प्रांतामध्ये चार मठांची स्थापना केली. त्याच चार मठांच्या प्रमुखालाच शंकराचार्य असं म्हटले जाते. ज्या मठासाठी हे पदाचा उगम हा आदि शंकराचार्यांपासून झाला असंही मानलं जातं. या मठांची स्थापना केल्यानंतर आदि शंकराचार्यांनी आपल्या चार मुख्य शिष्यांची त्यांच्यावर नियुक्ती केली गेली. तेव्हापासून या चारही मठांमध्ये शंकराचार्य पदाची परंपरा सुरू करण्यात आली. प्रत्येक मठाचे स्वतःचे खास महावाक्यही असते.
मठ किंवा पीठ म्हणजे काय?
सनातन धर्मात मठ किंवा पीठ म्हणजे अशा संस्था जिथे गुरु आपल्या शिष्यांना शिक्षण, उपदेशाच्या गोष्टी दते असतात. त्या ठिकाणी प्रामुख्याने आध्यात्मिक शिक्षणही दिले जाते. ज्या प्रमाणे हिंदू धर्मात याला पीठ किंवा मठ म्हणतात तर बौद्ध धर्मातील मठांना विहार म्हणतात. ख्रिश्चन धर्मात त्यांना मठ, प्रायरी, चार्टरहाऊस नावांनी ओळखले जाते. अशा प्रकारे आपल्या देशातील द्वारका, ज्योतिष, गोवर्धन आणि शृंगेरी पीठ हे चार प्रमुख मठ असून तिथे हिंदू धर्मातील शिक्षण आणि उपदेश दिले जाते.
हे वाचलं का?
विद्वत परिषदेची मान्यता
देशातील या चार पीठांवर शंकराचार्यांच्या नियुक्तीसाठी त्यागी, दंडी संन्यासी, संस्कृत, चतुर्वेद, वेदांत ब्राह्मण, ब्रह्मचारी आणि पुराणांचे ज्ञान असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर त्यांच्यासाठी वैयक्तिक आयुष्यात मुंडन, पिंड दान आणि रुद्राक्ष धारण करणे हे ही महत्त्वाचे मानले जाते. शंकराचार्य होण्यासाठी चार वेद आणि सहा वेदांग जाणणारा ब्राह्मण असणे महत्वाचे असल्याचे सांगितले जाते. ज्यांना शंकराचार्य बनवले जाते, त्यांना आखाड्यांचे प्रमुख, आचार्य महामंडलेश्वर, प्रख्यात संतांची संमती आणि काशी विद्वत परिषदेच्या मान्यतेचा शिक्काही लागतो. यानंतरच शंकराचार्य ही पदवी दिली जाते.
देशातील 4 मठ
1. शृंगेरी मठ: शृंगेरी मठ दक्षिण भारतातील रामेश्वरम येथे असून येथे दीक्षा घेणाऱ्या भिक्षूंच्या नावांपुढे सरस्वती, भारती आणि पुरी अशी नावं वापरतात. या मठाचे पहिले मठाधिपती आचार्य सुरेश्वरजी होते, तर त्यांचे पूर्वीचे नाव मंडन मिश्र होते. या मठाखाली यजुर्वेद ठेवण्यात आला आहेत. तर सध्या येथील शंकराचार्य जगद्गुरु भारतीतीर्थ आहेत.
ADVERTISEMENT
2. गोवर्धन मठ: पुरी, ओडिशा येथे गोवर्धन मठाची स्थापना करण्यात आली आहे. येथील भिक्षूंच्या नावानंतर अरण्य जोडले जाते. या मठाखाली ऋग्वेद ठेवण्यात आला आहे. गोवर्धन मठाचे पहिले मठाधिपती पद्मपद आचार्य होते. हे आदि शंकराचार्यांचे पहिले शिष्य होते. सध्या निश्चलानंद सरस्वती हे या मठाचे शंकराचार्य म्हणून जबाबदारी सांभाळतात.
