Dheeraj Ghate Kasba : हिंदुत्ववादी सरकार हवंय, पण हिंदुत्ववादी कार्यकर्त्याला... उमेदवारी न मिळाल्यानं भाजपच्या धीरज घाटेंची नाराजी

मुंबई तक

ADVERTISEMENT

धीरज घाटे यांची नाराजी
धीरज घाटे यांची नाराजी
social share
google news

बातम्या हायलाइट

point

धीरज घाटे पक्षावर नाराज

point

उमेदवारी न मिळाल्यानं नाराजी

point

एक्सच्या पोस्टमध्ये काय म्हणाले धीरज घाटे?

Dheeraj Ghate on Kasba Vidhan Sabha : कसबा विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून उमेदवारी कुणाला मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागून होतं. विधानसभा निवडणुकांसाठी सर्वच पक्षांकडून जागावाटपासाठी बैठकांचा सपाटा सुरू होता. त्यानंतर झालेल्या अंतिम निर्णयानंतर महायुतीतील भाजपने सुरूवातीला 99 जागांची पहिली यादी जाहीर केली. त्या यादीत कसब्यातून उमेदवार देण्यात आला नव्हता. तर दुसरीकडे काँग्रेसने मात्र पहिल्यांच यादीत कसब्यातून रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे भाजपकडून धंगेकरांविरोधात कोण लढणार याची उत्सुकता वाढली होती. भाजपची दुसरी यादी आली आणि या मतदारसंघातून पुन्हा एकदा हेमंत रासने यांना उमेदवारी मिळाली. त्यानंतर पुण्यात भाजपचा युवा आणि आक्रमक चेहरा म्हणून ओळख असलेल्या धीरज घाटे यांनी नाराजी व्यक्त करणारी पोस्ट केली आहे.

ADVERTISEMENT

 


हे ही वाचा >> Manoj Jarange : ठाकरे-शिंदेंचा होणार करेक्ट कार्यक्रम? जरांगे म्हणाले, ''मुंबईतल्या 23 जागा पाडणार''

धीरज घाटे हे पुण्यातील भाजपचे एक कट्टर हिंदुत्ववादी चेहरा म्हणून ओळखले जातात. आतापर्यंत त्यांच्यावर आंदोलनातून वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे निखील वागळे यांच्यावरील हल्ला प्रकरणातही त्यांचं नाव होतं. त्यामुळेच आता त्यांनी नाराजी व्यक्त केल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जातंय. "तुम्हाला हिंदुत्ववादी सरकार हवंय, पण 30 वर्ष हिंदुत्वासाठी काम करणारा कार्यकर्ता उमेदवार नकोय..." असं म्हणत धीरज घाटे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा >>Constituency Wise congress Candidates List: काँग्रेसची तिसरी यादी जाहीर, मुंबईतून 'या' उमेदवाराला दिलं तिकीट

दरम्यान, कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर आणि हेमंत रासने यांच्यातली लढत ही राज्यभर गाजली होती. या निवडणुकीत हेमंत रासने यांचा पराभव झाला. त्यानंतर रवींद्र धंगेकर हे नाव राज्यभर पोहोचलं. त्यानंतर आता हेमंत रासने यांना उमेदवारी मिळणार की नाही याबद्दल साशंकता होती. तर धीरज घाटे हे उमेदवारीसाठी प्रयत्नशील होते. मात्र या मतदारसंघातून पुन्हा एकदा हेमंत रासने यांना उमेदवारी दिल्यानं, धीरज घाटे नाराज झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या या नाराजीवर पक्ष त्यांची कशी समजूत काढतो आणि ते काय भूमिका घेतात यावर सर्वांचं लक्ष लागून आहे. 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT