Abdul Sattar : ''एकाचं कल्याण करून दिल्लीला पाठवलं, दुसऱ्याला भोकरदन...'', सत्तारांचा दानवेंवर घणाघात

मुंबई तक

ADVERTISEMENT

abdul sattar big statement raosaheb danve kalyan kale jalana lok sabha coustituency maharashtra assembly election 2024 eknath shinde mla
सत्तारांचा दानवेंवर जोरदार निशाणा
social share
google news

बातम्या हायलाइट

point

एकाचं कल्याण करून दिल्लीला पाठवलं

point

एकाचं बिस्मिल्ला करून भोकरदनला पाठवलं

point

सत्तारांचा दानवेंना जोेरदार टोला

Abdul Sattar on Roasaheb Danve : 'एकाचं कल्याण करून दिल्लीला पाठवलं आणि एकाचं बिस्मिल्ला करून भोकरदनला पाठवलं'', असे वक्तव्य शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांनी करून नाव न घेता रावसाहेब दानवेंवर जोरदार निशाणा साधला आहे. लोकसभेत जालन्यातून कल्याण काळे विजयी ठरले होते, तर रावसाहेब दानवेंचा पराभव झाला होता. त्यामुळे आता सत्तारांच्या या विधानाची चर्चा रंगली आहे. (abdul sattar big statement raosaheb danve kalyan kale jalana lok sabha coustituency maharashtra assembly election 2024 eknath shinde mla)  

लोकसभा निवडणुकीत भाजपचे माजी खासदार रावसाहेब दानवे यांचा पराभव झाला होता. सत्तार यांनी दानवेंचा प्रचार न करता काँग्रेसचा उमेदवार निवडून आणल्याचा सत्तार यांच्यावर आरोप होत आहे. त्यामुळे अब्दुल सत्तार आणि दानवे यांच्यात वितुष्ट आल्याचे समोर आले होते. त्यातच आता अब्दुल सत्तार यांनी असे विधान केल्यामुळे आणखी वाद उफळण्याची चर्चा आहे.

हे ही वाचा : 'मी म्हटलं, मी संपलो...', राज ठाकरेंनी सांगितला कॉलेजमधील 'त्या' मुलीचा भन्नाट किस्सा!

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अब्दुल सत्तार आपला मतदारसंघ पिंजुन काढत आहेत. मतदारसंघातील एका गावात संवाद साधताना त्यांनी रावसाहेब दानवे आणि खासदार कल्याण काळे यांच्याबाबत एक वक्तव्य केले. कल्याण काळे यांचे कल्याण करुन त्यांना दिल्लीत बसवले तर रावसाहेब दानवेंचा बिस्मिल्ला केला आणि भोकदनला बसवले, असा त्यांच्या विधानाचा अर्थ आहे. त्यामुळे अब्दुल सत्तार यांच्या या विधानानंतर विधानसभा निवडणुकीपूर्वीच राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

दरम्यान कल्याण काळे माझे मित्र आहेत. त्यांना मदत केली हे मान्य करतो.दानवे हे भोकरदनमध्ये पण पिछाडीवर होते. आमचे कार्येकर्ते नाराज होते. माझ्या काही कार्यकर्त्यांनी कल्याण काळे यांना मदत केली. हे त्यांनी लोकसभा निकालानंतर मान्य केले होते. दरम्यान  रावसाहेब दानवे या विधानावार काय प्रतिक्रिया देतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

हे ही वाचा : Amit Thackeray: शिंदे सरकार असताना भोंग्याचा मुद्दा का लावून धरला नाही? अमित ठाकरे म्हणाले तुम्ही...

    follow whatsapp

    ADVERTISEMENT