ADVERTISEMENT
3. ज्योतिर्मठ: ज्योतिर्मठ बद्रीनाथ, उत्तराखंडमध्ये आहे. येथे अथर्ववेद ठेवण्यात आला आहे. येथे दीक्षा घेणाऱ्या भिक्षूंच्या नावांपुढे गिरी, पर्वत आणि सागर असं लावलं जाते. ज्योतिर्मठाचे पहिले मठाधिपती आचार्य तोतक होते. सध्या येथे स्वामी अविमुक्तेश्वरानंद महाराज शंकराचार्य आहेत.
4. शारदा मठ: शारदा मठ द्वारकाधाम, गुजरातमध्ये असून या मठातील भिक्षूंच्या नावावरून तीर्थ किंवा आश्रम ही नावं पडली आहेत. या मठामध्ये सामवेद येथे ठेवण्यात आला आहे. शारदा मठाचे पहिले मठाधिपती हस्तमलक (पृथ्वीधर) होते, तर सध्या सदानंद सरस्वती हे या मठाचे शंकराचार्य असून ते हिंदू धर्माचे शिक्षण आणि उपदेश देत असतात.
हे ही वाचा >> 12th fail : IPS मनोज कुमार शर्माचं महाराष्ट्र कनेक्शन, ‘या’ शहरांत होते अधिकारी
शंकराचार्यांचं नेमकं मत काय?
राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्याला चार मठांचे शंकराचार्य उपस्थित नसल्याचे वृत्त येत असले तरी त्यामध्ये कितपत तथ्य आहे ते आता 22 जानेवारी रोजीच समजणार आहे. कारण, अयोध्येतील राम मंदिर अद्याप पूर्ण तयार झालेले नसल्याचे शंकराचार्य सांगत आहेत. त्यामुळे अपूर्ण मंदिरात प्राणप्रतिष्ठा करणे योग्य नाही. मात्र, वैष्णव संत आणि ऋषीमुनींना राम मंदिराच्या अभिषेकात कोणताही दोष आढळला नाही आणि सध्या देशात आणि जगात अशी अनेक मंदिरे आहेत जिथे बांधकाम पूर्ण झालेले नाही आणि अनेक दशकांपूर्वीच अभिषेक करण्यात आला असल्याचे सांगण्यात आले आहे.
जाणं योग्य नाही?
विश्व हिंदू परिषदेचे कार्याध्यक्ष आलोक कुमार यांनी सांगितले की, राम मंदिरात होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे चारपैकी दोन शंकराचार्यांनी त्याचे स्वागत केले आहे. परंतु काही कारणास्तव ते अभिषेक कार्यक्रमात सहभागी होणार नाहीत. स्वामी अविमुक्तेश्वरानंद आणि निश्चलानंद स्वामी महाराज म्हणतात की सध्या प्रतिष्ठा शास्त्रानुसार होत नाही, त्यामुळे तिथे जाणे योग्य नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. यावेळी त्यांनी हे ही सांगितले आहे की, आम्हाला निमंत्रणही मिळाले आहे.
देव-देवता कोपतात
राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेवर बोलताना स्वामी अविमुक्तेश्वरानंद आणि निश्चलानंद स्वामी महाराज यांनी सांगितले की, तुम्ही एका व्यक्तीसोबत येऊ शकता असंही त्यामध्ये म्हटले आहे. मात्र दुसऱ्या एका मुलाखतीदरम्यान त्यांनी सांगितले की, मूर्तीला कोणी स्पर्श करावा आणि कोणी करू नये याचीही काळजी घेतली पाहिजे. कारण पुराणामध्ये असंही सांगितले आहे की, मूर्तीची स्थापना करताना ती विधीनुसारच केली जाते आणि तेव्हाच ते नीट होते. मात्र ते नीट झालं नाही तर मात्र देव-देवता कोपतात असंही त्यांनी सांगितले.
हे ही वाचा >> ‘लोकसभेनंतर राज्यात राजकीय भूकंप’, पंतप्रधानांसमोरच CM शिंदेंचं मोठं विधान
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT