PCOD म्हणजे काय? तो का होतो आणि त्यावर उपाय काय? समजून घ्या सगळं…
आज देशातील 10 पैकी 8 महिला तरी मासिक पाळी किंवा ‘PCOD’ने त्रस्त आहेत. PCOD ही महिलांमधील एक सामान्य समस्या आहे, ज्याचे मुख्य कारण हार्मोनलमधील असंतुलन आहे.
ADVERTISEMENT
Women Health : महिलांचं वय वाढत जातं तसंच त्यांच्या शरीरात अनेक बदल घडतात. यासोबत, समस्या उद्भवू लागतात. धकाधकीच्या या जीवनात महिलांच्या आरोग्याबाबत दिवसेंदिवस अनेक वाढत आहेत. यातच जाणवणारी एक समस्या म्हणजेच हार्मोनल प्रॅाल्बम. ज्याचा महिलांच्या मासिक पाळीवर परिणाम होतो. आज देशातील 10 पैकी 8 महिला तरी मासिक पाळी किंवा ‘PCOD’ने त्रस्त आहेत. (Women Health Problem Causes of PCOD and remedies on it)
ADVERTISEMENT
तुमच्या आजूबाजूला, मित्र मैत्रिणींमध्ये, घरात तुम्ही PCOD या शब्दाबद्दल नक्कीच ऐकलं असेल. हा शब्द तुमच्या कानावर पडला असेलच. पण सर्वानाच याबद्दलची माहिती नाहीये. त्यामुळे आज आपण पीसीओडीची कारणे आणि त्यावरील उपाय जाणून घेणार आहोत.
वाचा : नाशिकमध्ये बाप्पाला निरोप देताना काळाने साधला डाव! दोघांचा मृत्यू, तर दोघांचा…
PCOD म्हणजे काय?
PCOD ही महिलांमधील एक सामान्य समस्या आहे, ज्याचे मुख्य कारण हार्मोनलमधील असंतुलन आहे. लठ्ठपणा, अल्कोहोल आणि सिगारेटचे सेवन, जास्त तेलकट आणि मसालेदार पदार्थांचे सेवन, आरोग्याशी संबंधित समस्यांनी ग्रस्त अशा अनेक कारणांमुळे हार्मोन्समध्ये असंतुलन होते.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
PCOD मुळे, स्त्रीला अनियमित मासिक पाळी, मासिक पाळी न येणे, चेहऱ्यावरचे केस आणि पुरळ, ओटीपोटात वेदना होतात. काही प्रकरणांमध्ये तर, महिलांना गर्भधारणेवेळी अडचणी किंवा वंध्यत्वा सारख्या गंभीर समस्याही उद्भवतात. या आणि अशा अनेक समस्या PCOD मुळे निर्माण होणाच्या शक्यता आहेत. सुरुवातीच्या काळात ही समस्या 30-35 च्या स्त्रियांना जाणवत होती. मात्र, आता PCOD चा त्रास 18 ते 30 वर्षांच्या मुलींनादेखील होतो.
वाचा : पंकजा मुंडेंचा धक्कादायक गौप्यस्फोट! “मराठी असल्याने मलाही मुंबईत घर नाकारलं”
PCOD होण्याची मुख्य कारणं जाणून घ्या…
पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम अर्थात PCOD ची अनेक कारणे आहेत. जसं की, खराब जीवनशैली, व्यायाम, योग किंवा ध्यान न करणे आणि खाण्याच्या सवयींमध्ये निष्काळजी असणे इत्यादी… याशिवाय, खालीलप्रमाणे दिलेली कारणं ही आहेत ज्यामुळेही पीसीओडीचा त्रास होऊ शकतो.
ADVERTISEMENT
- वजन वाढणे
- काही कारणांमुळे मासिक पाळीचे असंतुलन
- अनुवांशिक कारणे
- महिलांच्या शरीरात इन्सुलिनची उच्च पातळी
- सिगारेट, अल्कोहोल किंवा ड्रग्सचे सेवन
- आहारात पोषक घटकांचा समावेश न करणे.
तसंच, PCOD ची इतरही कारणंही असू शकतात जसं की रात्री उशिरापर्यंत जागरण करणे आणि नंतर उशिरा झोपणे, तणावाखाली असणे. वरील कारणं लक्षात घेऊन जर वेळीच खबरदारी घेतली तर PCOD चा धोका कमी होऊ शकतो.
ADVERTISEMENT
PCOD साठीचे उपचार कोणते?
PCOD वर उपचार करण्यासाठी, सुरुवातीला डॉक्टर महिलांना त्यांच्या जीवनशैलीत काही विशेष आणि सकारात्मक बदल करण्यास सुचवतात. परंतु जेव्हा याचा काहीही फरक पडत नाही तेव्हा ते योग्य औषधोपचार घेण्याचा सल्ला देतात.
तज्ज्ञांचे मते, पीसीओडी पूर्णपणे नष्ट होऊ शकत नाही, परंतु जीवनशैलीतील बदल, निरोगी आहार, नियमित व्यायाम आणि ध्यान आणि काही विशेष औषधांच्या मदतीने त्याची लक्षणं नियंत्रित केली जाऊ शकतात.
वाचा : Manipur Violence : मुख्यमंत्र्यांचं वडिलोपार्जित घर जाळण्याचा प्रयत्न
PCOD ची कोणत्या घरगुती उपायांनुसार वेळीच खबरदारी घेता येते?
पीसीओडीवर घरगुती उपायांनी उपचार करण्यासाठी, तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या जीवनशैलीत सकारात्मक बदल घडवून आणण्याची सूचना केली जाते. घरगुती उपचारांमध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे:
- आहारात सकारात्मक बदल करणे
- निरोगी वजन राखणे म्हणजे लठ्ठपणा टाळणे
- व्यायाम, योगा आणि ध्यान नियमितपणे करा
- वेळेवर झोपा
- तणावापासून दूर राहा
- आनंद देणार्या गोष्टींमध्ये स्वतःला गुंतवून घ्या
- सिगारेट, अल्कोहोल आणि इतर मादक पदार्थांपासून दूर राहा
- जास्त तेलकट आणि मसालेदार पदार्थांचे सेवन करू नका
- फायबर आणि कार्बोहायड्रेट्स समृध्द अन्नाचे सेवन करा
- आपल्या आहारात अंडी, दही आणि चीज यांचा समावेश करा
- आहारात गोड पदार्थांचा समावेश कमी करा
- हिरव्या पालेभाज्या, गाजर, मुळा, बीट आणि ताजी फळे यांचे सेवन करा
जीवनशैलीत बदल करून आणि घरगुती उपाय करूनही आराम मिळत नाही, तेव्हा डॉक्टरांचा सल्ला घ्या. यामध्ये प्रामुख्याने काही विशिष्ट औषधांचा समावेश होतो.
ADVERTISEMENT